Home » Winter Fashion : हिवाळ्यात फॅशन फॉलो करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Winter Fashion : हिवाळ्यात फॅशन फॉलो करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

by Jyotsna Kulkarni
0 comment
Winter Fashion
Share

संपूर्ण राज्यामध्ये सध्या मस्त गुलाबी थंडी जाणवत आहे. राज्यामध्ये कमालीचे तापमान घसरले असून, थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्याच ठेवणीत असलेले स्वेटर, मफलर, टोप्या आदी अनेक थंडीचे कपडे बाहेर निघाले आहेत. आता थंडी म्हटले की, घरातून बाहेर पडताना अंगावर आपल्या कपड्यांसोबतच स्वेटर, जॅकेट, जर्किन आदी थंडीपासून बचावाच्या गोष्टी घालणे अत्यावश्यक असते. अशावेळेस फॅशन फॉलो करणाऱ्या लोकांना मात्र फारच दुःख होते. (Winter Fashion)

कारण थंडीमुळे त्यांचे छानछान असे फॅशनेबल कपडे स्वेटर, जॅकेटमुळे झाकले जातात आणि फॅशन नीट फॉलो होऊ शकत नाही. कितीही महागडे आणि फॅशनेबल कपडे परिधान केले तरी त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही. कारण स्वेटरच्या खाली ते झाकले जातात. मात्र आम्ही आज तुमच्या या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत. हिवाळ्यात देखील तुम्ही ट्रेंडिंग फॅशन मस्त फॉलो करू शकता आणि थंडीचा आनंद देखील घेऊ शकता. (Winter)

हिवाळ्यात आपण फॅशनचा विचार करण्यापूर्वी स्वत:ला उबदार राहणे जास्त आवश्यक आहे. स्वतःला उबदार ठेवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे थर्मल इनरवेअर असणे आवश्यक आहे. यासोबतच थाईज हे हिवाळ्यातील फॅशनमधले सर्वांत लोकप्रिय आणि ट्रेंडिंग आऊटफिट आहे. हिवाळ्यातील फॅशन म्हणजे कम्फर्टसह स्टाईल करणं. तुम्ही तुमचे आवडते ड्रेस थाईजसोबत स्टाईल करू शकता. यामध्ये शीर, प्रिंटेड, ब्राईट निऑन किंवा क्लासिक ब्लॅक कलर तुम्ही निवडू शकता. हे थाईज तुम्हाला थंडीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात, तसेच तुमची स्टाईलही मेंटेन राहते. (Marathi)

हिवाळ्यात योग्य फॅब्रिकची निवड करणे गरजेचे आहे. एक कापड जे केवळ आपल्या शरीरास उबदार करत नाही तर आपले व्यक्तिमत्त्व वाढविण्यास देखील मदत करते आणि आपल्याला परिधान करण्यास आरामदायक बनवते. ह्यांमध्ये लोकरीचे अनेक प्रकार मिळतील. पॉलिस्टर, फ्लॅनेल, मखमल, ट्वीड आणि कृत्रिम फर फॅब्रिक उपलब्ध असतील. याशिवाय लेदर किंवा डेनिम हे देखील एक चांगले फॅब्रिक आहे. यासोबतच लेयरिंगनुसार त्याची निवड करा. (Todays Marathi Headline)

Winter Fashion

विंटर फॅशन फॉलो करताना तुम्हाला लॉन्ग श्रगचा खूपच फायदा होणार आहे. योग्य लॉन्ग श्रग तुम्हाला वेधक लूक देईल यात काहीच शंका नाही. या लॉन्ग श्रगला तुम्ही कुठल्याही ड्रेससह सोबत, टॉप्ससोबत तुम्ही पेयर करू शकता. यामुळे क्लासी दिसाल. हिवाळ्यात नीलेन्थ श्र, फुल लेन्थ श्रग, काळे आणि रंगीबेरंगी असे अनेकप्रकारचे श्रग आहेत. पेन्सिल ड्रेस घालण्यात संकोच वाटत असेल तर तो तुम्ही विंटर लॉन्ग श्रगसोबत घालू शकता. (Latest Marathi News)

फॅशन जॅकेट आणि कोटशिवाय हा ऋतू अपूर्ण आहे. हे केवळ थंडीपासूनच आपले संरक्षण करत नाही तर आपले स्टाईल स्टेटमेंट देखील सांगते. लेदर जॅकेट्स, ट्रेंच कोट, ब्लेझर आणि पफ जॅकेट्स सारख्या कपड्यांमध्ये गुंतवणूक करा. हिवाळ्याच्या हंगामासाठी आपण चांगल्या गुणवत्तेचे 4 ते 5 जॅकेट आणि कोट खरेदी करू शकता, म्हणून आपल्या ट्राउझर्स किंवा जीन्सचा रंग लक्षात घेऊन कॉन्ट्रास्ट खरेदी करणे चांगले आहे, जेणेकरून भविष्यात कलर कॉन्ट्रास्ट खराब होणार नाही. (Top Marathi News)

वेल्वेट फेब्रीक देखील थंडीमध्ये फॅशन जपण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यात अनेक चांगले रंग वेल्वेट फेब्रीकचे कपडे समारंभासाठी सर्वोत्तम मानले जातात, कारण त्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही. हा पोशाख तुम्हाला केवळ ग्लॅमरस लुकच देत नाहीत, तर ते परिधान केल्याने तुम्ही खूप स्टायलिश देखील दिसता. हिवाळ्यात गडद रंगाचे मखमली कपडे परिधान केल्याने तुम्ही अगदी रॉयल दिसाल. शिवाय या कपड्यांमध्ये थंडी जाणवणार देखील नाही. हिवाळ्यातील कपड्यांमध्ये स्वेटर ड्रेस कमालीचे लोकप्रिय होताना दिसत आहे. स्वेटर ड्रेसमध्ये तुम्हाला थंडीत कन्फरर्ट देईल, तसेच स्टाइल देखील देईल. या ड्रेससोबत तुम्ही लेगिंग्स, स्नीकर्स किंवा बूट वगैरे घालू शकता.जर तुम्हाला काही कॅज्युअल लुक हवा असेल तर स्वेटर ड्रेस तुमच्यासाठी योग्य आहे. (Latest Marathi Headline)

थंडीच्या काळात बूट्स हा फार चांगला पर्याय असतो. यामुळे थंडीपासून संरक्षण तर होतं, त्याशिवाय वेगळा स्टाईलिश लूकही मिळतो. जिन्स, स्कर्ट, ड्रेस यासारख्या कोणत्याही आऊटफिटवर तुम्ही बूटस वापरु शकता. आपला लूक सुधारण्यासाठी पादत्राणे खूप महत्त्वाची आहेत. चुकीच्या पादत्राणांमुळे थंडी वाजू शकते. म्हणूनच, हिवाळ्यासाठी घोट्याचे बूट, गुडघ्यापर्यंत लांबीचे बूट किंवा लांब बूट सर्वोत्तम असतील. लेदर शूज किंवा स्नीकर्स देखील एक चांगला पर्याय आहे. अरुंद जीन्स किंवा बॉडीकॉन ड्रेससह लांब बूट हा एक चांगला पर्याय आहे. (Top Stories)

=======

Winter Dite : हिवाळ्यात चणा आणि गूळ एकत्र खाणे किती फायदेशीर, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या                                    

Antarctica : हवामान बदलाचा असाही परिणाम !

Winter : हिवाळ्यात मेथीचे लाडू खाल्ल्याने होतात आरोग्याला मोठे लाभ

Amla : हिवाळ्यात दररोज आवळा खाल्ल्याने होतील ‘हे’ मोठे लाभ

=======

हिवाळ्यातील अॅक्सेसरीज केवळ स्टाइलिश नाहीत, तर फंक्शनल देखील असतात. या अॅक्सेसरीज तुम्हाला थंडपणापासून संरक्षण देतात. हिवाळ्यात स्कार्फ अत्यंत आवश्यक असतो. मोठे निट स्कार्फ, कॅश्मिर रॅप्स किंवा वूल स्कार्फ्स चांगले पर्याय असतात. याशिवाय हिवाळ्यात तुम्हाला जबरदस्त लूक देण्यासाठी हॅट्स देखील चांगला पर्याय आहे. एक उबदार हॅट तुमच्या डोक्याला वारा आणि थंडीपासून वाचवते. वूल किंवा फ्लीस-लाइन्ड हॅट्स चांगले असतात. लेदर ग्लव्हज किंवा वूल मिटन्स तुमच्या हातांना उब देतात. फुर ट्रिम असलेल्या ग्लव्हज स्टाइलिश दिसतात. वूल किंवा फ्लीस-लाइन्ड लेगिंग्ज तुमच्या पोशाखास उब देतात. हे स्कर्ट किंवा ड्रेसच्या खाली घालू शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.