Home » Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cricket
Share

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी दोन वेळा अंतिम सामन्यात विश्वचषकाने हुलकावणी दिल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र महिला टीमने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत २०२५ सालच्या विश्वचषकाला जिंकून घेत इतिहास रचला आहे. सध्या सर्वत्र भारतीय महिला क्रिकेट टिमचीच चर्चा होताना दिसत आहे. अशातच भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू असणाऱ्या स्मृती मंदाना आणि तिच्या लग्नासंदर्भात एक खास बातमी समोर आली आहे. भारताला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जिथे संपूर्ण जग आपल्या भारतीय पोरींचे कौतुक करत आहे, तिथे आता स्मृतीच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांनाच सुखद धक्का दिला आहे. (Cricket)

भारतीय स्टार क्रिकेटपटू स्मृती मंदाना लवकरच संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. या लोकप्रिय जोडीचा विवाह सोहळा लवकरच मोठ्या जल्लोषात पार पडणार असल्याची बातमी जोर धरत आहे. दोघांनीही आपल्या नात्याबाबत उघडपणे सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला असून, टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. २०१९ पासून स्मृती आणि पलाश रिलेशनशिप मध्ये आहे तर जुलै २०२४ मध्ये त्यांनी त्यांचे नातं सर्वांसमोर जाहीर केले होते. (Latest Marathi News)

स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, वर्ल्डकपनंतर आता याच नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाचा जंगी सोहळा पार पडणार आहे. २० नोव्हेंबरपासून लग्न समारंभांला सुरुवात होणार असून मुख्य विवाह सोहळा हा महाराष्टरातील सांगलीत पार पडेल. सांगलीत लग्न करण्यामागे मुख्य कारण म्हणजे, स्मृती मंदाना दोन वर्षांची असल्यापासून सांगलीतील माधवनगर भागात राहते. तिचे संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण सांगलीतच झाले. त्यामुळे सांगली शहर तिच्या खूपच जवळ आहे. म्हणूनच स्मृती आणि पलाश यांचे लग्न सांगलीमध्ये होणार आहे. (Top Marathi Headline)

Cricket

स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल कोण आहे?
समृती मंधानाच्या बॉयफ्रेंडचे नाव पलाश मुच्छल असे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. मागच्याच वर्षी त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१९ सालापासून ते नात्यात आहेत. दरम्यान पलाश मुच्छल एक प्रसिद्ध संगीतकार, गायक, चित्रपट निर्माता आहे. त्याने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केलेले आहे. संगीताची मोठी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात पलाश मुच्छलचा जन्म झाला आहे. पलाश मुच्छाल २९ वर्षांचा आहे. तो व्यवसायाने संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे, तर स्मृती २७ वर्षांची आहे. पलाशने भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. बॉलिवूडमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करण्यासोबतच तो देश-विदेशात चॅरिटी शो देखील करतो. (Top Stories)

पार्टी तो बनती है, तू ही है आशिकी या गाण्यांसाठी पलाशला ओळखले जाते. तू जो कहे, निशा आणि फॅन्स नही फ्रेण्ड्स यासारखे म्युझिक व्हिडीओंचीही त्याने निर्मिती केलेली आहे. अभिनेता म्हणूनही पलाशने ‘खेलें हम जी जान से’ या चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘अर्ध’ या वेगळ्या आणि सुंदर चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. पलाशची मोठी बहीण पलक मुच्छाल ही एक बॉलिवूड प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका आहे, तिने सलमान खान आणि हृतिक रोशनच्या चित्रपटात सुंदर गाणी गायली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती २० ते ४१ कोटी रुपयांची असल्याचं सांगितले जात आहे. (Top Trending Headline)

पलाशने २०१४ साली आलेल्या ‘डिशकियॉँ’ या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘अमित साहनी की लिस्ट’ यांसारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले, तसेच ‘पार्टी तो बनती है’ आणि ‘तू ही है आशिकी’ यांसारखी लोकप्रिय गाणी केली. वयाच्या फक्त १८ व्या वर्षी पलाश बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकार बनला आणि त्यांची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये झाली आहे. (Top Marathi News)

पलाश मुच्छल सध्या त्यांचा नवीन चित्रपट ‘राजू बँड वाला’ दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट बँड सदस्यांच्या जीवनावर, संघर्षांवर आधारित आहे. ‘पंचायत’ या वेब सिरीजमधून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता चंदन रॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, तर ‘बालिका वधू’ फेम अविका गोर ही मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. (Latest Marathi Headline)

======

Cricket : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा पाऊस

======

पलाशने TSeries, Zee Music Company आणि Pal Music साठी ४० हून अधिक म्युझिक व्हिडिओ बनवले आहेत. पलाशने ‘रिक्षा’ नावाची वेबसिरीज बनवली होती जी खूपच गाजली. तर स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ३ कोटी ४० लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. (Top Trending News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पलाश मुच्छलने त्याची बहीण पलक मुच्छलसमोर स्मृती मानधनाला प्रपोज केले. त्याने स्मृतीला एक रोमँटिक गाणेही समर्पित केले आणि ती पूर्णपणे प्रभावित झाली. दोघांनी २०१९ मध्ये त्यांचे नाते सुरू केले आणि गेल्या जुलैमध्ये त्यांनी ते उघड केले. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.