Health Care : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या झपाट्याने दिसून येते. चुकीचा आहार, कमी व्यायाम, ताण, झोपेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) वाढू लागते आणि HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी होते. योग्य सवयी अंगीकारल्यास कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रणात ठेवता येऊ शकते. खालील पाच उपाय प्रत्येकासाठी सोपे असून दीर्घकाळासाठी हृदयाचे आरोग्य मजबूत ठेवण्यास मदत करतात.
संतुलित आणि फायबरयुक्त आहार
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहार महत्वाची भूमिका बजावतो. दररोजच्या जेवणात ओट्स, बार्ली, बाजरी, ज्वारी, ब्राउन राईस, अशा पूर्ण धान्यांचा वापर केल्यास सॉल्युबल फायबर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याशिवाय फळे, भाजीपाला, सलाड, राजमा, चणे, मसूर यांसारख्या पदार्थांत अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. तळलेले, रेड मीट, बटर, क्रीम, चीज, बेकरी पदार्थ यांतील संतृप्त चरबी टाळल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून बचाव होतो. दररोज काही प्रमाणात बदाम, अक्रोड किंवा फ्लॅक्ससीड घेतल्यास ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स हृदयाचे संरक्षण करतात.
नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल
व्यायामामुळे HDL (गुड कोलेस्ट्रॉल) वाढते आणि LDL (बॅड कोलेस्ट्रॉल) कमी होण्यास मदत होते. रोज किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे, सायकलिंग, जॉगिंग, योगा, एरोबिक्स यांसारख्या क्रियाकलापांचा समावेश केल्यास शरीरातील चरबी कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारते. जिने चढणे, थोड्या अंतरासाठी वाहनाऐवजी चालणे, घरकामात सक्रिय राहणे या छोट्या सवयीसुद्धा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करतात. व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या क्षमतेनुसार पद्धत ठरवणे आणि नियमितपणे तीच पाळणे महत्त्वाचे.

Health Care
ट्रान्स फॅट आणि जंक फूडपासून दूर राहा
पॅक फूड, बेकरी पदार्थ, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री, पॅटिस यांमध्ये ट्रान्स फॅट आणि संतृप्त चरबी मोठ्या प्रमाणात असते, जी कोलेस्ट्रॉल अचानक वाढवणारी असते. घरगुती अन्न, वाफवलेले, उकडलेले किंवा कमी तेलात बनवलेले पदार्थ निवडणे हा उत्तम पर्याय आहे. स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल, राईस ब्रॅन ऑईल, सनफ्लॉवर ऑईल यांसारखी हलकी तेलं योग्य प्रमाणात वापरल्यास हृदयासाठी फायदेशीर ठरतात. तेलाचे वारंवार गरम करणे टाळणेही तितकेच आवश्यक आहे, कारण त्यातून हानिकारक घटक तयार होतात.
==========
हे देखील वाचा :
Fat Loss Remedies : थंडीच्या दिवसात पोट आणि पाठीवरील चरबी आठवड्याभरात होईल कमी, वाचा हे उपाय
Health Advice : ब्लड शुगर 300 च्या पार गेल्यास लगेच करा हे काम, अन्यथा होईल गंभीर समस्या
==========
तणाव नियंत्रण आणि पुरेशी झोप
अतिताणामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. मेडिटेशन, डीप ब्रीदिंग, योग, संगीत ऐकणे अशा सवयींमुळे तणावावर नियंत्रण मिळवता येते. तसेच दररोज ७–८ तासांची शांत झोप घेतल्यास शरीराला पुनरुत्पादन व संतुलन साधण्यास मदत होते. झोप कमी घेतल्याने भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात आणि अयोग्य खाण्याकडे प्रवृत्ती वाढते, ज्याचा थेट परिणाम कोलेस्ट्रॉलवर होतो.
धूम्रपान, मद्यपान टाळा
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात, त्यामुळे LDL वाढण्याची व HDL कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पूर्णपणे धूम्रपान टाळणे हा सर्वात मोठा बदल ठरतो. मद्यपानाचे प्रमाण कमी ठेवणेही आवश्यक आहे, कारण यकृतावर ताण आल्यास कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. तसेच दर ६ महिन्यांनी लिपिड प्रोफाईल तपासून घेतल्यास आपल्या शरीरातील बदल वेळेवर समजू शकतात आणि योग्य उपचार घेताता येतात.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
