आज आवळा नवमी. दरवर्षी आवळा नवमी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी केलेल्या शुभ कर्मांचे फळ कधीही नष्ट होत नाही, म्हणून या दिवशी “अक्षय” नवमी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात वास्तव्य करत होते. म्हणून अक्षय नवमीला आवळ्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी द्वापार युगाची सुरुवात होते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. (Amla)
आवळा हा अतिशय औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. आकाराने लहान असलेला हा आवळा अतिशय गुणकारी आहे. चवीला तुरट आणि काहीसा आंबट असला तरी त्याचे शरीराला होणारे फायदे मात्र अनेक आहेत. प्रत्येक लहान मोठ्या आजारांवर हे फळ रामबाण उपाय आहे. या आवळ्याच्या झाडाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच त्याच्या आरोग्यदायी महत्त्व देखील आहे. नियमित आवळ्याचे सेवन केले ते अनेक मोठमोठे लाभ आपल्या शरीराला होतात. हिवाळ्यात आवळा खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. आता हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रोज एक तरी आवळा खाणं गरजेचे आहे. थंडीच्या दिवसात जर आवळ्याचे सेवन केले तर त्याचे अनेक लाभ होतात, जाणून घेऊया याच लाभांबद्दल. (winter Health)
– आवळा विंटर सुपरफूड म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात सामान्यतः संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे या कालावधीत आवळा खाणं सर्वोत्तम मानलं जातं. आवळ्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. तसंच आवळा हे फळ अँटीऑक्सिडंट्सचा प्रमुख स्रोत आहे. हिवाळ्यात आवळा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच यामुळे केसगळती, अॅसिडिटी, वजन कमी होणं आणि हिवाळ्यातल्या छोट्या-मोठ्या समस्या दूर होतात. (Amla Navmi)
– आवळ्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिस, संधिवात आणि सांधेदुखीच्या समस्येतही आराम मिळतो. (Marathi News)
– आवळ्यात अॅडाप्टोजेनिक गुणधर्म असतो. यामुळे तणाव कमी होतो. त्यामुळे हिवाळ्यात तणाव कमी करण्यासाठी आवळा सेवनाचा सल्ला दिला जातो. आवळ्यातले अँटीऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते. आवळ्याचा रोजच्या आहारात समावेश केला, तर हिवाळ्यात समस्या तीव्र स्वरूपात जाणवत नाहीत. तसच त्वचा तरुण आणि चमकदार राहते. (Todays Marathi Headline)

– आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. त्यात असलेले पॉलीफेनॉल इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि ग्लुकोज चयापचय नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी संभाव्यतः फायदेशीर ठरते. (Top Stories)
– आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हे तणाव कमी करून हृदयाच्या आरोग्य चांगले ठेवतात. आवळा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (Top Trending Headline)
– आवळा हा व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्रोत आहे. त्यात संत्र्यापेक्षा ८ पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि १ आवळ्यात संत्र्यापेक्षा १७ पट जास्त अँटीऑक्सिडेंट असतात. व्हिटॅमिन सी सोबत, हे कॅल्शियमचा समृद्ध स्रोत देखील आहे. अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासोबतच सर्दी किंवा खोकल्यामध्येही आराम मिळतो. (Top Marathi News)
– आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी तुमची चयापचय वाढवण्यास मदत करतात आणि सर्दी आणि खोकल्यासह विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य रोग टाळतात. आवळ्याची तुरट चव तुम्हाला निरोगी ठेवते, म्हणून तुम्ही ते कँडीमध्ये किंवा आवळा, गूळ आणि खडे मीठ यांचे मिश्रण घालून सेवन करू शकता. (Latest Marathi Headline)
======
Skin Care : थंडीच्या दिवसात ‘हे’ घरगुती उपाय करून घ्या त्वचेची काळजी
Heart Attack : हार्ट अटैकचे आधीचे इशारे शरीर काही तासांपूर्वीच देतं चेतावणी, ओळखल्यास वाचू शकते जीव
======
– आयुर्वेदानुसार आवळ्याचा रस रोज सकाळी मधासोबत प्यायल्यास चमकदार आणि निरोगी त्वचा मिळू शकते. तुम्ही २ चमचे आवळा पावडर २ चमचे मधात मिसळूनही सेवन करू शकता. तुम्ही ते दिवसातून तीन ते चार वेळा घेऊ शकता. हा उपाय प्राचीन काळापासून वापरला जातो. (Top Trending News)
– कच्चा आवळा नियमित खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने तोंडाचे आरोग्य चांगले राहते. कारण तुमच्या हिरड्या निरोगी राहतात आणि श्वासाच्या दुर्गंधीचा त्रासही कमी होतो. आवळा हे तंतुमय फळ आहे, त्यामुळे ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यासही मदत करते. निरोगी पाचन तंत्र मजबूत चयापचय तयार करते. हे तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
 
			         
														