Home » Mobile : मोबाईलमधील ‘या’ गोष्टी देतात स्मार्टफोन हॅक झाल्याचे संकेत

Mobile : मोबाईलमधील ‘या’ गोष्टी देतात स्मार्टफोन हॅक झाल्याचे संकेत

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mobile
Share

आजच्या काळात मोबाईल ही गरज झाली आहे. मोबाइलशिवाय आपले कोणाचेच पान हालत नाही. मोबाईलचे कितीही दुष्परिणाम असले तरी त्याचे फायदे देखील तितकेच आहे. त्यामुळेच या मोबाइलवर सर्व जग आता निर्भर होत चालले आहे. आपल्या खिशात पैसे नसले तरी चालते पण मोबाईल हवा, कारण या मोबाइलवरुन आपण सहज पेमेंट करू शकतो. अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपण मोबाइलचा वापर करून करू शकत नाही. त्यामुळेच प्रत्येकासाठी आपला फोन आपला जीव असतो. सर्वच लोकं मोबाइलची स्वतः इतकी काळजी घेतात. मात्र हा मोबाईल अनेकदा आपल्याला अडचणींमध्ये देखील आणतो. (Mobile)

आज जिथे तंत्रज्ञान कमालीचे स्मार्ट होत आहे, तिथे त्याचे अनेक चुकीचे वापर देखील होताना दिसत आहे. याचीच एक बाजू म्हणजे मोबाईल हॅक होणे. तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हॅकिंग ही फार मोठी समस्या झाली आहे. फोन हॅक केल्यानंतर त्याचा ताबा कोणीतरी दुसरीची व्यक्ती घेते. याचा अर्थ तुमच्या मोबाईलमधील पर्सनल डेटा, फोटो, व्हिडीओ, ईमेल यासह बँक खात्यांची खासगी माहिती एका अनोळख्या व्यक्तीच्या हाती लागते. (Marathi News)

अशात तुमची खासगी माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता असते. जिचा चुकीचा वापर देखील होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या फोनची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र मोबाईल हॅक झाला हे कसे समजते? जेव्हा तुमचा फोन हॅक होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद गोष्टी घडतात. या गोष्टींवरून तुम्ही तुमचा फोन हॅक झाला हे समजू शकता. मग त्या कोणती गोष्टी आहेत चला जाणून घेऊया. (Mobile Hack)

मोबाइल डेटा
सर्वप्रथम तुम्ही जास्त वापर न करता देखील जर जर तुमचा इंटरनेट डेटा लवकर संपत असेल तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे. फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये एखादा व्हायरस चालू असेल आणि गुप्तपणे डेटा पाठवत असेल अशी शक्यता आहे. तुमचा डेटा वापर सेटिंग्ज तपासण्याची खात्री करा.

पॉप-अप किंवा सेटिंग्जमध्ये बदल
तुमच्या फोनच्या स्क्रीनवर वारंवार जाहिरातींचे किंवा विचित्र पॉप-अप्स येत असतील किंवा तुम्हाला माहीत नसताना फोनच्या सेटिंग्जमध्ये बदल झालेला दिसल्यास सावध व्हा. ॲडवेअर किंवा धोकादायक सॉफ्टवेअर तुमच्या नकळत फोनमध्ये इन्स्टॉल झालेले असू शकते किंवा ते तुमच्या परवानग्यांमध्ये बदल करू शकते. अशावेळी फोनमध्ये कोणतेही अनोळखी ॲप इन्स्टॉल झाले आहे का, याची तपासणी करा आणि परवानग्यांमध्ये कोणताही बदल झाला असल्यास लगेच लक्ष द्या. (Todays Marathi Headline)

Mobile

बॅटरी संपणे, फोन चालू – बंद होणे
जर तुमचा फोन पूर्वीपेक्षा खूप वेगाने डिस्चार्ज होत असेल तर हे स्मार्टफोन हॅक झाल्याचे लक्षण असू शकते. कोणीतरी तुमच्या नकळात डेटा वापरत असण्याची शक्यता आहे. जर तुमचा फोन कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून चालू किंवा बंद होत असेल तर, हेदेखील एक लक्षण असू शकते की कोणीतरी तुमचा फोन रिमोटली कंट्रोल करत आहे. (Top Marathi News)

performance कमी आणि संशयास्पद ॲक्टिव्हिटी
मोबाईल हॅक झाला असेल तर तुमचा फोन हळू चालणे किंवा ॲप्स उघडायला जास्त वेळ देखील लागू शकतो. यासोबतच तुमच्या नंबरवरून अनोळखी लोकांना मेसेजेस किंवा कॉल्स देखील केले जात असतील, तर तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो.

मोबाईल हॅक कसा करतात?
– मोबाईल हॅक करण्याचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे फिशिंग अटॅक. त्याच्या नावावरूनच या प्रकारच्या हल्ल्याचा अंदाज येऊ शकतो. ज्याप्रमाणे मासे आमिषाने अडकतात, त्याचप्रमाणे हॅकर्स फिशिंग मेल, ऑफर किंवा एसएमएसद्वारे लोकांना अडकवतात. हॅकर्स मेल किंवा मेसेजमध्ये अज्ञात लिंक पाठवतात आणि तुम्ही त्यावर क्लिक करताच तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतो. (Latest Marathi Headline)

– ब्लूटूथ हॅकिंग. व्यावसायिक हॅकर्स अशा उपकरणांचा वापर करतात, जे असुरक्षित उपकरणांच्या शोधात असतात. जर तुमच्या फोनचे ब्लूटूथ नेहमी चालू असेल तर हॅकर्स तुमचा फोन 30 फूट अंतरावरून हॅक करू शकतात.

– सिम कार्ड स्वॅपिंग ही देखील एक लोकप्रिय हॅकिंग पद्धत आहे. या प्रकारच्या स्वॅपिंगसाठी, हॅकर्स तुमच्या सिम ऑपरेटरला तुमच्या बेसवर कॉल करतात आणि सिम बदलण्याची मागणी करतात. हॅकरला नवीन सिम कार्ड मिळताच तुमचे मूळ सिम कार्ड काम करणे थांबवते. (Top Trending News)

=======

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

America : पाकची अणुचाचणी…ट्रम्पची धमकी कुणाला !

=======

फोन हॅक झाल्यास काय करावे?
जर तुमचा फोन हॅक झाल्यास तुम्ही सर्वात आधी तुमच्या फोनमधून सर्व अनोळखी ॲप्स ताबडतोब हटवा. तुमचा फोन तुम्ही फॅक्टरी रीसेट करू शकता. शिवाय सर्व ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड त्वरित बदला. विशेषत: तुम्ही तुमच्या फोनवरून लॉग इन केलेल्या खात्यांचे पासवर्ड तात्काळ बदलून घ्या. चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा आणि तुमचा फोन नियमितपणे स्कॅन करा. मुख्य म्हणजे तुम्ही सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. लक्षात ठेवा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणतेही ॲप्स इन्स्टॉल करताना परवानग्या तपासा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.