इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन कार्पेट, नाजूक मातीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून इराणमधील सत्ताधिशांच्या एककेंद्रीत अधिकारामुळे या देशाची हालत खराब होत चालली आहे. इराण मध्ये एकात्मक इस्लामिक प्रजासत्ताक आहे. येथील सत्ता सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हातात केंद्रित आहे. देशाचे राष्ट्रपती आणि इतर प्रमुख संस्थांपेक्षा त्यांचे स्थान वरचे आहे. या देशातील अस्थिर परिस्थितीचा परिणाम आता सामाजिक जीवनावर पडत आहे. देशातील साधन संपत्तीचे नियोजन योग्यपणे न झाल्यानं इराणमध्ये फक्त पुढच्या काही दिवसांपूरताच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. ही बातमी गंभीर असून यामुळे लाखो इराणी नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. एकीकडे स्वतःला अण्वस्त्रधारी देश असे बिरुद लावून घेण्यासाठी येथील शासनकर्ते प्रयत्नशील असतांना या देशातील पाण्याचे गंभीर संकट वाढत आहे. ग्रामीण भागात दुष्काळासारखी परिस्थिती असून हे अवघ्या दहा-बारा दिवसांपुरते पाणी संपले तर पुढच्या दिवसात काय करायचे, हा प्रश्न तेथील जनतेसमोर उभा ठाकला आहे.

देशातील परमाणु शस्त्रांच्या साठ्यात वाढ कऱण्यासाठी इऱाणमधील सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी या देशाने सर्वात मोठी आर्थिक तरतूद शस्त्रास्त्र निर्मितीसाठी केली आहे. असे असतांना देशातील जनतेच्या किती मुलभूत गरजांची पूर्तता होत आहे, की नाही, याचा या सत्ताधा-यांना विसर पडला. त्यामुळेच सर्वच इराणमध्ये पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. इराणची राजधानी तेहरान आणि त्याच्या आसपासच्या भागातील जनतेला तीव्र पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातही राजधानी तेहरानची परिस्थिती भयानक आहे. कारण येथील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे.
राजधानीत आता फक्त दहा दिवस पाणी पुरवठा होईल, एवढात पाण्याचा साठी उपलब्ध आहे. इराणमधील हे पाणी संकंट आज उभे राहिले नाही. तर गेल्या काही वर्षापासून येथे सातत्यानं दुष्काळ पडत आहे. सलग पाच वर्ष येथे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे पाण्याच्या साठ्यात मोठी घट झाली. मात्र या संकटाचा सामना करण्याऐवजी प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं, आणि आज अवघं तेहरान सारखं शहर पाण्याशिवाय रिकामी कऱण्याची वेळ आली आहे. तेहरानमधील धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी होत चालला तरी त्याचे नियोजनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागीतील जनतेपुढे भविष्यात पाण्यावाचून कसे जगायचे हा प्रश्न उभा आहे. या पाणी टंचाईचे मोठे परिणाम शेतक-यांच्या आयुष्यावर झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शेती ही सोडून देण्याकडे येथील शेतक-यांचा कल झाला आहे. त्यातही पशुपालन करणा-या शेतक-यांनी पाण्यावाचून आपल्याकडील पशुधन दुस-याला विकले आहे. मुख्यतः देशातील अन्नधान्याचा साठाही संपुष्ठात येत असून त्यामुळे इऱाणला भविष्यात अन्य देशांकडून धान्यसाठा आय़ात करावा लागणार आहे.

इराणच्या राजधानीमध्ये पाणी जवळपास संपल्यासारखे आहे. तेहरानमधील धरणांमधील पाण्याचा प्रवाह ४३ टक्क्यांनी कमी झाला आहे. येथेली अमीर कबीर धरणातील पाणीसाठा १४ दशलक्ष घनमीटरपर्यंत घसरला आहे. तेहरानच्या पाच मुख्य धरणांपैकी एक असलेल्या अमीर कबीरमधील पाण्याची पातळी फक्त ८% आहे. अमीर कबीर धरणातील पाणी दोन आठवड्यांत संपण्याचा धोका आहे. यासर्वाबाबत येथील हवामान अभ्यासकही काळजी व्यक्त करीत आहेत. इराणच्या राष्ट्रीय हवामान आणि दुष्काळ संकट व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख अहद वाझिफेह यांनीही पाण्याचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत दिले आहेत. कारण पुढच्या वर्षीही पाऊस पडणार नसल्यचे त्यांचे मत आहे. इराणचा दशकांमधील “सर्वात कोरडा शरद ऋतू” असे वर्णनही त्यांनी केले आहे. इराणच्या राजधानीमध्येच पाण्याचा साठा अत्यंत कमी असल्यामुळे अनेक भागात विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
================
हे देखील वाचा : America : पाकची अणुचाचणी…ट्रम्पची धमकी कुणाला !
================
इराणच्या या सुंदर राजधानी शहराची ही स्थिती तेथील सत्ताधा-यांच्या दुर्लक्षामुळे झालेली आहे. तेहरान हे एक महानगर असून त्याची लोकसंख्या १ कोटींहून अधिक आहे. तेहरान शहर हे ५,६०० मीटर उंचीच्या बर्फाळ अल्बोर्झ पर्वतांच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. येथून अनेक नद्यांचा उगम होत असून त्यातून या शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र दिवसेंदिवस येथील पाणी संपत चालले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी दोन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर कराव्या लागल्या आहेत. आता पुढच्या आठवड्यात असाच निर्णय घेण्यात येईल, याची शक्यता अधिक आहे.
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
