आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे. त्यामुळे याचे मोठे परिणाम सगळ्यांच्याच शरीरावर दिसून येत आहे. याचा मुख्य परिणाम सगळ्यांच्याच केसांवर होताना दिसत आहे. खूपच कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. वातावरणातील धूळ माती प्रदूषण इत्यादींमुळे सध्या अनेकांना तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या जाणवत आहे. पूर्वी ही समस्या वैशिष्ट्य वयात आल्यावर जाणवायची मात्र आता खूपच कमी वयात अनेकांचे केस पांढरे होताना दिसत आहे. (Hair Care)
कमी वयात पांढऱ्या होणाऱ्या केसांमुळे अनेकदा आपण बाहेर जाणे टाळतो, आपल्याला लोकांसमोर जाण्यास लाज वाटते, आत्मविश्वास कमी होतो यासाठी लोकं केमिकल युक्त रंगांचा वापर करून केस काळे करताना दिसतात. मात्र सगळ्यांनाच याचा फायदा होतो असे नाही, अनेकांना या केमिकलयुक्त संसाधनांचा त्रास देखील होतो, अनेक साइड इफेक्ट देखील होतात. त्यामुळे घरगुती आणि सोप्या उपायांनी जर तुमची समस्या सोडवली जाणार असेल तर का अशा महागड्या आणि केमिकल असलेल्या प्रोडक्टचा वापर करावा? म्हणूनच आज आम्ही तुमचे पांढरे झालेले केस पुन्हा मुळापासून काळे करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत. (Beauty Tips)
कोरफड
पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी कोरफड एक उत्तम उपाय आहे. केसांना कोरफडीचा गर लावल्यानेही केस गळणे आणि पांढरे होणे बंद होतात. यासाठी कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना लावा. काही दिवस हा उपाय करून बघा. (Marathi News)
कढीपत्त्याची पाने
केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याची पाने अतिशय गुणकारी आहे. कढीपत्याच्या पानांचा हेअर मास्क केसांना लावल्यास पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. पांढऱ्या केसांच्या समस्येपासून आराम मिळेल. कढीपत्त्याची पाने केसांना वापरताना वाटीभर तेलात कढीपत्त्याची पाने गरम करून घ्या. त्यानंतर तेल थंड करून गाळून बंद डब्यात भरून ठेवा. या तेलाचा वापर आठवड्यातून एकदा केसांच्या वाढीसाठी केल्यास केस मजबूत आणि काळेभोर होतील.पांढऱ्या रंगाचा केसही दिसणार नाही. (Todays Marathi Headline)

आवळा हेअर पॅक
पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळा हेअर पॅक म्हणून वापरू शकता.यासाठी तुम्ही संपूर्ण आवळाचा रस वापरू शकता. तुम्ही आवळा किंवा आवळ्याचा रस कोणत्याही केसांच्या तेलात मिसळून केसांना लावू शकता. ४-५ तास सोडा आणि शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा केसांना लावू शकता, खूप फायदा होईल. केसांसाठी हेअर पॅक खूप महत्त्वाचा असतो. (Top Stories)
मेथीदाणे
आवळ्याव्यतिरिक्त मेथी नैसर्गिकरित्या केस काळे करू शकते. मेथीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे केस काळे ठेवण्यास मदत करतात. त्याचा वापर करण्यासाठी दोन चमचे मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते बारीक करून केसांच्या मुळांना लावावे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते नारळ किंवा बदामाच्या तेलात मिसळून केसांमध्ये हेअर पॅक म्हणून वापरू शकता. (Marathi News)
खोबरेल तेल आणि लिंबाचा रस
नारळ तेल एक नैसर्गिक कंडिशनर आहे जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करू शकते, तर लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जो केसांना हलका करण्यास मदत करतो. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिक्स करा. नंतर मिश्रण आपल्या केसांना लावा आणि थंड पाण्याने धुण्यापूर्वी ३०-६० मिनिटे राहू द्या. लवकर केस काळे होण्यासाठी आठवड्यातून एकदा ही प्रक्रिया पुन्हा करा. पण हे मिश्रण केसांवर जास्त वेळ ठेवू नका. (Marathi Trending News)
चहा पावडर
केसांच्या आरोग्यासाठी चहाची पाने अत्यंत फायदेशीर असतात. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. सर्वप्रथम चहाची पाने पाण्यात उकळून थंड होण्यासाठी ठेवावीत. पाणी थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावून थोडा वेळ मसाज करावा. साधारण तासाभरानंतर सामान्य पाण्याने केस धुवून टाका. यानंतर दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करा. (Top Marathi News)
जास्वंदीच्या फुलाचा वापर
सफेद केसांसाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर अत्यंत परिणामकारक होतो. केस काळे करण्यासाठी तुम्ही रात्रभर जास्वंद पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवा. नियमित याचा वापर केल्याने केस काळे होण्यास मदत मिळते. (LAtest Marathi Headline)
भृंगराज आणि अश्वगंधा
भृंगराज आणि अश्वगंधाची मूळं केसांसाठी वरदान मानले जातात. याची पेस्ट तयार करुन त्यात खोबऱ्याचं तेल टाका. ही पेस्ट काही तासांसाठी केसांच्या मुळात लावा. नंतर केस कोमट पाण्याने चांगले स्वच्छ करुन घ्यावे. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल. (Top Trending News)
कांदे
कांदा फक्त स्वयंपाकासाठी नाही तर तुमचे केस काळे करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. काही दिवस आंघोळ करण्याआधी केसांना कांद्याची पेस्ट किंवा रस लावा. याने पांढरे केस काळे होऊ लागतील. तसेच केसांना चमकही येईल. (Social News)
(टीप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आम्ही याला दुजोरा नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
