Home » Country : ‘या’ अनोख्या देशात लग्न करण्यावर आणि मुलं जन्माला घालण्यावर आहे बंदी

Country : ‘या’ अनोख्या देशात लग्न करण्यावर आणि मुलं जन्माला घालण्यावर आहे बंदी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Country
Share

साधारणपणे या जगात एकूण १९५ देश आहेत. प्रत्येक देशाचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे, आणि वेगळी ओळख आहे. कोणता देश त्याला लाभलेल्या सौंदर्यामुळे खास आहे, तर कोणता देश त्या देशाच्या संस्कृतीमुळे खास आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक देशाची एक वेगळी ओळख या जगात आहे. मात्र या जगामध्ये एक असा देश आहे, ज्या देशाची ओळख तर अनेक अर्थाने खास आहे, मात्र या देशाच्या नावांमध्ये ‘सिटी’ येते. त्यामुळेच जे लोकं या देशाबद्दल ऐकतात त्यांना वाटते की, हा नक्की देश आहे की, सिटी आहे. हा देश एका देशाच्या राजधानीच्या शहरामध्ये अगदी मध्यभागी स्थित आहे. ऐकून आश्चर्य वाटले असेल ना…? (Country)

एका शहराच्या मध्यभागी एक देश थोडे विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. जगातील सर्वात लहान स्वतंत्र देश म्हणून ‘व्हॅटिकन सिटी’ या देशाला ओळखले जाते. व्हॅटिकन सिटी हा देश अनेक कारणांसाठी इतर देशाच्या तुलनेत वेगळा ठरतो. पर्यटकांसाठी देखील हा देश मुख्य आकर्षण आहे. या देशामध्ये मागील तब्बल ९६ वर्षांपासून एकही मुल जन्माला आलेले नाही… तर या देशात महिलांची संख्या देखील खूपच कमी आहे. जाणून घेऊया या देशाबद्दल अधिक अतिशय रंजक माहिती. (vatican city)

सर्वात प्रमुख ख्रिश्चन धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर व्हॅटिकन सिटी जगभरात कमालीची प्रकाशझोतात आली. पोप फ्रान्सिस इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी वसलेल्या स्वतंत्र देश व्हॅटिकन सिटीमध्ये राहत होते. राजधानी रोमच्या मध्यभागी असलेल्या जगातील सर्वात लहान देशाची ओळख कशी झाली. व्हॅटिकन सिटी रोमच्या मध्यभागी वसलेला जगातील सर्वात लहान देश आहे. व्हॅटिकन सिटी हे इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी वसलेले एक अत्यंत लहान पण महत्वाचे स्वतंत्र राष्ट्र आहे. केवळ ०.४९ चौ.किमी क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात लहान देश आहे. हा देश फक्त ४४ हेक्टरमध्ये पसरलेला आहे, परंतु त्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव संपूर्ण जगभरात खोलवर आहे. (Marathi News)

Country

व्हॅटिकन सिटीची एकूण लोकसंख्या ८०० पेक्षाही कमी आहे, ज्यात बहुतेक लोकं हे पुजारी आणि चर्चचे अधिकारी आहेत. व्हॅटिकन सिटी या छोट्याशा देशाची राज्यव्यवस्था पूर्णपणे कॅथोलिक चर्चद्वारे चालविली जाते आणि येथील कायदे आणि नियम धार्मिक दृष्टिकोनातून बनवले गेले आहेत. व्हॅटिकन सिटी केवळ एक ऐतिहासिक स्थळ नसून ख्रिश्चन धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र देखील आहे. येथे स्थित सेंट पीटर्स बॅसिलिका आणि सिस्टिन चॅपल यासारखी प्रसिद्ध धार्मिक स्थळे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. हा छोटासा देश त्याच्या धार्मिक महत्त्वामुळे आणि विशिष्टतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. (Todays Marathi Headline)

या देशाच्या एकूण क्षेत्रापैकी २३ हेक्टर क्षेत्रामध्ये व्हॅटिकन गार्डन पसरलेले आहे. याची निर्मिती इटलीत पुनर्जागरणादरम्यान झाली होती आणि पोप निकोलस ३ यांनी या गार्डनच्या चहुबाजूंनी भिंत बांधली होती. १९४३ मध्ये द्वितीय महायुद्धादरम्यान र्जमन सैन्याने रोम शहरावर ताबा मिळवला होता; परंतु व्हॅटिकन सिटीला कोणतेच नुकसान पोहोचले नाही. त्यावेळच्या पोप यांनी युद्धात निष्पक्ष राहण्याचे धोरण अवलंबले होते. शासन व्यवस्था राजेशाहीवर आधारित असणारी व्हॅटिकन सिटी युरोपातील एकमेव देश आहे. पोपची निवड होते आणि पोप तेथील शासन व्यवस्थेचा प्रमुख असतो. विधानसभा, न्यायपालिका आणि कार्यपालिकेचे सर्व अधिकार त्यांना असतात. आतापर्यंत संयुक्त राष्ट्राचा सदस्य नसलेल्या देशांमध्ये व्हॅटिकन सिटीचा समावेश आहे. (Top Stories)

या ठिकाणी पीटर बेसिलिका आणि व्हॅटिकन संग्रहालय आहे. सॅन मारिनो, इटलीच्या अपेनिन पर्वतरांगांमध्ये हा देश आहे. जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक हा देश आहे. या ठिकाणी भव्य वास्तुकला, सुंदर दृश्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. व्हॅटिकन सिटीचे काही कायदे आणि नियम इतर देशांपेक्षा खूपच वेगळे आहेत. येथे राहणारे बहुतेक लोक ब्रह्मचारी पुजारी असतात ज्यांना लग्न करण्याची किंवा मुलांचे पालक बनण्याची परवानगी नसते. याचा उद्देश अशा व्यक्तींना समर्पित जीवन जगण्याची संधी देणे हा आहे ज्यांना आपले आयुष्य पूर्णपणे चर्च आणि धर्माच्या सेवेसाठी अर्पण करायचे आहे. (Top Trending Headline)

Country

व्हॅटिकन सिटीमध्ये मुलांच्या जन्मासाठी कोणतेही रुग्णालय किंवा वैद्यकीय केंद्र नाही, कारण येथील नागरिक प्रामुख्याने पुजारी असतात ज्यांना लग्न करण्याची परवानगी नसते. मात्र, काही पुजाऱ्यांनी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा मोडली आणि त्यांना मुलेही झाली आहेत, परंतु हे फार दुर्मिळ आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये रुग्णालय नसल्याने, जर एखादी महिला गर्भवती झाली तर तिला बाळंतपणासाठी देशाबाहेर जावे लागते. हा नियम १९२९ पासून लागू आहे आणि आजपर्यंत येथे एकाही मुलाचा जन्म झालेला नाही. (Top Marathi News)

व्हॅटिकन सिटीमध्ये ड्रेस कोड देखील अत्यंत कडक आहे. येथील स्त्री आणि पुरुषांसाठी विशेष ड्रेस कोड आहे, ज्यामध्ये मिनी स्कर्ट, शॉर्ट्स आणि स्लिव्हलेस ड्रेस घालण्याची परवानगी नाही. याशिवाय, व्हॅटिकन सिटीमध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी काही विशेष नियम आहेत. येथे नागरिकत्व केवळ अशाच लोकांना दिले जाते जे शहरात काम करतात, जसे की शिक्षक, पत्रकार किंवा इतर सरकारी कर्मचारी. व्हॅटिकन सिटी केवळ जगातील सर्वात लहान देश नाही तर ख्रिश्चन धर्माचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे स्थित सेंट पीटर्स बॅसिलिका, जी जगातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक आहे आणि व्हॅटिकन म्युझियम जे कला आणि इतिहासाचा विशाल संग्रहालय आहे, दोन्ही जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. (Latest Marathi Headline)

व्हॅटिकन सिटी धर्म, कला आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध आहे. या देशात काही मुख्य पर्यटन स्थळं आहेत, ज्यात सेंट पीटर्स बॅसिलिका हे स्थान असून, जे ख्रिश्चन जगतातील सर्वात भव्य चर्च आहे, येथेच पोप आपली धार्मिक प्रवचने देतात. दुसरे व्हॅटिकन म्युझियम्स हे जगातील सर्वोत्तम कला संग्रहालयांपैकी एक आहे. ज्यात माइकेलएंजेलो, राफेल यांच्यासारख्या कलाकारांची अप्रतिम कलाकृती आहेत. यासोबतच या देशात सिस्टीन चॅपेल हे ठिकाण देखील प्रसिद्ध आहे. येथे माइकेलएंजेलोचे सुप्रसिद्ध “The Last Judgment” आणि छतावरील चित्रकाम पाहता येते. शिवाय व्हॅटिकन गार्डन्स जे विश्रांतीसाठी आणि हरित सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. सेंट पीटर्स स्क्वेअर जागा जिथे पोपची सार्वजनिक भेट किंवा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो लोक येथे एकत्र येतात. (Top Stories)

========

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये उत्तम नफा मिळवण्यासाठी ‘या’ आहेत भन्नाट योजना

SBI १ डिसेंबर २०२५ पासून बंद करणार ही सर्विस खातेदारांना होईल मोठा परिणाम

========

व्हॅटिकन सिटीमध्ये ‘पोप’ (कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च नेते) यांचे मुख्यालय आहे आणि येथून जगभरातील कॅथोलिक लोकांचे मार्गदर्शन केले जाते. व्हॅटिकन सिटीचे संविधान खूपच वेगळे आहे. ते धार्मिक दृष्टीकोनातून चालवले जाते आणि त्याचे कोणतेही स्थायी संविधान नाही. येथील कायदे आणि नियम प्रामुख्याने कॅथोलिक चर्चच्या धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये पोप हेच सर्वोच्च शासक असतात आणि ते सर्व प्रमुख निर्णय घेतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.