Home » Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tourism
Share

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच गरजेची असते झोप. अनेकांच्या मते झोप म्हणजे आळसपणाचे लक्षण असते. मात्र असे नाहीये अनेक आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी झोप औषधांइतकीच किंबहुना औषधांपेक्षा अधिक महत्वाची असते. मात्र आजच्या आधुनिक काळात माणसांपासून हीच झोप दुरावत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला शांत झोप मिळणे देखील अवघड झाले आहे. ऑफिसचे काम, घरचे काम, मोबाईल, टीव्ही, फिरणे आदी अनेक नानाविध कारणांमुळे लोकं रात्रीची शांत झोप घेण्यापासूनच दुरावत आहे. (Tourism)

एकेकाळी रात्री लवकर झोपून सकाळी उशीरापर्यंत झोपून आईचा मार, ओरडा खाल्ल्याशिवाय न उठणारी पिढी आता हळूहळू लोप पावत चालली आहे. मात्र झोप ही आपल्या शरीरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे डॉक्टर आणि तज्ञ अनेकदा आपल्याला सांगत असतात. ताण तणावामध्ये देखील झोप आपल्याला बरे करण्याचे काम करते. पण आज हीच शांत झोप मिळत नसल्याने कमी वयातच अनेक आजरा डोके वर काढताना दिसत आहे. याच झोपेची गरज लक्षात घेऊन सध्या एक गोष्ट अतिशय गाजताना दिसत आहे आणि ती म्हणजे ‘स्लिप टुरिझम’. (Marathi News)

मनुष्यच्या निरोगी आरोग्याचा भाग असणाऱ्या झोपेला प्राधान्य देऊन त्यातून उत्तम आरोग्य साधण्यासाठी सध्या ‘स्लिप टुरिझम’ ही संकल्पना चांगलीच गाजत आहे. आरोग्य उत्तम राहावे या उद्देशाने जगभर आता स्लीप टुरिझम सध्या मराठी भाषेत सांगायचे झाले तर झोपेचे पर्यटन नावाने एक नवीन उद्योग भरभराटीला येऊ लागला आहे. हे ऐकून अनेकांना नवल वाटले असेल. आता काय शांत झोप मिळवण्यासाठी देखील बाहेर फिरायला जायचे? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात आले असतील. आज आपण या लेखातून याच स्लिप टुरिझमची माहिती जाणून घेऊया. (Trending Marathi Headline)

Tourism

स्लीप टुरिझन ज्याला ड्रीम टुरिझम, नॅपकेशन किंवा नॅप हॉलिडे असे देखील म्हटले जाते. येथे जाऊन स्ट्रेस फ्री होण्यास मदत मिळते. म्हणजे अशा सहली किंवा सुट्ट्या जिथे मुख्य लक्ष चांगल्या झोपेवर असते. पूर्वी हॉटेल्स असा दावा करत असत की तुम्हाला येथे चांगली झोप मिळेल. मात्र आता स्लीप टुरिझम यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचे ठरताना दिसत आहे. आता तर जगभरातील काही हॉटेल्स असा दावू करतात जिथे जाऊन तुमची झोप सुधारू शकते. ज्यामध्ये आठवडाभराचा रिट्रीट समाविष्ट असू शकतो. जिथे झोप सुधारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, वैद्यकीय चाचण्या आणि उपचार किंवा असे स्पा उपचार दिले जातात जे झोप आणण्यास मदत करतात. (Top Marathi News)

एका अहवालानुसार, २०२४ मध्ये हा उद्योग सुमारे ६९० अब्ज डॉलर्सचा झाला आहे आणि २०२८ पर्यंत त्यात आणखी ४०० अब्ज डॉलर्सची वाढ होण्याची अपेक्षा आहे.ता जेव्हा लोक सुट्टीवर जातात तेव्हा ते कामापासून दूर राहतात आणि मुलांसोबत काही वेळ घालवतात आणि त्यानंतर झोपेला प्राधान्य देऊ इच्छितात. म्हणूनच हॉटेल्स देखील झोपेसाठी नवीन ऑप्शन देत आहेत. स्लिप टुरिझममध्ये तुमच्या उत्तम झोपेसाठी अनेक गोष्टी केल्या जातात. (Latest Marathi Headline)

या टुरिझममध्ये प्राथमिक लक्ष प्रवासावर, खाण्यावर किंवा मजा करण्यावर न ठेवता योग्य झोप घेण्यावर ठेवले जाते. अशा सुट्टीचा बेत आखणे म्हणजेच स्लीप टुरिझम. यामध्ये, तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून ते सर्व गोष्टींचे नियोजन हे रात्रीच्या विश्रांतीनुसार केले जाते. यामध्ये पर्यटकाच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्याचे काम केले जाते. न्यूयॉर्कपासून लंडनपर्यंतच्या हॉटेल्समध्ये यासाठी खास खोल्या बनवल्या गेल्या आहेत. या खोल्यांमध्ये बाहेरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू दिला जात नाही. येथे एखाद्या नैसर्गिक औषध केंद्रामध्ये किवां निसर्गोपचार केंद्रांप्रमाणे घेतले जाते तशी तुमची काळजी घेतली जाते. (Top Trending News)

=========

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

=========

पाश्च्यात्य देशांमध्ये हा स्लिप टुरिझमचा ट्रेंड सध्या कमालीचा गाजताना दिसत आहे. आता हळूहळू हा ट्रेंड भारतामध्ये देखील पसरत आहे. भारतातील अनेक ठिकाणी स्लिप टुरिझमला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळते. भारतातील आनंदा इन द हिमालयाज, ऋषिकेश, आत्मंतन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी, पुणे, स्वास्वरा – गोकर्णा, देहरादून- साउंड हीलिंग, आदी ठिकांसोबतच गोवा, कूर्ग, मनाली, म्हैसूर आदी ठिकाणी देखील स्लिप टुरिझम वाढत आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.