नुकताच आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत इतिहास घडवला आहे. दोन वेळेस विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचून पराभूत झालेल्या टीम इंडियाने यंदाचा विश्वचषक आपल्या नावे केला आहे. आपण कायम पाहत आलो की, टीम इंडिया नेहमीच मॅच खेळताना आपल्याला निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसते. महिला किंवा पुरुष कायम क्रिकेट खेळताना आपल्याला निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतात. (India)
फक्त क्रिकेटच नाही तर हॉकी, फुटबॉल आदी सांघिक खेळ असो किंवा बॅटमिंटन, टेनिस, स्क्वॉश आदी क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा निळाच असतो. हॉकी व फुटबॉलमध्ये होम-अवे या नियमांमुळे पांढऱ्या रंगाची जर्सी घातली जाते, परंतु त्यांच्या मुख्य जर्सीचा रंग हा निळाच राहिलेला आहे. पण इंडियाची टीम निळ्याच रंगाचा ड्रेस का घालते? हा रंग टीम इंडियासाठी कोणी ठरवला? जाणून घेऊया याच निळ्या रंगमागचे खास कारण. (Marathi News)
१९८० च्या दशकात भारतामध्ये क्रिकेटला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर इतर खेळांच्या राष्ट्रीय टीम ने देखील क्रिकेट टीमप्रमाणेच निळ्या रंगाची जर्सी घालायला सुरूवात केली. टीम इंडियाची जर्सी निळ्या रंगाची असण्याचे कारण म्हणजे निळा रंग भारताच्या राष्ट्रीय ध्वजासोबत सुसंगत असल्याचे सांगण्यात येते. टीम इंडियाच्या जर्सीसाठी आपल्या तिरंग्यातील केशरी रंग, हिरवा रंग, पांढरा रंग या तिन्ही रंगांचा विचार केला गेला. (Indian Jersey)
मात्र जर यापैकी कोणताही रंगाचा जर्सीसाठी विचार केला असता तर त्याचा संबंध धर्माशी जोडला गेला असता आणि त्यावरून राजकारण तापले असते. केशरी हा हिंदू, जैन बौद्धांचा किंवा काही राजकीय पार्टींचा, हिरवा हा मुस्लिम समुदायाचा असा तेव्हा विचार केला गेला असावा. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याची प्रचिती देणारा रंगच जर्सीसाठी हवा होता. म्हणूनच कदाचित निळ्या रंगाची निवड केली गेली असावी. (Todays Marathi Headline)

१९८० मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या Benson & Hedges World Series Cup मध्ये पहिल्यांदाच रंगीत कपडे, पांढऱ्या चेंडू आणि काळे sight screen वापरण्याचा प्रयोग झाला. या तिन्ही गोष्टींनी क्रिकेटचा चेहरामोहरा कायमचा बदलला. वनडे क्रिकेटमध्ये रंगीत जर्सी अनिवार्य आहे. शिवाय पांढरी जर्सी आधीच टेस्ट क्रिकेटमध्ये वापरली जाते. भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या अशोक चक्राचा रंग निळा आहे, जो टीम इंडियाच्या जर्सीसोबत सुसंगत आहे. (Top Marathi Headline)
अजून एका माहितीनुसार ८० च्या दशकात कोणत्याही संघाचे खेळण्याचे अधिकृत किट स्पॉन्सर नव्हते. त्यामुळे आयोजक म्हणजे ऑस्ट्रेलियालाच सर्व संघांना कपडे पुरवावे लागत होते. ऑस्ट्रेलियाने आपला पारंपरिक पिवळा रंग निवडला. न्यूझीलंडला क्रीम आणि चॉकलेटी रंगाचे कपडे दिले गेले. आणि भारतासाठी निवड झाली लाईट ब्लू आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनची. हा रंग ना बीसीसीआयने निवडला होता, ना खेळाडूंनी. तो केवळ आयोजकांनी ठरवला होता. (Latest Marathi News)
मात्र जेव्हा भारतीय खेळाडू या निळ्या कपड्यांमध्ये मैदानावर उतरले, तेव्हा तो रंग इतका उठून दिसला की पुढे भारताने तोच रंग आपली ओळख म्हणून कायम ठेवला. १९८० नंतर टीम इंडियाची जर्सी वेळोवेळी बदलत गेली. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये गडद नेव्ही ब्ल्यू, १९९६ मध्ये तिरंगी पट्ट्यांसह डिझाईन, २००३ मध्ये हलका आकाशी रंग, तर २०११ च्या वर्ल्डकपमध्ये तेजस्वी इलेक्ट्रिक ब्लू रंग दिसला. आजही प्रत्येक वर्ल्डकपमध्ये किंवा द्विपक्षीय मालिकेत बीसीसीआय आणि किंवा सध्याचे स्पॉन्सर नवीन डिझाईन सादर करतात, पण रंग मात्र बदलत नाही, निळा रंग शांततेचं, स्थिरतेचं आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच तो भारतीय क्रिकेटच्या आत्म्याशी जुळतो. (Top Trending News)
=========
Rob Jetton : या देशाचा भावी पंतप्रधान आहे समलैंगिक !
=========
जेव्हा क्रिकेटमध्ये आपले खेळाडू चमकू लागले नाव कमावू लागले तेव्हा आपल्या टीमला “Men in Blue” या नावाने ओळखले जाऊ लागले. आज ही जर्सी भारताची, भारताच्या अभिमानाची, भारताच्या पराक्रमाची साक्ष देते. आज ही जर्सी ४० वर्षांची परंपरा, अभिमान आणि असंख्य विजयांची साक्ष आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
