आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात आपण कायमच आपल्या लुक्सच्या बाबतीत सजग असतो. बाह्य भागाची तर कायम काळजी घेतली जाते. मात्र आपल्या शरीराचा जो भाग दिसत नाही, त्याकडे आपण मुद्दाम किंवा नकळत दुर्लक्ष करतो आणि त्याची पाहिजे तशी काळजी घेत नाही. त्यामुळे मांड्या, जांघेत खूपच काळपटपणा येतो. महिलांना या समस्येचा जास्तच सामना करावा लागतो. अनेकदा महिला ही समस्या दुर्लक्षित करतात, मात्र त्याचा चुकीचा परिणाम होऊन एकतर इन्फेक्शन होऊ शकते किंवा प्रायव्हेट पार्टला त्याचा त्रास होऊ शकतो. (Marathi)
आजच्या काळात महिला, मुली आपल्या सर्वच समस्येकडे सकारात्मक पद्धतीने बघत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आता प्रायव्हेट पार्ट आणि आसपासच्या जागेला आलेला काळेपणा दूर करण्यासाठी महिला अनेकदा बाजारातील महागडे प्रोडक्टस देखील आणतात आणि वापरतात. मात्र आपल्या प्रायव्हेट पार्टची जागा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट किंवा आसपासच्या त्वचेवर बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरल्याने काही साइड इफेक्ट होण्याची शक्यता देखील नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे असे केमिकल्स असलेले प्रोडक्टस न वापरल्यासच उत्तम. केमिकलयुक्त प्रोडक्ट्स ऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय करून काळवंडलेली प्रायव्हेट पार्ट आणि त्याच्या आजूबाजूच्या त्वचेची समस्या कमी करू शकता. यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
चंदन पावडर
चंदन पावडर काळ्या पडलेल्या मांड्या आणि प्रायव्हेट पार्टची जागा यावर रामबाण म्हणजे चंदनाची पावडर. हायपरपिगमेंटेशनची समस्या चंदनामुळे दूर होऊ शकते, ही पेस्ट काळ्या पडलेल्या त्वचेवर लावा 20 मिनिटे ठेऊन द्या आणि धुवून टाका. (Skin Care)
पपई
नितळ त्वचेसाठी पपई खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. पपईमध्ये ‘पपाइन’ नावाचं एन्झाईम असते. या एन्झाईममुळे काळवंडलेल्या त्वचा उजळण्यास मदत होते. शिवाय मृत त्वचेच्या समस्याही कमी होतात. पपईची पेस्ट काळवंडलेल्या त्वचेवर अर्धा तास लावून ठेवावी. यानंतर कोमट पाण्यानं त्वचा स्वच्छ करावी. (Marathi News)

बटाट्याचा रस
बटाटा कापून त्याचा रस काढून घ्या. हा रस प्रायव्हेट पार्टवर लावा. किंवा बटाटा मिक्समध्ये वाटून त्याची पेस्ट देखील तुम्ही गुप्तांगावर लावू शकता. ही पेस्ट १५ मिनिटांसाठी काळवंडलेल्या त्वचेवर लावून ठेवावी. यानंतर कोमट पाण्यानं प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते. या घटकामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत मिळते. (Todays Marathi Headline)
लिंबू आणि मधाचा स्क्रब वापरा
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात, तर मध त्वचेला मॉइश्चराइज करण्याचे काम करते. हे मिश्रण वापरल्याने डेड स्किन रिमूव्ह होते आणि हळूहळू त्वचेचा रंग उजळ होतो. यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र मिसळून प्रभावित भागावर लावा. १० मिनिटांनी हलक्या हाताने चोळा आणि कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय करा. (Marathi News)
बेसन
बेसन हे नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. बेसनमध्ये पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवावी लागेल नंतर हे मिश्रण भागावर लावावी लागेल. बेसन सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवावे. काही काळ असे केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक दिसू लागतील. (Top Marathi News)
कोरफड
कोरफडमुळे तुमचा रंग उजळण्यास मदत होईल. तसेच कोरफड तुमच्या त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल. त्याचप्रमाणे कोरफड त्वचेचा काळसरपणा दूर करू शकतो. याकरता १ चमचा कोरफड घ्या. ते तुमच्या त्वचेवर लावा किंवा हलक्या हाताने मसाज करा. थोड्यावेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होऊ शकतो. (Latest Marathi HEadline)
खोबरेल तेल आणि लिंबू
काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेल आणि लिंबाचा रस खूप प्रभावी ठरू शकतो. हे दोन्ही घटक एकत्र करुन घ्या. हे मिश्रण काळवंडलेल्या जागेवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. साधारण २ तासांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ करुन घ्या. यामुळे काळेपणाची समस्या दूर होईल. (Top Trending News)
========
Guru Nanak Jayanti : जाणून घ्या शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव कोण होते?
========
बदामाचे किंवा व्हिटॅमिन ई तेल
बदामाचे तेल आणि व्हिटॅमिन ई त्वचेसाठी उत्तम असते. हे तेल त्वचेला पोषण देऊन नैसर्गिकरित्या टोन सुधारते. हा उपाय करण्यासाठी बदामाचे तेल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल काढून हलक्या हाताने प्रायव्हेट भागावर मालिश करा. यामुळे रक्तसंचार वाढतो आणि त्वचेची नैसर्गिक चमक परत मिळते. (Social News)
(टीप: कोणताही उपाय करून पाहण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)
