Home » Winter Health : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी घ्या सकस आणि पौष्टिक आहार

Winter Health : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी घ्या सकस आणि पौष्टिक आहार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Winter Health
Share

हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये भूक कमालीची वाढलेली असते आणि शरीराची पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये भूक जास्त लागते. हा ऋतू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच लाभदायक देखील आहे. या ऋतूमध्ये केलेला व्यायाम आणि घेतलेला सकस आहार आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक ठरतो. मात्र हिवाळा म्हणजे थंडी आणि थंडीमुळे सर्दी, खोकला किंवा इतर आजार होणे खूपच सामान्य असते. (Winter)

वातावरण कमालीचे थंड असल्याने या ऋतूमध्ये शरीर अधिक गरम आणि उबदार कसे राहील याकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळेच या ऋतूमध्ये उष्ण पदार्थाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मग त्यातही नक्की काय खावे आणि काय खाऊ नये हा सवाल देखील आहेच. हिवाळ्याच्या आहाराचे नियोजन करताना, तो आहार पौष्टिक असेल; परंतु वजन वाढवणारा नसेल, याची सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. या ऋतूमध्ये नक्की कोणता आहार घ्यावा जो आपल्याला निरोगी आणि सुधृढ ठेऊ शकतो. अशा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण जाणून घेऊया हिवाळ्यात कोणता आहार घेणे योग्य असते. (Health Care)

हिवाळ्यामध्ये पालक, कोबी आदी भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. या भाज्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतात. पालक आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये आढळणारे कॅरोटीनॉइड्स, बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हिवाळ्याच्या संसर्गापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतात. या दिवसांत भाज्या खूप चांगल्या प्रतीच्या व भरपूर प्रमाणात मिळतात. पालेभाज्यांचा तर हा सर्वोत्तम काळ आहे. त्यांचा वापर भरपूर करावा. हिरव्या भाज्यांमधील ‘अ’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे थंडीत खाणेही चांगले आहे. (Marathi News)

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात संपूर्ण धान्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. तुमच्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश केला तर ते तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करेल. कारण हे मॅग्नेशियम, लोह आणि जस्त, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. थंडीत मूग, मटकी, तूर, उडिद, चवळी, वाल ही कडधान्ये खावीत. (Todays Marathi Headline)

Winter Health

शुद्ध देशी तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. अन्न तुपात शिजवावे किंवा भात, वरण, पोळीवर तूप लावून त्याचे सेवन करावे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या फॅट्सचा एक अमूल्य स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची पातळी सुधारण्यासाठी तूप हा एक सोपा मार्ग आहे. यासोबतच शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध, दही, चीज आणि ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. (Top Trending Headline)

आपली प्रतिकारशक्ती चांगली करायची असेल तर सुक्या मेव्याचे सेवन देखील करू शकता. काजूमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक (जस्त) अशी अनेक खनिजे असतात. हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाणे, बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. प्रथिने, पोटॅशियम आणि कॅल्शियमसह अनेक आवश्यक पोषक घटक बदाम, काजू, अक्रोड आणि मनुका यांसारख्या सुक्या फळांमध्ये आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने हिवाळ्यात आजारी पडण्यापासून बचाव होतो. (Top Marathi News)

गाजर खावे हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गाजर हेही त्यापैकीच एक आहे. एका संशोधनानुसार, ज्या लोकांनी तीन आठवड्यांसाठी दररोज सुमारे एक कप गाजर खाल्ले, त्यांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी आढळून आली. थंडीत मिळणारे लाल गाजर रोज घ्यावे. सॅलड, कोशिंबीर, सूप असे गाजराचे पदार्थ रोज करा. कधीतरी गाजर हलवा करता येईल. गाजरात ‘अ’ जीवनसत्त्व असते. (Latest Marathi Headline)

हिवाळ्यात फळेदेखील छान मिळतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत ताजी फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे विशेष महत्त्वाचे ठरते. संत्री, मोसंबी, डाळिंब, पपई यामध्ये जीवनसत्व ‘C’ मुबलक प्रमाणात असल्याने ते प्रतिकारशक्ती वाढवतात. कोणतेही लिंबूवर्गीय फळ खाऊन तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवू शकता. त्यातून जीवनसत्त्वे, खनिजे, चोथा व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक मिळतील. त्वचा व केसांचे चांगले पोषण होईल. (Top Trending News)

======

Winter Dite : हिवाळ्यात चणा आणि गूळ एकत्र खाणे किती फायदेशीर, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या                                    

Antarctica : हवामान बदलाचा असाही परिणाम !

Winter : हिवाळ्यात मेथीचे लाडू खाल्ल्याने होतात आरोग्याला मोठे लाभ

Amla : हिवाळ्यात दररोज आवळा खाल्ल्याने होतील ‘हे’ मोठे लाभ

======

हिवाळ्यात उबदार पेयांचे सेवनही खूप फायदेशीर ठरते. आलं-तुळशीचा काढा, हळदीचे दूध, सूप यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो. मुख्य म्हणजे हिवाळ्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी पिण्याचीही काळजी घ्यावी. शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राहिलं तर त्वचा, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती सर्व व्यवस्थित कार्य करतात. पचनासाठी पाणी आवश्यक आहे. हिवाळ्यात थंड तापमानामुळे सारखी तहान लागत नाही, म्हणून काही लोकांचे पाणी पिण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळेच या दिवसांमध्ये लक्षात ठेऊन किमान एक ते दीड लिटर पाणी दिवसाला पिणे आवश्यक आहे. यासोबतच सकाळी किती उठायचा आळस आला तरी उठून व्यायाम करणे, चालणे  गरजेचे आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहाल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

( टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.