Home » Cricket : ‘या’ आहेत सर्वांत श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटपटू

Cricket : ‘या’ आहेत सर्वांत श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटपटू

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cricket | International News
Share

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला आणि मोठा इतिहास घडवला आहे. सध्या सर्वत्र भारताच्या या लेकींचे जगभर कौतुक होत आहे. या शानदार विजयामुळे जल्लोषाला उधाण आले असून सोशल मीडियातर पूर्णपणे वर्ल्डकपमय झाले आहे. या मॅचमधील अनेक महत्त्वाच्या क्षणांचे, विजयी जल्लोषाचे अनेक व्हिडिओ, फोटो कमालीचे व्हायरल होताना दिसत आहे. (Cricket)

भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने हा वर्ल्डकप जिंकल्यामुळे एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव संपूर्ण देश घेताना दिसत आहे. या अभूतपूर्व कामगिरीनंतर आता आपल्या महिला टीमवर कोट्यवधी बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे. या टीममधील खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची बहुमूल्य बक्षिसं दिली जाणार आहेत. अशातच आपण नेहमीच आपल्या पुरुष क्रिकेटर्सच्या संपत्तीबद्दल त्यांच्या कमाईबद्दल ऐकत असतो. मात्र महिला क्रिकेटर्सबद्दल आणि त्यांच्या संपत्तीबद्दल जास्त बोलले जात आहे. आज आपण या लेखातून भारतीय महिला क्रिकेटर्सपैकी सर्वात श्रीमंत कोणती खेळाडू आहे ते जाणून घेऊया. (Marathi News)

मिताली राज
मिताली राज हे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार म्हणून मिताली राजची विशेष ओळख आहे. यासोबतच ती एक यशस्वी कर्णधार म्हणून देखील ओळखली जाते. मितालीने वयाच्या १० व्या वर्षी तिच्या मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने तिने थेट टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आणि एवढेच नाही तर संघाचे नेतृत्वही केले. टीम इंडियाला मोठे करण्यात आणि ओळख मिळवून देण्यात मितालीने महत्वाची, मोठी भूमिका बजावली आहे. (Todays Marathi Headline)

Cricket

ती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मितालीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. आंतराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. रिपोर्ट्सनुसार, मिताली राज ही सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण नेटवर्थ ४०-४५ कोटी रुपये इतकी आहे. मिताली राज अनेक ब्रँडचा प्रचार करून पैशांची कमाई करते. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ती प्रशिक्षक म्हणूनही काम करते. (Latest Marathi Headline)

स्मृती मंधाना
भारतीय महिला संघाची उपकर्णधार अशी ओळख असलेली २९ वर्षीय स्मृती मंधाना ही स्टार क्रिकेटपटू आहे. तिची नेट वर्थ ३२-३४ कोटी रुपये इतकी आहे. ती क्रिकेट, ब्रँड प्रमोशन आणि व्यवसायातून कमाई करते. बीसीसीआयसोबत झालेल्या ए ग्रेड करारातून वर्षाला ५० लाख रुपयांची कमाई करते. तर आयपीएलमधून ३.४ कोटी रुपयांची करते. ती आयपीएलमध्ये आरसीबी संघाची कर्णधार देखील आहे. यासोबतच स्मृती ह्युंदाई, नाईक आणि रेड बूल यांसारख्या ब्रँडचे प्रमोशन करून ५०-७५ लाखांची कमाई करत असते. सांगलीत स्मृती मंधानाचे घर आहे. तसेच ती SM-18 नावाने स्पोर्ट्स कॅफे देखील चालवते. लवकरच स्मृती तिचा प्रियकर संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न बंधनात देखील अडकणार आहे. (Top Trending News)

=======

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

Cricket : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा पाऊस

=======

हरमनप्रीत कौर
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या ३६ वर्षीय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातच भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकला. तिच्या कामगिरीचे देशभरात कौतुक होत आहे. हरमनप्रीत देखील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत आहे. तिची नेट वर्थ २५ कोटी रुपये इतकी आहे. तिला ए ग्रेड करारानुसार बीसीसीआयकडून वर्षाला ५० लाख रुपये मिळतात. ती पंजाबमध्ये उपअधीक्षक म्हणूनही कार्यरत आहे. ब्रँड प्रमोशनमधून वार्षिक ५० लाखापर्यंत कमाई करते. तिचं पंजाब आणि मुंबईत घर आहे. तिच्याकडे महागड्या गाड्या आहेत. तिला दुचाकी चालवायला आवडते. तिच्याकडे अनेक महागड्या दुचाकी देखील आहेत. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.