Home » Health : आरोग्यासाठी वरदान असलेल्या गुळवेलच्या सेवनाचे ‘हे’ आहेत मोठे फायदे

Health : आरोग्यासाठी वरदान असलेल्या गुळवेलच्या सेवनाचे ‘हे’ आहेत मोठे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आजच्या काळात आपण सर्वच लोकं कोणताही लहान मोठा आजार झाला असेल तर घरगुती उपचार करण्यावर प्राधान्य देतो. किंवा अनेक लोकं आयुर्वेदिक उपचार घेताना दिसतात. अलोपेथिक औषधांचा वापर बऱ्यापैकी लोकं कमी करताना दिसत आहे. आपल्या आजीच्या बटव्यातील उपचार सध्या चांगलेच गाजत आहे. आपल्या देशांमध्ये औषधी वनस्पतींचे भांडार आहे. यातलीच एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे, ‘गुळवेल’. याच वनस्पतीला गिलॉय, अमृतवेल देखील म्हटले जाते. या झाडाचे औषधी गुणधर्म बघता याचे नाव ‘अमृतवेल’ पडले आहे. (Health)

कोरोनाच्या काळात आपण गिलॉय हा शब्द सतत ऐकला असेल. गिलॉयचा रस, गोळ्या, पाने आदी अनेक गोष्टी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. म्हणूनच कोरोना काळात गिलॉयला कमालीचे महत्त्व आले होते. जवळपास सर्वच लोकं मेडिकलमधून गिलॉय ज्यूस, गिलॉयच्या गोळ्या आणून खात होते. गिलॉयचे औषधी गुणधर्म खूपच कमालीचे आहेत. मात्र केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापुरतीच गिलॉय उपयोगी आहे असे अजिबातच नाही. गुळवेल किंवा गिलॉय खाण्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय मोठे आणि महत्त्वाचे फायदे आहेत. (Marathi)

गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत. यामध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत. हे घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. आजारपणामध्ये प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. गुळवेलीमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. (Social Updates)

Health

गुळवेलीची पानं ही दिसायला साधारणपणे विड्याच्या पानांसारखी असतात. ज्या जमिनीत गुळवेलचे झाड उगवते त्या भागातल्या जमिनीच्या पाण्याची पातळी अजिबात कमी झालेली नसते. गुळवेलीच्या पानांचा आकार हा हृदयाप्रमाणे असतो म्हणून तिचं शास्त्रीय नाव कॉर्डिफोलिया असे आहे. गुळवेलच्या पानं ही चवीला कडू आणि तिखट असली तरीही तिचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत. गुळवेलीचा रस प्यायल्यामुळे अनेक आजार दूर व्हायला मदत होते. जाणून घेऊया गुळवेल या वनस्पतीचे फायदे. (Todays Marathi Headline)

उच्च रक्तदाबावर लाभदायक
गुळवेलीच्या पानांचा रस प्यायल्यामुळे रक्तदाब कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलीच्या पानं खावीत किंवा पानांचा रस प्यावा. (Top Trending News)

डायबिटीसवर गुणकारी
गुळवेलीचा रस प्यायल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहाते.त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलीचं सेवन करावं. गुळवेलाचीपावडर रोज सकाळी उपाशीपोटी पाण्यात मिक्स करून पिण्याने फायदा मिळतो. (Health Care)

कोलेस्ट्रॉल आणते नियंत्रणात
गुळवेलात अनेक घटक आढळतात, जे सेवन केल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांसाठी गुळवेलाचा रसही गुणकारी ठरतो. गुळवेलात अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून शरीरातील चिकट असा साचलेला कोलेस्ट्रॉल काढण्यास फायदा होतो आणि त्याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून स्वच्छता निर्माण करण्यात मदत मिळते. (Top Marathi Headline)

तापामध्ये फायदेशीर
गुळवेल तीव्र ताप कमी करण्यास मदत करतो. गुळवेल डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया यासारख्या बर्‍याच रोगांवर फायदेशीर ठरतो. गुळवेल तीव्र, वारंवार येणाऱ्या तापावर फायदेशीर ठरतो. गुळवेळ हा एक दाहक-विरोधी, अँटीपायरेटिक औषधी वनस्पती आहे. जी संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. (Marathi News)

​रक्त पेशी वाढतात
डेंग्यू आजारावर गुळवेल रामबाण उपाय आहे. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट कमी होतात. यामुळे मृत्यू ओढावण्याचीही शक्यता असते. गुळवेलीतील पोषक घटकांमुळे शरीरातील रक्त पेशींची संख्या वाढण्यास मदत मिळते. गुळवेलीमुळे पचनाशी संबंधित असलेल्या समस्याही कमी होतात. जुलाब, अतिसार इत्यादी समस्यांपासून सुटका होते. गुळवेलीमुळे पचनप्रक्रिया मजबूत होते. पचनक्रिया सुरळीत सुरू असल्यास कित्येक आजारांचा धोका टळतो. (Top Marathi Headline)

रोगप्रतिकारशक्ती वाढते
गुळवेलीचा रस प्यायल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामुळे हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण करता येतं. जर तुम्हाला सतत भरपूर ताप, सर्दी किंवा खोकल्चा त्रास होत असेल तर गुळवेलचा रस तुमच्यासाठी या आजारांवर गुणकारी ठरू शकतो. (Latest Marathi news)

Health

​त्वचेच्या समस्या
नियमित स्वरुपात गुळवेलीचे सेवन केलं तर तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या कमी होतील. त्वचा मऊ आणि सतेज होईल. कारण गुळवेलीमध्ये पचनप्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि रक्तशर्करा नियंत्रित राहण्यास उपयुक्त पोषक घटकांचा समावेश आहे. यामुळे आपल्या त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येते. गुळवेलचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्वचेच्या समस्यांसाठी तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागडी ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. (Top Marathi news)

हृदय ठेवते चांगले
आजकाल खाण्यापिण्यात समस्या असल्यामुळे सर्वात पहिला परिणाम हा हार्टवर होतो. हृदयाची काळजी घेण्यासाठी गुळवेल चांगले ठरते. अँटीऑक्सिडंट आणि प्लांट कंपाऊंड हे चांगला स्रोत असून हृदयाचा आरोग्यासाठी लाभदायी ठरते. गुळवेलाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. (Latest Marathi Headline)

​डोळ्यांसाठी फायदेशीर
गुळवेल ही औषधी वनस्पती डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गुळवेलचा फार पूर्वीपासून उपयोग केला जात आहे. यामुळे चष्म्याचा नंबर देखील कमी होतो. आवळा आणि गुळवेलीचा रस एकत्र करून प्यायल्यास दृष्टी सुधारते. दरम्यान गर्भवती महिलांनी गुळवेलीचे सेवन करू नये. कारण यामुळे रक्तदाब कमी होतो किंवा जास्त प्रमाणात वारंवार मूत्रविसर्जन होऊन शरीरातील पाणी कमी होते. यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती असते. (Top Trending News)

गुळवेलचे सेवन कसे करावे?
गुळवेलीची पाने सुकवून त्याची पावडर तयार केली जाते. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये गुळवेलचा काढा, गोळ्या, रस किंवा पावडर उपलब्ध असतात. याचे कशापद्धतीने सेवन करायचे याबाबत सल्ला डॉक्टरांकडूनच घ्यावा. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिवसभरात १ ग्रॅमहून अधिक गुळवेलीचे सेवन करू नये. तसंच पचनप्रक्रिया बिघडलेली असेल तर गुळवेलचे सेवन करणं टाळा. रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे औषध घ्यावे. (Top Stories)

=========

Winter Health : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी घ्या सकस आणि पौष्टिक आहार

Winter : हिवाळ्यात मेथीचे लाडू खाल्ल्याने होतात आरोग्याला मोठे लाभ

=========

लक्षात ठेवा
घरातली लहान मुलं सतत आजारी पडत असतील तर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना गुळवेलीचा रस देऊ नये. यासोबतच गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी गुळवेलीचा रस पिऊ नये. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गुळवेलीचा रस प्यायल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गुळवेलीपासून लांब राहावे. यकृताच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी गुळवेलीचा रस पिणं धोक्याचं ठरू शकते. (Social News)

(टीप : ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. कोणतेही रूपाचे करण्याआधी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.