एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत रात्र कोणती राणी घालवेल हे ठरवण्यासाठी त्याच्याकडे एक वेगळीच ट्रिक होती. त्याचा एक महल होत्या ज्यात एंट्रीसाठी पूर्ण नग्न व्हावं लागायचं. त्याच्या प्रॉपर्टीचा तर नादच नाय भारतात सगळ्यात पहिलं प्रायवेट प्लेन त्याच्याकडे होतं. कोण होता हा राजा त्याचे हे भन्नाट किस्से काय आहेत हे जाणून घेऊ. (Royal Stories)
तर तो राजा होता पंजाबच्या पटियाला संस्थानाचा राजा महाराजा भूपिंदर सिंग! महाराजा भूपिंदर सिंग हे १२ ऑक्टोबर १८९१ ला जन्मले आणि फक्त नऊ वर्षांचे असतानाच १९०० साली ते पटियाला संस्थानाच्या गादीवर बसले. पूर्ण ३८ वर्षं म्हणजे १९३८ पर्यंत त्यांनी या संस्थानावर राज्य केलं. पण त्याची खरी ओळख त्यांचे शॉक आणि त्यांचा शाही थाट होती. (Top Stories)
असं म्हणतात त्यांच्या ३६५ राण्या होत्या आणि त्यातल्या १० त्यांच्या पत्नी होत्या. हे ऐकायला विचित्र वाटेल पण कोणती राणी त्यांच्यासोबत रात्र घालवेल हे ठरवण्यासाठी त्यांच्या महालात ३६५ कंदील लावले जायचे प्रत्येक कंदीलवर त्या त्या राणीचं नाव लिहिलेलं असायचं. रात्री ते कंदील पेटवले जायचे आणि सर्वात आधी जो कंदील विझायचा ती राणी राजांसोबत रात्र घालवायची.

पटियाल्यातच महाराजा भूपिंदर सिंग यांनी एक ‘लीला भवन’ नावाचा खास महाल बांधला होता. दीवान जरमनी दास यांच्या ‘महाराजा’ या पुस्तकात लिहिलंय की या महालात कपडे घालून एंट्री नव्हती महालात एंट्रीसाठी पूर्ण नग्न व्हावं लागायचं! याच महालात एक ‘प्रेम मंदिर’ नावाचा खास रुम होता, जो फक्त महाराजा भूपिंदर सिंग यांच्यासाठी होता. याच महालात एक प्रचंड मोठा पूल होता, ज्यात १५० हून अधिक लोक एकाच वेळी आंघोळ करू शकत होते. (Royal Stories)
राजा भूपिंदर सिंहांच्या राजवाड्यात ११ स्वयंपाकघर होती, जिथे रोज शेकडो लोकांसाठी जेवण बनायचं. त्यात महाराणींना सोन्याच्या थाळ्या आणि वाट्यांमध्ये जेवण वाढलं जायचं, राणींना चांदीच्या थाळीत जेवण मिळायचं आणि इतर स्त्रियांना पितळेच्या थाळीत. स्वतः महाराजांना रत्नजडित सोन्याच्या थाळीत जेवण करायचे त्यांच्या ताटात कधीही १५० पेक्षा कमी पदार्थ नसायचे. एकीकडे भारतावर इंग्रजांचं राज्य होतं तर दुसरीकडे महाराणी किंवा राजकुमारांच्या वाढदिवशी राजा भूपिंदर सिंहांच्या राजवाड्यात पार्टीमध्ये इंग्रज वेटर असायचे. या पार्टींमध्ये सुद्धा देशभरातून नर्तकींना बोलवलं जायचं. इतिहासकार सांगतात राजा भूपिंदर सिंह यांना ८३ मुलं झाली होती. त्यांच्या राण्यांची सौंदर्य आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी परदेशी डॉक्टरांची टीम नेहमी हजर असायची. भारतात सर्वात पहिलं प्राइवेट जेट सुद्धा भूपिंदर सिंह यांनीच विकत घेतलं होतं. (Top Stories)
=================
हे देखील वाचा : Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !
=================
पण फक्त ऐयाशी आणि शाही थाट नव्हता, राज्यकारभारातही राजा भूपिंदर सिंग कमाल होते. त्यांच्या राज्य काळात पटियाला समृद्ध होतं. १९१४ पर्यंत रेल्वे, डाकखाने, २६२ शाळा आणि ४० हॉस्पिटल्स उभी केली. कलाकारांना सुद्धा त्यांनी वाव दिला होता. एकदा प्रसिद्ध शायर जोश मलीहाबादी आर्थिक संकटात सापडले होते. ही खबर त्यांच्या भूपिंदर सिंह च्या एका मंत्र्याने त्यांना दिली आणि सांगितलं की त्यांना महिन्याला ७५ रुपयांची पेन्शन आपण देऊया. तेव्हा राजा म्हणाले की “पुढे जाऊन मला तुम्हाला कोणी लक्षात ठेवणार नाही, तेव्हा लोक या शायरांना कालिदासासारखं आठवतील. इतक्या मोठ्या माणसाला इतकी किरकोळ पेन्शन माझ्या राज्याला शोभत नाही, म्हणून जोश मलीहाबादी यांना आयुष्यभर २५० रुपयांची पेन्शन दिली जाईल.”(Royal Stories)
त्यांना क्रिकेटचा ही जबरदस्त शॉक होता. भारतातून इंग्लंडला खेळण्यासाठी गेलेल्या पहिल्या क्रिकेट टीमचे कॅप्टन राजा भूपिंदर सिंह स्वत: होते. त्यांच्या शेवटच्या विदेश दौऱ्यामध्ये त्यांना तीन वेळा अटॅक आला होता. ते हळूहळू आंधळे होत होते. त्यांना दिसत नाही आहे हे फक्त त्यांच्या काही मंत्र्यांना आणि सेवकाला माहिती होतं. ते रोज तयार व्हायचे शाही थाटातच जगायचे. जेव्हा त्यांचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी सुद्धा त्यांनी 10 अंड्यांचं ऑमलेट खाल्लं होतं. मग त्याचं दिवशी म्हणजे २३ मार्च १९३८ च्या दुपारी बारा वाजता महाराजा भूपिंदर सिंह कोमात गेले. ते आठ तास त्या अवस्थेत राहिले मग त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांचं वय फक्त ४७ वर्ष होतं. ते इतके लोकप्रिय होते की त्यांच्या अंत्ययात्रेला जवळपास १० लाख लोक आली होती.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
