२ नोव्हेंबर रोजी भारतामध्ये दिवाळीनंतर मोठी दिवाळी साजरी झाली. याला कारणही तसेच होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि इतिहास घडवला. २ नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेट विश्वासाठी खूपच खास आणि संस्मरणीय ठरला. भारतीय महिला संघाच्या दमदार कामगिरीमुळेच आपल्या पोरीने थेट विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. सगळीकडे आज फक्त आणि फक्त भारताच्या या धाकड मुलींनीच चर्चा होताना दिसत आहे. अविरत मेहनत घेत आपल्या महिला टीमने हा अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. या विजयामध्ये जितका वाटा आपल्या टीम इंडियाचा आहे तेवढाच या टीमचे असलेले कोच अमोल मुजुमदार यांचा आहे. (Cricket)
या टुर्नामेंटमध्ये भारतीय संघाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, मात्र साखळी सामन्यांमध्ये त्याचा सलग पराभव पाहून विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा वाट खूपच बिकट वाटत होती. पण आपल्या पोरींनी कमाल करत ऑस्ट्रलिया सारखया बलाढ्य संघाला सेमी फायनलमध्ये गारद केले आणि फायनलचे टिकत मिळवले. दक्षिण आफ्रिकासोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवत इतिहास रचला. (Amol Mujumdar)
मात्र या इतिहासामध्ये एक नाव सतत गाजत आहे, आणि ते म्हणजे अमोल मुजुमदार. आपल्या महिला संघांचे प्रशिक्षक असलेल्या अमोल मुजुमदार यांचा या यशामध्ये सर्वात मोठा वाटा आहे. अमोल मुजुमदार हे कधीही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही तरीही त्यांनी आपल्या महिला टीमला थेट विश्वचषक जिंकून देण्यात मोठे योगदान दिले. मग नक्की अमोल मुजुमदार आहे तरी कोण? चला जाणून घेऊया. (Todays marathi Headline)

अमोल यांना भारताचा पुढचा सचिन म्हणून ओळखले जायचे. मात्र एवढे चांगले खेळाडू असूनही ते भारताकडून खेळले नाही. कोण आहे अमोल पाहूया. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचे मोठे योगदान आहे. अमोल सरांच्या शिकवणीमध्ये आपल्या पोरींनी जग जिंकले आहे. आपल्या शांत नेतृत्व शैलीने अमोल यांनी खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला आणि विश्वचषकाला गवसणी घातली आहे. अमोल यांची भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य कोच म्हणून २०२३ मध्ये निवड झाली. त्यांनी संघात स्थिरता आणली आणि निवड, नेतृत्वावर उठलेल्या प्रश्नांना आपल्या कामाने चोख उत्तर दिले. अमोल यांच्या नियुक्तीवर काही लोकांनी बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र मुजुमदार यांनी शब्दाने आणि तर आपल्या कामाने सगळ्यांचेच तोंड बंद केले. (Top Stories)
अमोल मुजुमदार याचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ११ नोव्हेंबर १९७४ रोजी मुंबईत अमोल मुजुमदार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अनिल मुजुमदार हे क्रिकेटप्रेमी होते आणि त्यांनी अमोल यांना सुरुवातीपासूनच क्रिकेटमध्ये रस आणण्यास सुरुवात केली. अमोल यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण बी.पी.एम. हायस्कूलमधून घेतले. मात्र पुढे प्रशिक्षक रामकांत आचरेकर यांच्या सल्ल्याने त्यांनी शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतला. याच शाळेत अमोल यांची भेट सचिन तेंडुलकरशी झाली. सचिनसोबतच झालेल्या भेटीचा अमोल यांच्यावर मोठा प्रभाव पडला. सचिनचे गुरु असलेल्या रामकांत आचरेकर सरांनीच अमोल यांना बॅटिंगमधील तंत्र शिकवले. अमोल यांच्या शांत, शिस्तबद्ध आणि मेहनती स्वभावामुळेच त्यांना “न्यू तेंडुलकर” म्हणून ओळख मिळाली. (Top Marathi News)
ते १९९४ च्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे उपकर्णधार होते. ते राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासोबत इंडिया अ संघाकडूनही खेळले आहे. अमोल मुझुमदार यांनी शाळेतच असताना सचिन तेंडुलकरच्या संघात खेळून प्रचंड धावांचा विक्रम केला होता. अमोल मुझुमदार यांनी १९९३ साली रणजी सामन्यात मुंबईकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात अमोल मुझुमदार यांनी मुंबईसाठी हरियाणाविरुद्ध २६० नाबाद धावा केल्या, हा त्या काळातील मोठा विक्रम होता. अमोल मुजुमदार मुंबईसोबतच आंध्र प्रदेश आणि आसामच्या संघाकडूनही रणजी सामने खेळले आहेत. २०१३ मध्ये आंध्र प्रदेशकडून अमोल यांनी त्यांचा शेवटचा रणजी सामना खेळला होता. (Latest Marathi Headline)
रणजी ट्रॉफीमध्ये अमोल मुजुमदार यांनी ९००० पेक्षा जास्त धावा केल्या आणि अमरजित कायपीचा विक्रम मोडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले. त्याच्या एकूण फर्स्ट-क्लास कारकीर्दीत १७१ सामन्यांत ११,१६७ धावा यात त्यांनी ३० शतके करत सरासरी ४८.१३ धाव केल्या तर लिस्ट A मध्ये ३२८६ धावा ज्यात त्यांनी ३ शतके ठोकले. तसेच अमोल मुझुमदार यांनी १४ टी-20 सामन्यांमध्ये १७४ धावा केल्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. (Top Trending News)
======
Rohit Arya : १७ मुलांचा जीव, एन्काउंटर आणि संपूर्ण बॅकस्टोरी …
Temple : २५ लाख दगड फोडून बांधले गेलेले रहस्यमयी कैलास मंदिर
======
पुढे अमोल देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, मुझुमदार यांनी प्रशिक्षक म्हणून कारकिर्द सुरू केली. त्यांनी भारताच्या १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील संघांसाठी फलंदाजी प्रशिक्षक, नेदरलँड्स क्रिकेट संघाचे सल्लागार आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मुझुमदार यांनी भारत दौऱ्यादरम्यान दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघालाही काही काळ प्रशिक्षणही दिले आहे. त्यांनी मुंबई रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
