हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला सगळ्यांनाच आवडते. हिवाळ्यात अतिशय चांगल्या, भरपूर आणि शुद्ध भाज्या सहज उपलब्ध होतात. त्यामुळे खायला आवडणाऱ्या लोकांची देखील मजा असते. कारण वेगवेगळे अनेक पदार्थ या ऋतूमध्ये खायला मिळतात. मात्र या ऋतूचा त्रास देखील आहे. या दिवसांमध्ये हवा कोरडी असते. त्यामुळे त्याचे अनेक त्रास आपल्या शरीराला जाणवतात. त्वचा खूप जास्त कोरडी होते, त्वचा कोरडी झाल्यामुळे तिला खाज येणे, पांढरी दिसणे भेगा पडणे अशा समस्या अनेकांना खूपच जाणवतात. यातलीच एक सामान्य समस्या म्हणजे ओठ फाटणे. (SkinCare)
थंडीच्या दिवसांमध्ये ओठ देखील कोरडे होतात आणि ते निस्तेज दिसू लागतात. ओठांचे सौंदर्यच निघून जाते. त्यामुळे तुमचा लूक देखील खराब दिसते. ओठांची त्वचा सर्वात कोमल असते. त्यामुळे हिवाळ्यात ओठांची विशेष काळजी घ्यायला हवी. तज्ज्ञांच्या मते, अधिक थंडीमुळेच नव्हे तर या मोसमात अधिक उष्णतेमुळेही ओठ उलतात. ओठ फुटणे, ओठांवरील त्वचा निघणे, लिपस्टिक लावल्यानंतर सुद्धा ओठ कोरडे आणि निस्तेज दिसणे इत्यादी अनेक ओठासंबंधित समस्या उद्भवू लागतात. काहीवेळा ओठांमधून रक्त येण्याची शक्यता असते. मात्र काही लोकं याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे त्रास देखील जास्त होतो. मग हिवाळ्यामध्ये घरच्याघरी ओठांची सोप्या पद्धतीने काळजी घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्या वापरून तुम्ही तुमच्या ओठांचे सौंदर्य जप शकतात आणि सुंदर दिसू शकतात. (Lips Care)
* रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ओठांवर तूप आणि खोबरेल तेलही लावा. हे लावल्याने ओठ नैसर्गिकरित्या मऊ राहतात. तुपातील फॅटी ऍसिडस् ओठांची आर्द्रता टिकवून ठेवतात. याने फटके ओठ लवकर बरे होतात. त्याच वेळी, नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे ओठांना संसर्गापासून वाचवतात आणि त्वचेचे पोषण करतात. (Winter Care)
* रात्री झोपताना आपल्या नाभीवर म्हणजेच बेंबीवर मोहरीचे तेल लावा. यामुळे काहीच वेळात, ओठ फुटण्याची समस्या दूर होईल. तसेच, काही दिवसांतच ओठ मऊ आणि गुलाबी होतील. मोहरीच्या तेलाने असे आणखी फायदे आपल्याला दिसून येतील. (Marathi)
* फाटलेल्या ओठांसाठी देखील मधाचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे ओठ मऊ होतात आणि वेदनांचा त्रासही कमी होतो. ओठांना भेगा पडल्या असतील तर तेही हे लावल्याने भरून निघते. (Todays Marathi Headline)

* ग्लिसरीन ही कोरडे त्वचा आणि फुटलेले ओठ यांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. ते ओठ आणि डोळ्यांभोवती लावा. तुमचे ओठ कोरडे असल्यास, मॅट लिपस्टिक ऐवजी क्रीम लिपस्टिक वापरा. तुम्ही लिपस्टिक न लावता लिप बामही वापरू शकता. (Marathi News)
* हिवाळ्यात ओठांचा कोरडेपणा दूर ठेवण्यासाठी ओठांवर मलई, साय, लोणी किंवा देशी तूप काही वेळ हलक्या हातांनी लावा. यानं ओठांची त्वचा मऊ राहते. हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये रात्री पेट्रोलियम जेली किंवा अँटीसेप्टिक क्रीम लावून झोपा. (Top Trending Headline)
* हिवाळ्यात तहान कमी लागते. असं असतानाही सतत पाणी प्यायला हवे. असे केल्याने शरीर आणि त्वचेत ओलावा टिकून राहतो राहते. तसंच, ओठांच्या त्वचेतही ओलावा टिकून राहतो. (Top Stories)
* काकडी हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. तुमच्या ओठांना मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी हा एक उत्तम घटक आहे. फक्त एक काकडी सोलून त्याचे पातळ तुकडे करा. हे स्लाइस काही मिनिटं ओठांवर घासून घ्या. (Latest Marathi News)
* घरी उपलब्ध गुलाबपाणी, कच्चे दूध आणि मध यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी DIY क्रीम बनवू शकता. ही क्रीम लावल्याने तुमचे ओठ खूप चांगले होतील. हिवाळ्यात ओठांसाठी हा रामबाण उपाय आहे. हे करण्यासाठी, सर्व प्रथम, एक कप मध्ये कच्चे दूध घाला. त्यात अर्धा चमचा गुलाबपाणी आणि समान प्रमाणात मध मिसळा. आता हे सर्व एकत्र करून ओठांवर लावा. आता १५ मिनिटे ओठांवर लावल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका. हे रोज रात्री झोपण्यापूर्वी लावल्याने ओठांचा कोरडेपणा कमी होईल. (Top Marathi Headline)
======
Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय
======
* रात्री झोपताना फुठलेल्या ओठांवर दूधाची साय लावून झोपा. यामुळे एका रात्रीतच आपल्याला या समस्येतून खूप आराम मिळेल. जर, आपण दररोज असे केले तर, ओठांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसेच, ओठ मऊ होतील. दूधाची साय अर्थात मलई ओठांच्या नाजूक त्वचेवर डीप मॉइश्चरायझर म्हणून काम करते. (Top Trending News)
* थंडीच्या दिवसात तुम्ही संत्र्यांची सालं ओठांना लावा. फाटलेल्या ओठांपासून सुटका देण्यासाठी याचा उपयोग होतो आणि परिणामकारक ठरतात. यासाठी १ चमचा संत्र्याच्या सालाची पावडर घ्या. त्यात साधारण १०-१५ थेंब बदाम तेल मिक्स करा. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
