आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही. मिठाई म्हणजे आपल्या सर्वच भारतीय लोकांची जीव की प्राण. काहींना तर मिठाई खायला कोणत्याही खास दिवसाचे कारण लागत नाही. खायची इच्छा झाली की लगेच मिठाई घरात येते. मिठाईची शोभा वाढवण्यासाठी, तिला अधिक आकर्षक बनण्यासाठी मिठाईला वेगवेगळ्या आकारात आणि रंगांमधे बनवतात. मात्र यासोबतच तिची सुंदरता वाढवण्यासाठी तिला चांदीचा वर्ख लावला जातो. काही ठिकाणी मिठायांना चांदी आणि सोने दोघांचाही वर्ख लावण्यात येतो. या वर्खमुळे मिठायांना आकर्षक लूक मिळतो सोबतच तिचा रिचनेस देखील कमालीचा वाढतो. मात्र हा चांदीचा वर्ख कसा तयार करतात?, हा वर्ख कधीपासून लावला जातोय?, याचा काही फायदा आहे का? आदी गोष्टींबद्दल तुम्हाला जास्त माहिती नसेल. आज आपण याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. (Indian Sweets)
माहितीनुसार मिठाईवर सोने-चांदीचं वर्क लावण्याची परंपरा मुघल काळात सुरू झाली असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ती सर्वसामान्य दुकानदारांपर्यंत आणि पर्यायाने घरांपर्यंत पोहोचली. चांदी किंवा सोन्याचा वर्ख तयार करण्यासाठी अतिशय मोठी आणि मेहनती प्रक्रिया पार पाडावी लागते. हा वर्ख म्हणजे सोने किंवा चांदीची एक अतिशय पातळ शीट असते. चांदीची ही सिल्व्हर फॉइल खाण्यायोग्य बनवण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. पातळ आणि खाताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी फॉइल कारागीर बनवतात. (Marathi)
ही फॉइल प्रत्यक्षात चांदीचे नॉन-बायोअॅक्टिव्ह तुकडे ठोकून त्यापासून तयार केली जाते. ही फॉइल तुटू नये यासाठी अतिशय लक्षपूर्वक आणि सफाईदारपणे मिठाईवर ठेवली जाते. ही फॉइल खूपच नजक असते, आपण हात लावला तरी ती फॉइल लगेच तुटते. म्हणूनच ही फॉइल तेवढी पातळ बनवण्यासाठी मेहनत घेतली जाते. काही जणांच्या मते, त्यात कॅडमियम, निकेल, अॅल्युमिनियम आणि शिसंही मिसळतात. त्यामुळे आरोग्यास हानी पोहोचते. या चांदीच्या फॉइलची जाडी फक्त ०.२ ते ०.८ मायक्रोमीटर असते. ते खाण्यायोग्य असते, पण त्याला विशिष्ट अशी चव नसते. (Latest Marathi Headline)

भारतात, चांदीचे वर्ख केवळ सजावटीसाठी नसून ते पवित्रता, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक देखील मानले गेले आहे. जैन धर्मात मंदिरातील मूर्ती सजवण्यासाठीही चांदीचे वर्ख वापरले जाते. प्राचीन आयुर्वेदानुसार, सोने आणि चांदीमध्ये उपचाराचे गुण असतात. चांदी थंड स्वभावाची असून ती जंतूंविरुद्ध लढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. चांदीचा वर्ख मिठाईवर लावल्याने चांदी जीवाणूंची वाढ थांबवते आणि मिठाई ताजी ठेवते. तर सोने हे उत्साह आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. ते शरीराला ऊर्जा आणि ताकद देते, म्हणूनच वर्कचा वापर फक्त सजावटीसाठी नव्हे, तर औषधी कारणांसाठीही केला जातो. (Marathi Top News)
फॉइल खरंच मांसाहारी असते का?
अनेकांना ही फॉइल मांसाहारी आहे असेच वाटते. त्यामुळे शाकाहारी लोकं अशी वर्ख लावलेली मिठाई खाणं टाळतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ही फॉइल जनावरांच्या कातडीत ठेवून, ठोकून पातळ केली जाते, असे त्या व्हिडिओत दाखवले असल्याचे आपल्याला दिसते. पण भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणाने ही फॉइल तयार करण्यासाठी प्राण्यांच्या कातड्याच्या वापरावर बंदी घातली आहे. (Top Trending News)
======
True Crime Story : फक्त ८ मिनिटांत त्यांनी ८२० कोटी चोरले…तेही दिवसाढवळ्या!
======
तरीही तुम्हाला त्यात भेसळ असल्याचा संशय येत असेल तर तुम्ही ती फॉइल घेऊन आगीच्या ज्योतीवर ठेवून बघा. ती फॉइल जाळल्यानंतर त्यातून धातूसारखा वास आला असेल तर ती खरी चांदीची फॉइल आहे. त्यातून प्राण्यांच्या चरबीचा वास येत असेल तर ती फॉइल मांसाहारी असल्याचे लक्षात येईल. आजकाल बहुतेक चांदीचे वर्क हे यंत्राने बनवलेले असतात. त्यात प्राण्यांचे कोणतेही अवयव नसतात. ते पूर्णपणे शाकाहारी असतात. त्यात शुद्ध चांदी असते, कागदावर किंवा मशीनमध्ये ते तयार केले जातात. मोठे ब्रँड आता वर्कला “शाकाहारी प्रमाणित” असे लेबलही त्या मिठाईच्या बॉक्सवर लावतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
