अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. जगाला टेरिफची धमकी देणा-या ट्रम्प यांना हादरवणा-या तीन घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. यामुळे अमेरिकन राजकारणात डेमोक्रॅटिक पक्षाला मोठी भरारी मिळाली आहे. अमेरिकेतील तीन प्रमुख शहरातील निवडणुका नुकत्याच झाल्या असून यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. हा निकाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे सर्वात मोठे शहर असलेल्या न्यू यॉर्कमध्ये भारतीय वंशाचे जोहरान ममदानी महापौर पदाची निवडणूक जिंकले आहे. (America)

त्यांचा हा विजय ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षालाही मोठा धक्का देऊन गेलाय. कारण ममदानी विजयी होऊ नयेत म्हणून ट्रम्प यांनी अनेक प्रयत्न केले, अखेर मतदारांना धमकीही दिली. याशिवाय व्हर्जिनिया आणि न्यू जर्सी येथेही डेमोक्रॅट्सनी गवर्नरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी भारतीयांचा विजय झाला आहे. डेमोक्रॅटिक गझला हाश्मी यांनी व्हर्जिनिया लेफ्टनंट गव्हर्नरच्या शर्यतीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. व्हर्जिनियाची गव्हर्नरपदी अबीगेल स्पॅनबर्गर यांची निवड झाली आहे. तर भारतीय-अमेरिकन जेजे सिंग यांनी व्हर्जिनिया हाऊस ऑफ डेलिगेट्समध्ये डिस्ट्रिक्ट २६ ची जागा जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे सर्व विजय डेमोक्रॅटिक पक्षाला उभारी देणारे असले तरी २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी ट्रम्पसाठी धोक्याचे ठरले आहेत. (International News)
अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शहराच्या महापौरपदी डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक जोहरान ममदानी विजयी झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे ममदानी यांच्या विरोधात ट्रम्प यांनी मोठी आघाडी उभारली होती. ममदानी विजयी झाले तर न्यू यॉर्क शहराचे अस्तित्व नष्ट होईल इथपासून ते ममदानी यांचा विजय झाला तर न्यू यॉर्क ला मिळणारी सर्व मदत थांबवण्यात येईल, अशा आशयाची विधाने करुन ट्रम्प यांनी ममदानी यांना असणारा विरोध जाहीर केला होता. पण या सर्वाचा कुठलाही परिणाम न होता, ममदानी बहुमतानं विजयी झाले. यात ममदानी यांच्या समर्थकांची मोठी मतं असली तरी ट्रम्प यांच्या धोरणाला विरोध कऱणा-या रिपब्लिकन पक्षांच्या समर्थकांचीही मत असल्यामुळे ट्रम्प साठी डोकेदुखी वाढणार आहे. (America)
कारण अमेरिकेत २०२६ मध्ये मध्यावधी निवडणुका होत आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांचा फटका बसलेल्या नागरिकांनी डेमोक्रॅटिक पक्षाला पसंती दिली तर ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाला धोकादायक ठरणार आहे. फक्त ममदानीच नव्हे तर व्हर्जिनियाच्या गव्हर्नरपदी निवड झालेल्या अबीगेल स्पॅनबर्गर यांनी ट्रम्प यांचा चांगलाच विरोध केला होता. पण स्पॅनबर्गर यांनी ट्रम्पच्या धोरणांवर थेट हल्ला करुन आर्थिक मुद्द्यांवर भर दिली. त्यांचे हे मुद्दे मतदारांना पटले आणि त्या विजयी झाल्या. त्यामुळे हिच रणनीती पुढच्या वर्षी होत असललेल्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राबवण्यात येणार आहे. (International News)

व्हर्जिनियाची ही निवडणुकही प्रतिष्ठेची झाली होती. अबीगेल यांनी रिपब्लिकन उमेदवार आणि लेफ्टनंट गव्हर्नर विन्सम अर्ल सीअर्स यांचा पराभव केला. अबीगेल स्पॅनबर्गर या व्हर्जिनिया गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पहिल्या महिला नेत्या आहेत. ट्रम्प यांच्या कार्यकाळातील टाळेबंदी आणि शटडाऊनच्या निर्णयावर त्यांनी अनेकवेळा टीक करत लाखो कामगारांना न्याय देण्यासाठी लढा उभारला आहे. अबिगेल यांच्या विरोधात असलेल्या अर्ल सीयर्स या कृष्णवर्णीय उमेदवार होत्या. त्यांचा पक्षातर्फे प्रचारच करण्यात आला नाही, शिवाय डोनाल्ड ट्रम्पही त्यांच्या प्रचारात सक्रीय नव्हते, असा आता आरोप होत आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे नुकसान झाले, अशी चर्चा आहे. यामुळे ट्रम्प यांना पक्षांतर्गतही विरोध वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्रितपणे, झालेले हे विजय डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मतदारांचा बदललेला कल व्यक्त करत आहेत. (America)
================
हे देखील वाचा : Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !
================
पुढच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला चांगले मतदान होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या विजयावर प्रतिक्रीया देतांना, जेव्हा आपण खऱ्या सार्वजनिक मुद्द्यांवर मजबूत, दूरदर्शी नेतृत्वासह एकत्र येतो तेव्हा विजय आपला असतो, असे सांगितले आहे. ट्रम्प यांनी लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन, डीसी, मेम्फिस, पोर्टलँड आणि शिकागो सारख्या डेमोक्रॅटिक-शासित शहरामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन विरोधी ट्रम्प प्रशासन असे चित्र ब-याचवेळा निर्माण झाले. या सर्व वादाचा परिणाम रिपब्लिकन पक्षातील त्यांच्या समर्थकांवरही झाला आहे. परिणामी ट्रम्प यांच्या लोकप्रियतेमध्येही घट झाली आहे. आता या पराभवानंतरही ट्रम्प आपली हुकुमशाही अशीच चालू ठेवतात का, हे पहाणे महत्त्वाचे आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
