Home » Winter Trip : हिवाळ्यातील पर्यटनासाठी ‘ही’ आहेत भारतातील बेस्ट

Winter Trip : हिवाळ्यातील पर्यटनासाठी ‘ही’ आहेत भारतातील बेस्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Winter Trip
Share

नुकताच हिवाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यामुळे सर्वांमध्ये आलेले मळभ आता दूर होताना दिसत आहे. त्यामुळे आता या हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक लोकं हिवाळ्यातील सहलींना जाण्याचा विचार करत असतील. हिवाळ्याची सुरुवात झाल्याने आता थंड वारे वाहत आहेत. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून हा हंगामा हिवाळ्यातील सहलींसाठी सर्वोत्तम वेळ आहे. विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी आणि तिथल्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हिवाळा उत्तम ऋतू आहे. आता तुम्ही देखील हिवाळ्यामध्ये सहलीला जाण्याचा विचार करत असाल मात्र कुठे जावे सुचत नसेल तर आम्ही तुम्हाला भारतातील हिवाळी सहलीसाठी उत्तम ठिकाणांची आज माहिती देणार आहोत. ही ठिकाणं तुमच्या बजेटमधली आणि अतिशय सुंदर देखील आहेत. चला जाणून घेऊया याबद्दल. (Winter Trip)

हंपी कर्नाटक
प्राचीन विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांमध्ये वसलेले, हम्पी हे ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. ती विजयनगर या श्रीमंत राज्याची राजधानी होती. असंख्य मंदिरे, शाही मंडप आणि स्मारके असलेले हम्पी हे भारतातील युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ आहे. (India)

जैसलमेर, राजस्थान
उन्हाळ्यात लोक हे ठिकाण पाहणे टाळतात. परंतु या ऋतूत ते खूप रंगीबेरंगी, उत्सवी आणि स्वागतार्ह झालेले असते. इथली वाळू थोडीशी थंड राहते, त्यामुळे तुम्हाला हिंडताना दमटपणा आणि घामाची चिंता करावी लागणार नाही. येथे भेट देऊन तुम्ही किल्ले, राजवाडे आणि हवेल्यांच्या सुंदर वास्तुकलेचा आनंद घेऊ शकता. (Marathi)

औली
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये औलीमध्ये बर्फवृष्टी होत असते. ज्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. वातावरणातील या बदलाचे पडसाद दिल्लीतही दिसून येतात. म्हणून या महिन्यात फिरण्यासाठी औली एक उत्तम पर्याय आहे. औलीला फिरण्याचा तीन दिवसांचा खर्च अंदाजे १६ हजार येऊ शकतो. (Todays Marathi HEadline)

Winter Trip

पुद्दुचेरी
पुद्दुचेरी त्याच्या सुंदर लँडस्केपसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला भारताची पारंपारिक संस्कृती तसेच फ्रेंच वास्तुकला पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत आता डिसेंबर महिन्यात येथे फिरणे तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्या सुट्टीचा आनंद शांततेत घ्यायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. (Top Stories)

गोवा
तरुणांसाठी तर गोवा आकर्षणाचं ठिकाण आहे. पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गोव्यात फिरायला जाण्याचा आनंद फार वेगळा आहे. गोवा हे अनेकांसाठी स्वप्नवत ठिकाण आहे. जर तुम्हाला हिवाळा फारसा आवडत नसेल, तर गोवा तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. गोव्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. (Latest Marathi Headline)

उदयपूर
राजस्थानची रोमॅंटिक ओळख म्हणजे उदयपूर इथले सिटी पॅलेस, लेक पिचोला, जगदीश मंदिर पाहताना डोळे थक्क होतात. सज्जनगड मान्सून पॅलेसवरून शहराचा नजारा मनात कायमचा साठवून ठेवावा असा. संध्याकाळी तलावाच्या काठावर जेवण करण्याचा अनुभव म्हणजे प्रवासाची खरी मजा. (Top Marathi News)

केरळ
देवभूमी म्हणून ओळखले जाणारे केरळ नोव्हेंबरमध्ये सर्वात सुंदर दिसते. पावसानंतर संपूर्ण राज्यात हिरवळ पसरलेली. अलेप्पीच्या बॅकवॉटरव हाऊसबोटमध्ये रात्र काढणं म्हणजे स्वप्नवत प्रवास. मुन्नारच्या चहाच्या टेकड्या आणि आलिशान निसर्ग मनाला शांतता देतो. (Top Trending Headline)

कच्छचे रण
गुजरातमधील रण उत्सव नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. पौर्णिमेला चंद्रप्रकाशात पांढरे वाळवंट जणू चांदीचा सागर वाटतो. स्थानिक संस्कृती, संगीत, नृत्य, हस्तकला सर्व काही एकाच ठिकाणी. काला डुंगरवरून सूर्यास्त पाहणे आणि तंबूत राहणे हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव. (Marathi News)

कुर्ग
दक्षिण भारतातील काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ग शहराला भेट देण्यासाठी नोव्हेंबर महिना योग्य आहे. कुर्ग हे कर्नाटकात आहे. या ठिकाणाला भारताचे स्कॉटलंड असेही म्हणतात. हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे, जिथे हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल. शांत ठिकाणांची आवड असणाऱ्यांसाठी आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे. (Top Trending News)

========

Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी करा ‘या’ पौष्टिक लाडूंचे सेवन

========

अमृतसर, पंजाब
नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंतीवेळी सुवर्ण मंदिरात जे उत्सव होतात, ते शब्दात मांडणे कठीण आहे. गुरु नानक गुरू-पूरब नोव्हेंबरमध्ये येतो. परंतु अचूक तारीख दरवर्षी बदलते. या राज्याच्या लँडमार्कला भेट देणे हा एक अनोखा अनुभव असू शकतो. अमृतसर हे भारतात नोव्हेंबरमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.