Home » Champashashti : मल्हार मार्तंडाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व

Champashashti : मल्हार मार्तंडाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Champashashti
Share

नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने ।
म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।।
मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं ।
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणच्या भक्तांचे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाला ओळखले जाते. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्य मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. सोन्याची जेजुरी अशी ओळख असलेली जेजुरी हे खंडोबाचे मुख्य ठिकाण समजले जाते. याच खंडोबाचा मुख्य सण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात येणारी चंपाषष्ठी. या चंपाषष्ठीच्या सहा दिवस आधी ‘खंडोबा नवरात्र’ सुरु होते. या सणाला महाराष्ट्रामध्ये मोठे महत्त्व आहे. (Champashashthi 2025)

खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान, कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या आणि अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र, चतुर्भुज, कपाळाला भंडारा असं आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील बहुसंख्य जातींचे कुलदैवत असले तरी त्याचा धनगरांशी आदिम संबंध आहे. तो कुरूब-धनगरांचा प्रिय देव आहे. खंडोबाचा मूळ इतिहास पांडुरंगा इतकाच पुरातन आहे. (Jejuri)

‘खंडोबाचे नवरात्र’ हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. या सणाला जरी नवरात्र म्हटले जात असले तरी हा खरा षड्रात्रोत्सव असतो म्हणजेच सहा दिवसांचे नवरात्र. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी, या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात. (Marathi News)

यावर्षी पंचांगानुसार, मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी म्हणजेच चंपषष्ठी तिथी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी सुरू होईल. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे १२ वाजून ०१ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, चंपाषष्ठी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी होईल. तर खंडोबा नवरात्र मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत असेल. हे नवरात्र २१ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या काळात साजरे केले जाईल. या नवरात्रात घटस्थापना २१ नोव्हेंबरला होईल आणि चंपाषष्ठीला म्हणजे २६ नोव्हेंबरला याचा समारोप होईल. ज्याचे कुलदैवत खंडोबा असतं त्यांच्या घरात नवरात्रीत घटस्थापना केली जाते. खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करावी? चंपाषष्ठीला काय केले जाते याबद्दल जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Champashashti

खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करावी?
घरातील मुला मुलींचे लग्न जुळण्यासाठी, आर्थिक समस्या आणि करिअर यासारख्या अनेक समस्या दूर होण्याठी कुलदैवतीची कृपा असणे गरजेचं आहे. कुलधर्म, कुलाचार हा केलाच पाहिजे. घटस्थापना आपल्या घरी होत नसेल तरी आपल्या सर्वांचं कुलदैवत भगवान शंकर आहे. तर खंडोबा हे भगवान शंकराचं रुप आहे. म्हणूनच या नवरात्रीत खंडोबाचं मंत्र, ग्रंथ वाचन आणि पूजा नक्की करा. (Top Marathi News)

घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवघर स्वच्छ करून घ्यावे. देवघरातील सर्व देवांना स्नान अभिषेक करुन पूजा करावी. त्यानंतर देवघराजवळची जागा स्वच्छ करावी. ज्याठिकाणी तुम्हाला घटस्थापना करायची आहे. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्या. एक चौरंग घ्यावा त्यावर पिवळे वस्त्र घालावं. आता त्यावर श्री स्वामी समर्थ यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. जर तुमच्याकडे खंडोबाचा फोटो असेल तर तो नक्की ठेवा. चौरंगाभोवती रांगोळी काढावा. घटस्थापनची सुरुवात दिपपूजाने करा. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. (Latest Marathi Headline)

दिपपूजन झाल्यानंतर आचमन करायचं. पूजेपूर्वी शुध्दीकरणासाठी नामजपासह शुद्ध पाणी ग्रहण आचमन केलं जातं. भगवान विष्णूच्या २४ नावाचं उच्चार करा. उजव्या हातात थोड पाणी घ्या, एखाद फुलं, हळद, कुंकू, अक्षदा आणि आता मनोमन खंडोबांचं स्मरण करुन कुलदेवीला संपूर्ण कुटुंबासाठी संकल्प करावा. गणरायची पूजा करावी. त्यासाठी बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्या. आता घटस्थापना करुन कलशाची पूजा करावी. त्यानंतर तुमच्या देवघरातील खंडोबाचा टाक घ्यावा आणि ताम्हनामध्ये त्याचा अभिषेक करुन चौरंगावर विड्याचा पानावर स्वस्तिक काढून त्यावर टाकाला ठेवावे. खंडोबा महाराजांना हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भंडारा नक्की वाहवा. पूजा झाल्यावर पहिल्या दिवशी घटावर विड्याच्या पानाची माळ बांधावी. या काळामध्ये खंडोबा मंत्र ॐ श्री खंङेराया मार्तंङ भैरवाय नमः जप करावा. (Top Marathi Headline)

Champashashti

खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा नवा कांदा व नवा लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन ‘सदानंदाचा येळकोट’ किंवा ‘एळकोट एळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. (Latest Marathi News)

खंडोबाच्या पूजेसाठी सोमवती अमावस्या, चैत्री श्रावणी, माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे. महाराष्ट्रातील जेजुरी येथे खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात इथे मोठ्या संख्येने भाविक जमतात. बहुतेक सर्व खंडोबा देवस्थानांत देवदीपावलीनिमित्त दीपोत्सव होतो, तो चंपाषष्ठीपर्यंत किंवा निदान त्या दिवशी असतो. श्री दावडी निमगांव मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानातर्फे हा चंपाषष्ठीचा दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. (Top Trending Headline)

जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन, कुळधर्म कुळाचाराला विशेष महत्त्व आहे. जेजुरी गडावर शंकर आणि पार्वती हे खंडोबा आणि म्हाळसेच्या रूपात असल्याने जेजुरीला येऊन नवविवाहित दाम्पत्यांनी देवकार्य करण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून सुरु आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पहिल्या पाच पायऱ्या वराने वधूला उचलून घेणे, देवदर्शन, तळीभंडार, कुळधर्म कुळाचाराप्रमाणे जागरण गोंधळ, लंगर तोडणे हे विधी केले जातात.
लोकांच्या हाकेला धावणारा, पावणारा लोकांचा देव असं खंडोबाला म्हटलं जातं. अठरापगड जातीचे लोक खंडोबाला मानतात. (Top Stories)

============

Shriram : जाणून घ्या मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजऱ्या होणाऱ्या विवाह पंचमीचे महत्त्व

Vivah Panchami : विवाह पंचमीला सुखी वैवाहिक जीवनासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

============

खंडोबाची आरती मराठी
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥ (Social Updates)
सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥
रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥ (Social News)

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.