Home » Cricket : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा पाऊस

Cricket : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा पाऊस

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cricket
Share

यंदा देखील २ तारीख भारतासाठी लकी ठरली. २०११ साली २ एप्रिलला रचल्या गेलेल्या इतिहासाची २ नोव्हेंबर २०२५ रोजी पुनरावृत्ती झाली. २ नोव्हेंबर ही तारीख भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली गेली आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिपखाली भारतीय महिला टीमने पहिल्यांदा ICC वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. महिला टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. या विजयाची संपूर्ण भारतीयांना प्रतीक्षा होती. अखेर भारताने साऊथ आफ्रिकेला नमवत ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयानंतर सगळीकडे फक्त या भारताच्या लेकींचीच चर्चा आहे. महिला क्रिकेट टीमवर कौतुकसोबतच अनेक बक्षिसांचा देखील पाऊस पडत आहे. (Cricket)

वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षिसाची रक्कम भारतीय महिला क्रिकेट टीमने पटकावली. रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनले. भारताच्या महिला संघाने याआधी दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारली होती. पण त्यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र यंदा भारतीय टीम इतिहास रचण्यासाठीच मैदानात उतरली होती. भारतीय टीमने कमाल खेळ दाखवत विश्वचषक आपल्या नावे केला आहे. (Marathi News)

वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी टुर्नामेंटच्या प्राइज मनी संदर्भात मोठी घोषणा केली होती. त्यांनी प्राइज मनीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली होती. एवढ्या मोठ्या प्राइज मनीची घोषणा केल्यानंतर विजेता बनण्याचा पहिला मान टीम इंडियाला मिळाला आहे. वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या बदल्यात ICC कडून टीम इंडियाला ४.४८ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४० कोटी रुपयांच इनाम मिळालं. ही महिला आणि पुरुष क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक प्राइज मनी आहे. (Top Marathi News)

Cricket

इतकचं नाही, प्रत्येक टीमप्रमाणे भारतीय टीमला आधीपासून निश्चित असलेली अडीच लाख डॉलर म्हणजे २.२२ कोटी रुपये सुद्धा मिळतील. त्याशिवाय लीग स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला ३४,३१४ डॉलर मिळणार आहेत. टीम इंडियाने लीग स्टेजमध्ये ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यासाठी ९२ लाख रुपये मिळतील. याशिवाय, बीसीसीआयने महिला संघाला ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi Headline)

राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया यांनी विजयी संघाला मौल्यवान बक्षिसांची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सर्व खेळाडूंना नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने भेट देण्याची घोषणा तर केलीच, पण त्यांच्या घरी सौर छतावरील प्रणाली बसवण्याची इच्छाही व्यक्त केली. (Top Stories)

दक्षिण आफ्रिकेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण त्यांना सुद्धा रनर-अप म्हणून प्राइज मनीची मोठी रक्कम मिळणार आहे. उपविजेत्याला मिळणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या नंबरवर आहे. त्यासाठी त्यांना २.२४ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास २० कोटी रुपये मिळाले. त्याशिवाय आधीपासून निश्चित असलेले २.२२ कोटी रुपये मिळतील. आफ्रिकेच्या टीमने लीग स्टेजमध्ये ५ सामने जिंकले होते. त्यांना ३४,३१४ डॉलरच्या हिशोबाने १.५ कोटीपेक्षा पण जास्त रक्कम मिळेल. (Top Tredning News)

========

Cricket : टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावलेले कोच अमोल मुजुमदार कोण आहेत?

========

भारतीय महिला क्रिकेट संघ २००५ मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक फायनलमध्ये पोहोचला होता, जेव्हा ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात भारताला हरवून चॅम्पियन बनले होते. २०१७ मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला, जिथे इंग्लंडने विजेतेपद जिंकले. आता, भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत मजल मारली आणि विश्वकप जिंकला देखील. याआधी १४ वर्षांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2 एप्रिलला भारतीय टीमने दुसरा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. यावर्षी भारताने आयसीसीच्या चार ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.