केरळमधील शबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिराचे दरवाजे रविवारी १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वार्षिक मंडलम-मकरविलक्कू तीर्थयात्रेच्या सुरुवातीपूर्वी उघडण्यात आले. दोन महिन्यांहून अधिक काळ चालणारी ही तीर्थयात्रा सोमवारपासून, मल्याळम महिन्याच्या वृश्चिकमच्या पहिल्या दिवशी सुरू होईल. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे तीर्थस्थान मानले जाणारे शबरीमाला मंदिर दोन महिन्यांच्या वार्षिक तीर्थयात्रेसाठी उघडण्यात आले. पहाटे तंत्रींनी नवीन मेलशांतीच्या उपस्थितीत श्रीकोविलसमोर कलशाभिषेक करून विधीची सुरुवात झाली आहे. शबरीमाला हे मंदिर भगवान अय्यप्पा यांना समर्पित आहे. भगवान अयप्पा हे भगवान शिव शंकर आणि भगवान विष्णू यांचे पुत्र आहेत. हो शिव आणि विष्णू यांचे पुत्र भगवान अयप्पा यांच्या जन्माची कथा खूपच निराळी आहे. जाणून घेऊया याबद्दल. (Sabarimala)
सगळ्यांना भगवान शिव यांना दोन पुत्र होते, एक भगवान कार्तिकेय आणि श्रीगणेश यांच्याबद्दलच माहिती आहे. मात्र महादेवांना अजून एक तिसरा पुत्र होता, ज्याचे नाव अयप्पा होते. हरिहर यांचा मुलगा म्हणून अयप्पा यांना ओळखले जाते. अयप्पा भगवान शिवाचा अग्नि आणि भगवान विष्णूची कृपा धारण करतो. दक्षिण भारतात भगवान अयप्पा यांना मोठे महत्त्व आहे. म्हणूनच दक्षिण भारतात आपल्याला भगवान अयप्पा यांची जास्त मंदिरं पाहायला मिळतात. (Marathi News)
अयप्पा हा भगवान शिव आणि विष्णूच्या मोहिनी रूपाचे पुत्र म्हणून ओळखले जातात. भगवान अयप्पा यांना हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. शिव आणि विष्णूच्या कृपेने जन्मलेले हे मूल निर्भय, तेजस्वी आणि वैश्विक उर्जेने भरलेले होते, ज्यामध्ये महादेवाची शांती आणि नारायणाची करुणा दोन्ही होती. दोन मुख्य देवांचे अंश असलेल्या भगवान अयप्पा हे अतिशय तेजस्वी होते. जेव्हा भगवान विष्णूने समुद्रमंथनातून मिळालेले अमृत देवांना मिळवून देण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले तेव्हा विष्णू यांचे मोहिनी रूप देवांनाही बांधू शकत होते. जेव्हा मोहिनी शिवात विलीन झाली तेव्हा शिव द्वैतवादी पुरुष बनले. मोहिनी प्रकृती बनली आणि त्यांच्या मिलनातून अयप्पा यांचा जन्म झाला. भगवान अयप्पा यांना संपूर्ण तंत्राचा अवतार मानले जाते. (Lord Ayyappan)
शिव आणि विष्णूचा अवतार अयप्पाचा जन्म महिषीचा नाश करण्यासाठी झाला. महिषीकडे अशी शक्ती होती जी देवांनाही जिंकता आली नाही. केवळ शिव आणि विष्णू दोघांपासून जन्मलेला पुत्रच महिषीचा वध करू शकत होता. अयप्पा केवळ योद्धा म्हणून नव्हे तर सर्व दैवी शक्तींमधील संतुलन होते. भगवान अय्यप्पाचे वडील शिव आणि आई मोहिनी. विष्णूचे मोहिनी रूप पाहून भगवान शिवाचे वीर्यस्खलन झाले. त्यांच्या वीर्याला पारा असे नाव पडले आणि त्यातून सस्तव नावाचा मुलगा जन्माला आला, जो नंतर दक्षिण भारतात अयप्पा म्हणून ओळखला जाऊ लागला. शिव आणि विष्णूपासून जन्माला आल्यामुळे त्याला “हरिहरपुत्र” असे देखील म्हटले जाऊ लागले. (Lord Harihar)

अजून एका आख्यायिकेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाने मोहित झाले आणि परिणामी, एका मुलाचा जन्म झाला, ज्याला त्यांनी पंपा नदीच्या काठावर सोडून दिले. राजा राजशेखर यांनी त्याचे १२ वर्षे पालनपोषण केले. नंतर, आपल्या आईसाठी सिंहिणीचे दूध आणण्यासाठी जंगलात जात असताना, अयप्पाने महिषा राक्षसाचाही वध केला. अय्यप्पाबद्दलची आणखी एक आख्यायिका अशी आहे की त्याच्या पालकांनी त्याला गळ्यात घंटा बांधून सोडून दिले. पंडलमचा राजा राजशेखर यांनी अयप्पाला आपला मुलगा म्हणून वाढवले. परंतु भगवान अय्यप्पा यांना हे आवडले नाही आणि त्यांनी संन्यास घेतल्यानंतर राजवाडा सोडला. काही पुराणांमध्ये, अयप्पा स्वामींना शास्त्राचा अवतार मानले जाते. (Todays Marathi Headline)
दरम्यान भगवान अयप्पा यांच्याबद्दल सांगायचे झाले तर केरळ राज्यातील पतनमतिट्टा जिल्ह्याच्या पेरियार टायगर अभयारण्यात वसलेले शबरीमाला मंदिर हे त्यांचे मुख्य निवासस्थान आहे. इथे जगभरातून लोक शिवपुत्राच्या दर्शनासाठी येतात. मकर संक्रांतीच्या रात्री या मंदिराजवळील दाट अंधारात अधूनमधून एक प्रकाश दिसतो. याला मकर ज्योत असे देखील म्हटले जाते. दरवर्षी जगभरातून लाखो भाविक या प्रकाशाचे साक्षीदार होण्यासाठी येतात. शबरीमाला हे नाव शबरीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अयप्पा ही देवता शाश्वत ब्रह्मचारी असल्याने मागील १५०० वर्षांपासून या मंदिरात मासिकपाळीच्या टप्प्यातील महिलेला प्रवेश नाकारला जातो. (Top Trending News)
असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा हा प्रकाश दिसतो तेव्हा एक आवाज ऐकू येतो. भक्तांचा असा विश्वास आहे की ही देव ज्योती आहे, जी भगवानांनी प्रज्वलित केली होती. मंदिर व्यवस्थापनाच्या पुजाऱ्यांच्या मते, मकर ज्योती हा मकर महिन्याच्या पहिल्या दिवशी आकाशात दिसणारा एक विशेष तारा आहे. असे म्हटले जाते की अय्यप्पाने शैव आणि वैष्णवांमध्ये एकता स्थापित केली. त्यांनी आपले ध्येय साध्य केले आणि सबरीमाला येथे दिव्य ज्ञान प्राप्त केले. (Social News)
भगवान अय्यप्पन यांना समर्पित असलेल्या या मंदिरात येण्यासाठी भक्तांना ४१ दिवसांच्या कठोर व्रताचे पालन करावे लागते. कठोर ब्रह्मचर्य आणि त्यानंतर सात्विक भोजन अशा नियमांचे पालन या ४१ दिवसांच्या व्रतामध्ये केले जाते. याला मण्डलम् म्हणतात. पंबा नदिच्या काठावर वसलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. पंपापासून अंदाजे ५ किमीची जंगलातून जाणारी पायी यात्रा पूर्ण केल्यानंतर भक्त १५३५ फूट उंचीवरील सबरीमला मंदिरात पोहोचतात. (Marathi News)
केरळमधील पंपा या ठिकाणापासून येथून शबरीमलयपर्यंत पायी यात्रा करावी लागते. हे पाच किलोमिटरचे अंतर घनदाट झाडांनी व्यापलेले आहे. समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीवर असलेले शबरीमलय मंदिर पौराणिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराच्या भोवती १८ डोंगर आहेत. मंदिराच्या प्रांगणात पोहचण्यासाठी १८ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरात अय्यप्पन यांच्याशिवाय मालिकापुरत्त अम्मा, गणपती, नागराज यांच्याही मुर्ती आहेत. (Top Stories)
==========
Margashirsha : जाणून घ्या मार्गशीर्ष गुरुवारांचे महत्त्व
==========
भगवान अय्यप्पांच्या दर्शनासाठी १८ पायऱ्यांवरून चढून गेल्यावर भक्तांना प्रवेश मिळतो. या १८ पायऱ्यांच्या अर्थाशी जोडलेल्या काही परंपरा आहेत. सर्वात प्रचलित मान्यतेनुसार पहिल्या पाच पायऱ्या ५ इंद्रियांचे प्रतीक आहेत. नंतरच्या ८ पायऱ्या ८ भावनांचे प्रतीक आहेत. त्यानंतरच्या ३ पायऱ्या ३ गुण दर्शवतात आणि शेवटच्या २ पायऱ्या विद्या आणि अविद्या यांचे प्रतीक आहेत. त्याशिवाय या पायऱ्यांचा संबंध १८ पुराणे, सबरीमालाच्या आसपासचे १८ पर्वत, अय्यप्पांची १८ शस्त्रास्त्रे, १८ सिद्धपुरुष, १८ देवता आणि १८ गुण यांच्याशी जोडला जातो. (Latest Marathi News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
