Home » Bangladesh Temple Attack: बांगलादेशात होळीपूर्वी इस्कॉन मंदिरावर हल्ला, 150 लोकांनी केली तोडफोड

Bangladesh Temple Attack: बांगलादेशात होळीपूर्वी इस्कॉन मंदिरावर हल्ला, 150 लोकांनी केली तोडफोड

by Team Gajawaja
0 comment
ढाका
Share

हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी बांगलादेश सरकारच्या सर्व आश्वासनांचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका मंदिराला गुरुवारी रात्री अतिरेक्यांनी लक्ष्य केले. मूलतत्त्ववाद्यांनी मंदिराची तोडफोड करून लूट केली. यादरम्यान अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

रात्री आठच्या सुमारास झाला हा हल्ला

या प्रकरणी हिंदू अमेरिकन फाउंडेशन (HAF) ने अधिकृत वेबसाईटवर एक प्रेस रिलीझ देखील जारी केले आहे. ज्यामध्ये हाजी सफिउल्लाह यांच्या नेतृत्वाखाली 150 लोकांनी ढाक्याच्या वारी पोलीस ठाण्यातील 22 लालमोहन साहा स्ट्रीटवर असलेल्या इस्कॉन मंदिरावर हल्ला केल्याचे सांगितले आहे. ही घटना 17 मार्च रोजी रात्री 8 वाजता घडली.

Image

एचएएफच्या वतीने सांगण्यात आले आहे की, ‘त्यांनी मंदिर, मूर्तीची तोडफोड केली आणि पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. या हल्ल्यात किमान तीन हिंदू भाविक जखमी झाले आहेत. 

====

हे देखील वाचा: निव्वळ दारूसाठी पाकिस्तानने घेतला आहे उत्तर कोरियाशी पंगा 

====

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंदिरावर 150 लोकांच्या जमावाने हल्ला केला होता. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. एचएएफच्या मानवाधिकार संचालिका दिपाली कुलकर्णी म्हणाल्या, “एका आठवड्यापूर्वी, बांगलादेशातील बंगाली हिंदू नरसंहारादरम्यान ज्यांना मारले गेले, विस्थापित केले गेले आणि बलात्कार करण्यात आले त्यांची 51 वी जयंती संपूर्ण जगाने साजरी केली. मात्र या हत्याकांडाचा प्रभाव आजही कायम असल्याची आठवण अतिरेकी करत आहेत.

यापूर्वीही मंदिरांवर हल्ले झाले आहेत

बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात काही दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. यादरम्यान अनेक मंदिरांवरही हल्ले झाले. या हिंसाचारात 2 हिंदूंसह 7 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही ढाक्यातील इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला होता.

====

हे देखील वाचा: अबब! या पाच देशात तीन महीने रात्रच होत नाही…!

====

9 वर्षात 4000 हल्ले

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या AKS या संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या 9 वर्षांत बांगलादेशात हिंदूंवर सुमारे 4000 हल्ले झाले. त्यापैकी 1678 फक्त धार्मिक बाबी होत्या. याशिवाय इतर अत्याचाराच्या घटनाही समोर आल्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.