बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांची एक खळबळ उडवून देणारी मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात शेख हसीना यांन दावा केला की, त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला नाही. तर त्यांना “अनिर्वाचित पद्धतीने” सत्तेवरून काढून टाकण्यात आले. या सर्वात मोहम्मद युनूस यांनी हे कारस्थान रचले त्याला पाकिस्तान आणि अमेरिकेचाही छुपा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप शेख हसीना यांनी केला आहे. (Sheikh Hasina)

या मुलाखतीमध्ये शेख हसीना यांनी त्यांच्या राजवटीचे पतन, त्यानंतर झालेला हिंसाचार आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली आलेले अंतरिम सरकार यावर चर्चा केली. यात बांगलादेशातील हिंदूंवर जे हल्ले झाले, तोही एका कटाचा भाग असल्याचे शेख हसीना यांनी सांगितले. मुख्य म्हणजे, शेख हसीना यांची ही मुलाखत नेमकी आली, तेव्हाच बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे समर्थक, मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारविरुद्ध निदर्शने करत आहेत. अवामी लीगवरील बंदी उठवावी आणि हसीना यांच्याविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घ्यावेत, या मागणीसाठी ढाक्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरु आहेत. यामुळे मोहम्मद युनूस यांच्या सरकारला धोका आहे. जमात-ए-इस्लामी आणि बीएनपी यांनीही युनूस सरकारविरुद्ध मोर्चा काढल्यामुळे बांगलादेशमध्ये राजकीय संकट वाढले असून हजारो तरुण पुन्हा बांगलादेशमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. (International News)
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना सध्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला लक्ष्य करत आहेत. त्याचवेळी बांगलादेशमध्ये युनूस यांच्याविरुद्ध उठाव सुरु झाला आहे. या दोन्ही घटनांची वेळ बघितल्यावर शेख हसीना पुन्हा सक्रीय होत असल्याची स्पष्ट होत आहे. यासाठी त्या बांगलादेशमधील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक करत आहेत. शिवाय भारतातून बांगलादेशातील राजकीय घडामोडींबाबत आढावा घेत आहेत. अशात त्यांची एक मुलाखत झाली आहे. या मुलाखतीमध्ये शेख हसीना यांनी दावा केला की, त्यांनी पंतप्रधान पद तात्पुरते पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कधीही राजीनामा दिला नाही किंवा सत्ताही सोडली नसल्याचे स्पष्ट केले. शेख हसीना या बांगलादेशाच्या चार वेळा पंतप्रधान झाल्या आहेत. बांगलादेशातील बंडानंतर सध्या शेख हसीना दिल्लीतील एका गुप्त ठिकाणी राहत आहेत. (Sheikh Hasina)

२०२४ मध्ये शेख हसीना यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात आले. तेव्हापासून त्या भारतात रहात आहेत. तेव्हापासून कुणासमोरही येत नसललेल्या शेख हसीना या बांगलादेशच्या राजकारणावर आपली नजर असल्याचा संदेश दिला आहे. त्यांनी याबाबत एक सविस्तर मुलाखत दिली आहे. यात त्या म्हणतात, त्यावेळी माझ्यासमोर दोन पर्याय होते, एकतर अतिरेकी शक्तींच्या मागण्यांपुढे झुकणे किंवा तात्काळ धोक्यापासून स्वतःला दूर करणे आणि माझ्या लोकांना पुढील हिंसाचारापासून वाचवणे. रक्तपात होऊ नये म्हणून मी तात्पुरता देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी माझ्या कुठल्याही पदाचा राजनामा दिलेला नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ऑगस्ट २०२४ पासून बांगलादेशातील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे सुनियोजित मोहिमेचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बांगलादेशची स्थापना विविधतेचा आदर करणाऱ्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही तत्त्वांवर झाली आहे. मात्र सध्याचा बांगलादेश भीतीच्या छायेत जगत आहेत. यासर्वाला मोहम्मद युनूस जबाबदार असून त्यांना पाकिस्तान आणि अमेरिकेचा पाठिंबा असल्याचा आरोपही हसीना यांनी केला आहे. (International News)
======================
हे देखिल वाचा : Country : ‘या’ अनोख्या देशात लग्न करण्यावर आणि मुलं जन्माला घालण्यावर आहे बंदी
======================
शेख हसीना यांची मुलाखत आल्यापासून बांगलादेशमध्येही पुन्हा आंदोलन सुरु झाले आहे. शेख हसीनाच्या समर्थकांनी मोहम्मद युनूस यांच्या विरुद्ध मोर्चा काढला आहे. अवामी लीग देशभरात निदर्शने करत आहे. सुरुवातीला शांततेत सुरु असलेली ही निदर्शने आता हिंसक झाली आहेत. शेख हसीना यांच्या समर्थकांनी राजधानी ढाकासह पाच जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखले. युनूस सरकारने शेख हसीना यांच्याविरुद्धचे दाखल मागे यावेत अशी त्यांची मागणी आहे. या सर्वात ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे बांगलादेशमधील परिस्थिती तणावपूर्वक आहे. शेख हसीना यांच्या पक्षाचे नेते, उपअमीर सय्यद अब्दुल्ला यांनी युनूस सरकारला अल्टिमेटम दिला आहे. शेख हसीनाच्या अवामी लीगवर मे २०२५ पासून बंदी घालण्यात आली आहे. ती उठवण्याचीही मागणी युनूस सरकारकडे करण्यात येत आहे. असे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. हे आंदोलन पुढच्या काही दिवसात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (Sheikh Hasina)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
