Home » Himalayan Secrets : रहस्यमयी तलावात हजारो वर्षांपूर्वीचे सांगाडे…

Himalayan Secrets : रहस्यमयी तलावात हजारो वर्षांपूर्वीचे सांगाडे…

by Team Gajawaja
0 comment
Himalayan Secrets
Share

कैलाश पर्वताच्या 750 किमी अलीकडे उत्तराखंडच्या डोंगरामध्ये एक रहस्यमयी तलाव आहे. ज्याचं नाव आहे रूपकुंड तलाव, हे तलाव कायम बर्फाने झाकलेला असतो पण जेव्हा उन्हाळ्यात बर्फ वितळतो तेव्हा तलावात मन हादरेल असं दृश्य दिसतं. मानवी सांगाडे, कवट्या, हाडं तलावात तरंगताना दिसतात. एक नाही, दोन नाही तर जवळपास 800 सांगाडे तरंगताना आणि आजूबाजूला पडलेली दिसतात. जेव्हा याचा अभ्यास झाला तेव्हा बऱ्याच रहस्यमयी गोष्टी समोर आल्या. पण ही मानवी हाडं इथे आली कशी? या रूपकुंड तलावाचं रहस्य काय आहे? जाणून घेऊ. (Himalayan Secrets)

रूपकुंड तलावाच्या रहस्यमयी गोष्टीची सुरुवात होते १९४२ पासून, तेव्हा एच. के. माधवल, एक भारतीय फॉरेस्ट रेंजर, हा तेव्हा ब्रिटिशांसाठी काम करायचा. त्याचं रोजचं काम होतं की, तो हिमालयातील त्रिशूल पर्वतरांगेजवळ गस्त घालायचा , जागेची पाहणी करायचा. पण अचानक एक दिवस काही तरी विचित्र घडलं. तो सहजच रूपकुंड जवळ गेला, कदाचित उन्हाळ्यात तो या जागेवर इतक्या जवळ गेला नसेल, पण त्याने जे पाहिलं, ते बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पहिल्यांंदाच त्या जागी इतके मानवी सांगाडे बघितले. त्याने लगेच आपल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळवलं. आता त्याच काळात जगात दूसरं महायुद्ध सुरू होतं. ब्रिटिशांना वाटलं हे सांगाडे कदाचित जपानी सैनिकांचे असतील, म्हणजे ते लपून छपून हल्ला करायला आले असतील आणि वादळात किंवा हिमस्खलनात बर्फात गोठून मेले असतील. मग जेव्हा याचं संशोधन झालं आणि तेव्हा असं कळलं की, हे मानवी सांगाडे दुसऱ्या महायुद्धाच्याही आधीचे आहेत. यामुळे ब्रिटिशांना दिलासा तर मिळाला पण या रूपकुंडाचं रहस्य आणखी वाढत गेलं. (Top Stories)

एक गोष्ट तर कन्फर्म झाली की, ते जपानी सैनिक नव्हते. मग दुसरा अंदाज बांधला गेला की, हे सांगाडे १८४१ च्या तिबेट-डोगरा युद्धातल्या सैनिकांची असतील का? कारण त्या युद्धात जम्मूचा राजा गुलाब सिंह याच्या फौजा तिबेटकडून हरल्या होत्या आणि रिटर्न येताना खराब हवामान आणि खराब रस्त्यांमुळे बरेच डोगरा सैनिक मेले होते, मग हे सांगडे त्यांचे असतील का? पण संशोधनात एक गोष्ट समोर आली की, ते सांगडे फक्त पुरुषांचेच नव्हते, त्यात स्त्रियासुद्धा होत्या. म्हणजे हे कोणत्याही युद्धातल्या माणसांचे सांगाडे नव्हते. आता हे रहस्य आणखी गूढ बनत गेलं. (Himalayan Secrets)

संशोधनातून काही उत्तर मिळत नव्हतं मग काही दंतकथा समोर आल्या. ज्यातील बऱ्याच कथांचा संबंध नंदा देवीशी संबंध येतो. पहिली दंतकथा अशी सांगितली जाते ती म्हणजे, प्राचीन कन्नौज राज्याचे राजे जसधवल यांच्या राज्यावर देवी नंदाची कृपा असावी म्हणून ते नंदा देवीच्या मंदिराकडे भव्य यात्रा करत होते. ही जगातली सर्वात लांब आणि अवघड पायी तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. आजही ही यात्रा दर १२ वर्षांनी एकदा होते. पण मग तेव्हा या यात्रेत हजारो भाविक होते. मग हे त्यावेळेच्या यात्रेकरूंचे सांगडे तर नाही ना? म्हणजे कोणत्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे मेले असावेत. याची शक्यता जास्त असू शकते पण दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते, तेव्हाच्या एका यात्रेत राजासोबत गर्भवती राणी बाळांपा होती. त्यांच्यासोबत बरेच नोकर, नाचणारी मंडळी आणि सैनिक घेऊन नंदा देवीच्या दर्शनाला निघाले. प्रवास लांब आणि अवघड होता. रूपकुंडजवळ पोहोचल्यावर त्यांनी तिथेच आराम करायचं ठरवलं. पण ते विसरले की ते देवीच्या पूजेसाठी आलेत. ते नाच गाणी, मस्त एंजॉय करत होते. त्यामुळे देवीला या गोष्टीचा राग आला. तिनं भयंकर बर्फाचं वादळ आणि गारांचा पाऊस पाडला आणि कोणीच वाचलं नाही. राजा, राणी आणि त्यांचे सगळे लोक तिथंच मरण पावले आणि हे सांगाडे त्यांचेच मृतदेह आहेत. बरं आणखी कथांमध्ये हिममानव यतिने हे केल्याचं संगितलं जातं. आता हे यति कोण? याचा आमचा आधीचा व्हिडिओ आहे तो वर आय बटन वर क्लिक करून तुम्हाला मिळून जाईल. (Top Stories)

=================

हे देखील वाचा : Adidas vs Puma : दोन भावांच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’चा जन्म झालाय!

=================

मग २०१९ मध्ये एका नवीन संशोधनात ३२ सांगड्यांचे डीएनए तपासले गेले. यातून धक्कादायक गोष्ट समोर आली की हे सांगाडे एकाच गटाचे नव्हते. त्या 32 डीएनएपैकी २३ साऊथ एशियन, काही Mediterranean आणि साऊथ ईस्ट एशियन होते. याशिवाय, काही सांगाडे ९व्या शतकातील होते, तर काही १८०० च्या आसपासचे होते. पण त्या आधी 2004 च्या संशोधनातून असं दिसलं होतं की, या सर्व सांगड्यांच्या डोक्यावर क्रिकेट बॉलच्या आकाराच्या गाऱ्यांच्या जखमा होत्या, जसं काही त्यांच्या डोक्यावर वरून काहीतरी जोरात पडलंय. म्हणजे गारांचा मारा किंवा हिमवादळात पडणारे दगड त्यांच्या डोक्यावर पडून ते मेले असावेत आणि या कुंडाच्या भौगोलिक रचनेमुळे म्हणजे सर्व बाजूंनी उंच आणि खाली उतार यामुळे सर्व काही कुंडाच्या मध्यभागी जमा झालं असेल. त्यामुळे गेल्या कित्येक शतकांपासून येथे मृत्यू पावलेले सांगाडे याच कुंडात जमा झाले. पण ते नक्की कोण होते याचं उत्तर सापडलं नाही. (Himalayan Secrets)

जितकं जास्त हे रहस्य सोडवायचा प्रयत्न झालाय प्रत्येक वेळी नवीन प्रश्न तयार होत गेले. इतकी वर्ष संशोधन होऊनसुद्धा या रूपकुंडाचं रहस्य आजही सुटलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं, हे मानवी सांगाडे कोणाचे असतील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.