Home » Cricket : नादच खुळा! षटकारांचा पाऊस पाडत आकाश चौधरीचा विक्रम

Cricket : नादच खुळा! षटकारांचा पाऊस पाडत आकाश चौधरीचा विक्रम

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cricket
Share

भारतात कायम क्रिकेट हा खेळ नाही तर धर्म समजला जातो. केवळ आंतराष्ट्रीय क्रिकेट नाही तर राष्ट्रीय आणि फर्स्ट क्लास क्रिकेटसुद्धा भारतात कमालीचे लोकप्रिय आहेत. याच क्रिकेट स्पर्धांमधून आपल्याला आपल्या इंटरनॅशनल पातळीचे भावी क्रिकेटपटू मिळतात. म्हणूनच या स्पर्धा जेवढ्या खेळाडूंसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात तेवढ्याच त्या देशाच्या क्रिकेटसाठी देखील महत्वपूर्व असतात. सध्या भारतामध्ये रणजी क्रिकेटच्या स्पर्धा कमालीच्या गाजत आहे. कायमच या स्पर्धांमध्ये विविध विक्रम प्रस्थापित केले जातात. मग यंदाच्या स्पर्धा देखील कशा अपवाद ठरतील? (Askash Chaudhari)

सध्या २०२५ सालातल्या रणजी ट्रॉफी सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक मोठे विक्रम बनवले जात आहेत. ९ नोव्हेंबरला देखील या स्पर्धेत अशाच एका मोठया विक्रमाची भर पडली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेघालय संघाकडून खेळणाऱ्या आकाश कुमार चौधरीने विश्वविक्रमी खेळी केली आहे. प्लेट डिव्हिजन सामन्यात अरुणाचल प्रदेश संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात आकाशने लागोपाठ ८ उत्तुंग षटकार ठोकले आहेत. दरम्यान अरुणाचल प्रदेश संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत त्याने अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. यासोबतच सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आकाशने आपल्या नावावर केला. त्याच्या या विक्रमाची सगळीकडे जोरदार चर्चा असून, क्रिकेट जगतात सर्वत्र फक्त आकाशाबद्दलच बोलले जात आहे. (Marathi News)

जेव्हा जेव्हा भारतात क्रिकेटमधील विक्रमाबद्दल बोलले जाते, तेव्हा तेव्हा युवराज सिंगने इंग्लड विरोधात ठोकलेल्या एका ओव्हरमधील सिक्स सिक्सरबद्दल चर्चा होतेच होते. याशिवाय हा क्रिकेट विक्रम अपूर्ण आहे. मात्र आता मेघालयाच्या आकाश चौधरीने देखील अशीच अविश्वसनीय कामगिरी केली आहे. आता सिक्सरच्या विक्रमबद्दल युवराज सिंगसोबतच आकाश चौधरी हे नाव देखील घेतले जाईल. कारण आकाशने सुरत येथे रणजी ट्रॉफीच्या प्लेट गटातील सामन्यात इतिहास रचला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांच्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. इतकेच नाही, तर अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत त्याने नवा विक्रमही प्रस्थापित केला. त्याने सलग आठ षटकारांची आतषबाजी केली. (Todays Marathi News)

Cricket

मेघालय ६ बाद ५७६ धावांवर खेळत असताना वेगवान गोलंदाज असलेला आकाश चौधरी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर त्याने दोन चेंडूंवर एकेरी धावा घेतल्या. त्यानंतर १२६ व्या षटकात लिमार दावीच्या गोलंदाजीवर आकाशने सलग सहा षटकार लगावले. पुढील षटकातील पहिल्या दोन चेंडूंवरही त्याने षटकार खेचत अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. मेघालयने ६ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला, तेव्हा आकाशने १४ चेंडूंमध्ये आठ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या होत्या. (Marathi News)

याआधीचा ११ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम लीस्टरशायरच्या वेन व्हाइटच्या नावावर होता, ज्याने २०१२ मध्ये १२ चेंडूंमध्ये हे यश मिळवले होते. आकाश चौधरीने अवघ्या नऊ मिनिटांत नाबाद ५० धावा पूर्ण केल्या. हा विक्रम थोडक्यात हुकला कारण १९६५ मध्ये लीस्टरशायरच्या क्लाइव्ह इनमन यांनी नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या सामन्यात फक्त आठ मिनिटांत अर्धशतक केले होते, पण त्यासाठी त्यांनी १३ चेंडू घेतले होते. (Top Marathi NEws)

दरम्यान एवढा मोठा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आकाश हा उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने अनेकदा गोलंदाजीसह फलंदाजीतही आपले मोठे आणि महत्त्वाचे योगदान दिले आहे. याआधी झाली झालेल्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्यावेळी त्याने बिहारविरूद्ध झालेल्या सामन्यात ५ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६० धावांची खेळी केली होती. दरम्यान गोलंदाजी करताना त्याने ४० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या होत्या. यासह त्याला दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ ईस्ट झोन संघाकडून खेळण्याची देखील संधी मिळाली आहे. (Latest Marathi NEws)

======

Science Day : जाणून घ्या आज साजऱ्या होत असलेल्या जागतिक विज्ञानदिनाबद्दल

======

आकाश कुमारने २०१९ मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने मेघालयकडून नागालँडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी तो सिक्कीमविरुद्ध लिस्ट ए सामने आणि गुजरातविरुद्ध टी-20 सामनेही खेळला. एवढंच नाही तर आकाश मिडियम पेसर बॉलिंग देखील करतो. सोशल मीडियावर वर आता अनेकांनी आकाश आयपीएल सामन्यांमध्ये दिसणार असल्याचे भविष्य देखील वर्तवले आहे. त्याची एकूण कामगिरी बघता आकाशावर आयपीएलमध्ये आकाशवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. (Top Trending News)

आकाशच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने एकूण ३० प्रथम श्रेणी सामने, २८ लिस्ट ए सामने आणि ३० टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, आकाशने ५०० हून अधिक धावा केल्या आहेत आणि ७८ विकेट्स घेतल्या आहेत. तर आकाशने लिस्ट ए सामन्यांमध्ये २०३ धावा केल्या आहेत आणि ३७ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर २८ विकेट्स आहेत. (Social Media)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.