बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि फॅन्सचे अतिशय लाडके कपल म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. नुकतेच विकी आणि कॅटरिना आईबाबा झाले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांच्या चाहत्यांसह गोड बातमी शेअर सांगितले की ते एका गोंडस मुलाचे आईबाबा झाले आहेत. याचवर्षी २३ सप्टेंबर रोजी या जोडप्याने कॅटरिना गरोदर असल्याचे शेअर केले होते. याआधी अनेकदा कॅटरिना प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये गाजल्या होत्या. मात्र त्या सर्वच बातम्या निव्वळ अफवा होत्या. यावेळी देखील कॅटरिना प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या बऱ्याचवेळा आल्या. ती बराच काळ कुठे सार्वजनिक कार्यक्रमात दिसली सुद्धा नव्हती. (Katrina Kaif)
एक दोन वेळेला तिचा बेबी बंप दिसणारा फोटो देखील व्हायरल झालेला. त्यावरुन लोकांनी ती नक्कीच गरोदर असेल असा अंदाज लावलेला. मुख्य म्हणजे यावेळेस त्यांचा हा अंदाज खरा ठरला. या बातमीमुळे या दोघांचे फॅन्स कमालीचे खुश झाले. दरम्यान कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २०२१ मध्ये लग्न केले. कॅटरिनाची डिलिव्हरी झाल्यानंतर एक दाक्षिणात्य मंदिर अचानक प्रकाशझोतात आले आहे. या मंदिराचा आणि कॅटरिनाच्या डिलिव्हरीचा नक्की काय संबंध आहे जाणून घेऊया. (Marathi News)
याचा वर्षाच्या सुरुवातीला कॅटरिनाने कर्नाटकातील कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिरात जाऊन विशेष पूजा केली होती. या मंदिरातले कॅटरिनाचे फोटो तेव्हा बरेच व्हायरल झाले देखील होते. मान्यता आहे की जर एखाद्या भक्ताने कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिरात जाऊन पूजा केली तर त्यांना नक्कीच पुत्रप्राप्ती होते. कॅटरिना कैफचे या मंदिरातले फोटो व्हायरल झाल्यावर काही महिन्यातच तिने ही गुड न्यूज दिली होती. आता, या जोडप्याला मुलगा झाला आहे. कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिरात जाऊन पूजा केल्याने नक्कीच संतान प्राप्ती होते. मग नक्की या मंदीराचा असा कोणता इतिहास आहे. (Todays Marathi Headline)

कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिर हे कर्नाटक राज्यातील साऊथ कन्नड जिल्ह्यात सुल्या तालुक्यात सुब्रमण्य मंदिर आहे. कुक्के गावात असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे, जे भगवान सुब्रमण्य अर्थात मुरुगन अर्थात शिव पुत्र कार्तिकेय यांना समर्पित आहे. हे मंदिर सर्प दोषांपासून मुक्तीसाठी ओळखले जाते, कारण येथे भगवान सुब्रमण्य यांची सर्पांचा देव म्हणून पूजा केली जाते. कुक्के सुब्रमण्य मंदिरातील मुख्य देवता भगवान सुब्रमण्य, भगवान वासुकी आणि शेषनाग देवता आहेत. हे मंदिर कुमार पर्वताच्या शिखरावर वसलेले आहे आणि कुमारधारा नदीने वेढलेले आहे. असे मानले जाते की, सुब्रमण्यमच्या गुहेत वासुकी आणि इतर सापांनी आश्रय घेतला होता. त्यामुळे मंदिराविषयी स्थानिक लोकांची वेगळीच श्रद्धा आहे. या मंदिरात गेल्याने सर्प दोष दूर होण्यास मदत होते असे मानले जाते. (Top Marathi Headline)
कर्नाटकातील कुक्के सुब्रमण्य मंदिर हे भगवान सुब्रमण्य यांना समर्पित एक पवित्र स्थान आहे. हे मंदिर ‘सर्प संस्कार’साठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी सापाच्या शापापासून मुक्तता मिळते. कॅटरिना कैफ देखील सर्प संस्कार पूजेमध्ये सहभागी झाली होती. ही पूजा सहसा पूर्वजांनी साप किंवा नागदेवतेला मारल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून केली जाते. ही पूजा २ टप्प्यात केली जाते आणि सुमारे चार ते पाच तास चालते. येथे पूजा केल्याने संततीशी संबंधित अडथळे दूर होतात आणि प्रार्थनाकर्त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो असा इथे येणाऱ्या लोकांचा विश्वास आहे. आतपर्यंत अनेक भाविकांना याचा अनुभव आला आहे. त्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. (Latest Marathi News)
कुक्के सुब्रमण्य मंदिरामागील आख्यायिका पाच हजार वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. येथे सर्प स्वरुपात पूजा केली जाते. पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी येथे सर्प विधी आणि विशेष प्रार्थना केल्या जातात. सर्व सर्पांचा स्वामी म्हणून भगवान सुब्रमण्य यांची पूजा केली जाते. सर्प दोषाने ग्रस्त असलेल्यांसाठी हे एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘अश्लेषा बली’ आणि ‘सर्प संस्कार’ सारखे विशेष विधी केले जातात. पौराणिक कथेनुसार, गरुडाच्या तावडीतून सुटण्यासाठी वासुकी आणि इतर सर्पांनी या मंदिरात भगवान सुब्रह्मण्यंकडे आश्रय घेतला होता. (Top Trending News)
=======
Kalabhairav : कोण आहेत कालभैरव !
=======
‘सर्प संस्कार’ पूजा काय आहे?
सर्प दोष, कालसर्प दोष आणि नाग दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी हा विधी केला जातो. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी अजाणतेपणे किंवा जाणूनबुजून नाग देवतेला मारले असेल किंवा नुकसान केले असेल तर त्याच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी हा विशेष विधी केला जातो. असे केल्याने मालमत्ता, आरोग्य आणि करिअरशी संबंधित अडथळे देखील दूर होतात. याशिवाय, हे विधी केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांनाही शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. ज्यामुळे आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
