मार्गशीर्ष हा अतिशय पवित्र महिना समजला जातो. या महिन्यात अनेक मोठे आणि महत्त्वाचे सण येतात. याच मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते ‘विवाह पंचमी’. आता विवाह पंचमी हे नाव ऐकून अनेकांना नवल वाटले असेल. मात्र विवाह पंचमी हा मार्गशीर्ष महिन्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. म्हणूनच या दिवशी घरोघरी आणि मंदिरात भगवान राम आणि सीतेची विशेष पूजा केली जाते. या पूजेमुळे वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते. (Vivah Panchami)
यावर्षी विवाह पंचमी ही २५ नोव्हेंबरला मंगळवारी साजरी केली जाणार आहे. विवाह पंचमीचा दिवस हा भगवान राम आणि माता सीता यांच्या आदर्श विवाहित जीवनाचे प्रतीक आहे. सर्वच लोकांसाठी हे दोघे आदर्श आहे. रामायणात उल्लेख केल्याप्रमाणे, या दिवशी त्यांचा विवाह झाला होता असे मानले जाते. हा दिवस भगवान राम आणि सीतेच्या भक्तीसाठी आणि वैवाहिक जीवनातील सुख-समृद्धीसाठी खूप शुभ मानला जातो. परंतु, या दिवशी नवीन लग्न करणे टाळले जाते. अतिशय शुभ दिवस असून देखील विवाह पंचमीच्या दिवशी कोणतेही विवाह होत नाही. किंबहुना विवाह पंचमीच्या दिवशी विवाह करणे टाळले जाते. मग यामागचे नक्की कारण कोणते? चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी झाला होता. हिंदू धर्मात राम-सीता या जोडप्याला कायम एक आदर्श पती-पत्नी म्हणून पूजले गेले आहे, किंबहुना पुजले जाते. प्रत्येक जोडप्याला आपले जोडपे राम-सीतेसारखे असावे असे वाटते. प्रत्येक विवाहित जोडपे राम आणि सीता यांच्यासारखे राहावे म्हणून मोठ्या वडीलधाऱ्या मंडळी कडूनही त्यांना तसाच आशीर्वाद देखील मिळतो. मात्र श्रीराम आणि माता सीता यांचे लग्नानंतरचे आयुष्य खूपच खडतर होते. (Top Marathi Headline)

लग्नानंतर थोड्याच काळाने भगवान राम आणि माता सीता यांना १४ वर्षे वनवास भोगावा लागला. एवढेच नाही तर त्यांना लग्नानंतर बराच काळ दुरावा देखील सहन करावा लागला. त्यांचे जीवन कायमच कष्टांनी भरलेले होते. आधी त्यांना वनवास मिळाला, त्यानंतर माता सीतेचे अपहरण झाले, पुढे सीता माता पुन्हा श्रीरामांकडे परतल्या. वनवास संपवून जेव्हा श्रीराम आणि सीता परतले तेव्हा देवी सीतेला अग्निपरीक्षेच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. यानंतर सर्व सुरळीत असताना अचानक प्रजेच्या सुखासाठी प्रभू रामाने माता सीताचा त्याग केला. जेव्हा त्यांना मुलं झाली आणि सीता मातेने आपली मुलं श्रीरामांकडे सोपवली त्यानंतर माता सीता यांनी आपले अवतारा कार्य संपवत त्या जमिनीमध्ये लीन झाल्या. (Latest Marathi News)
एकूणच काय तर विवाहानंतर श्रीराम आणि माता सीता यांना जास्त सुख लाभले नाही. त्यांनी सतत त्यांच्या नात्यासाठी, समाजासाठी, इतरांच्या सुखासाठी परीक्षा दिल्या. त्यामुळेच विवाह पंचमीचा दिवस जरी शुभ असला आणि या दिवशी पूजा केल्याने वैवाहिक सुख प्राप्त होत असले तरी यादिवशी कोणीही लग्न करत नाही. कारण यादिवशी ज्या लोकांचे लग्न होईल, त्यांना कायमच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते अशी धारणा आहे. (Top Trending News)
=========
Margashirsha : जाणून घ्या मार्गशीर्ष गुरुवारांचे महत्त्व
Champashashti : मल्हार मार्तंडाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व
=========
दरम्यान विवाह पंचमीच्या दिवशी सुखी वैवाहिक जीवनासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना गायीच्या दुधात केशर मिसळून अभिषेक करावा. असे केल्याने अविवाहित लोकांना लवकरच त्यांचा जोडीदार मिळू शकतो. या दिवशी राम-जानकी स्तुती चे पठण आणि उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत असेल त्यांनी या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी. विवाह पंचमीच्या दिवशी श्री राम स्तुती आणि श्री जानकी स्तुतीचे देखील पठण करावे. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
