दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची रोषणाई कऱण्यात आली होती. मात्र भारतातील अशी काही गावं आहेत, जिथे दिवाळी काही दिवसांनी साजरी होते. भारतभरातील दिवाळी साजरी झाली की, आठवडा किंवा पंधरा दिवसांच्या अवकाशानं या ठिकाणी दिवाळी साजरी होते. विशेषतः उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील डोंगराळ भागात ही दिवाळी साजरी होते. याला बुधी दिवाळी असे म्हणतात. ही बुधी दिवाळी साजरी करण्याची परंपरा भगवान श्रीराम यांच्याशी संबंधीत आहे. यावेळी या डोंगराळ गावातील वातावरण मशालींच्या प्रकाशाने आणि लोकगीतांच्या साथीनं अधिक सुखद होऊन जातं. परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचे सामर्थ्य सांगणारा हा उत्सव यावर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. (Uttarakhand)

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षापासून पर्यटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता याच बुधा दिवाळीच्या निमित्तानंही पर्यंटकांना येथे आकर्षिक करुन घेण्यात येतं. या दोन राज्यामधील अनोखे निसर्ग सौंदर्य़ आणि त्याजोडीला असलेली ग्रामीण संस्कृती बघण्यासाठी लाखो पर्यटकही या बुधी दिवाळीमध्ये सामिल होण्यासाठी येतात. यावर्षीही या बुधी दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून येथील हॉटेले आणि होमस्टे मध्ये बुकींग करण्यात येत आहे. देशभर दिवाळी साजरी झाल्यानंतर आता एका वेगळ्या दिवाळीची चर्चा सुरु झाली आहे. ही दिवाळी साजरी होते, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या दोन निसर्गाचे वरदान लाभलेल्या राज्यांमध्ये. या राज्यातील डोंगराळ भागात दिवाळीनंतर आठवडा ते पंधरा दिवसात ही बुधी दिवाळी साजरी होते. गढवाल, टिहरी, उत्तरकाशी आणि देहरादूनपासून ते हिमाचलच्या सिरमौर आणि कुल्लू खोऱ्यांपर्यंत ही बुधी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. (Social News)
या बुधी दिवाळीच्यामागे अनेक लोककथा आहेत. त्यातील प्रमुख लोककथेनुसार भगवान श्रीराम रावणाला पराभूत करुन अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी झाली. मात्र या डोंगराळ भागात ही शुभवार्ता येण्यासाठी तेव्हा आठ ते पंधरा दिवसांचा अवकाश लागला. प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले, ही बातमी कळल्यावर या सर्व डोंगराळ भागातील गावांमध्ये मोठा जल्लोष कऱण्यात आला. दिव्यांची रोषणाई करण्यात आली. त्याकाळी प्रामुख्यानं या गावांमध्ये मशालींचा वापर करण्यात येत होता. तिच परंपरा अद्याप कायम ठेवण्यात आली आहे. आता या गावात विजेची सोय आहे. सर्वत्र विद्युत पुरवठा सुरुळीत आहे. मात्र बुधी दिवाळी आल्यावर या गावांमध्ये आपली परंपरा कायम राखत विद्युत दिव्यांचा प्रकाश बंद कऱण्यात येतो, आणि सर्वत्र मशाली लावण्यात येतात. रात्रीच्या प्रकाशात या मशालींच्या उजेडात मग हे गांवकरी आपल्या पारंपरिक गाणी आणि नृत्यात रंगून जातात. प्रभू श्रीरामांच्या विजयाचे गुणगान करणारी ही गाणी गात बुधी दिवाळी साजरी होते. (Uttarakhand)

उत्तराखंडमधील गढवाल, जौनसर-बावर, उत्तरकाशी, टिहरी, देहरादून आणि चमोली येथे बुधी दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिमाचल प्रदेशात, सिरमौर, शिमला आणि कुल्लू खोऱ्यांमध्येही हा सण पारंपारिकपणे साजरा केला जातो. या भागातील ग्रामस्थ त्यांच्या स्थानिक देवतांची पूजा करतात. शिवाय डोंगराळ भागातील जीवन प्राण्यांवर अवलंबून आहे, त्या प्राण्यांचीही या बुधी दिवाळीला पुजा करुन त्यांना गोडधोड खाऊ घालण्यात येते काही ठिकाणी, बुधी दिवाळीचा सण महाभारत काळाशी देखील जोडला जातो. असे म्हटले जाते की, जेव्हा पांडव वनवासातून परतले आणि त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली तेव्हा या डोंगराळ भागात आनंदोत्सव साजरा केला गेला. कुल्लू जिल्ह्यातील निर्मंद परिसरात, बुधी दिवाळी भगवान परशुरामांशी संबंधित आहे. आख्यायिकेनुसार, भगवान परशुरामांनी येथे एका असुराचा वध केला. त्यानंतर, लोकांनी मशाली पेटवून मिरवणूक काढली. तिच प्रथा कुल्लू जिल्ह्यात आजही पाळली जाते. (Social News)
हे देखील वाचा :
=======
Queen Sirikit : फॅशन क्वीनची एक्झीट !
========
पूर्वजांनी सुरु केलेली ही परंपरा आजही पाळत येथील रहिवाली बुधी दिवाळी साजरी करतात. या विशेष प्रसंगी या गावांमध्ये सासरी गेलेल्या विवाहित मुलींना खास आमंत्रण दिले जाते. शिवाय प्रत्येक घरामध्ये नातेवाईक, मित्रपरिवाराला आवर्जून बोलवण्यात येते, आणि या आनंदोत्सवात सामिल करुन घेतले जाते. या बुधी दिवाळीला या भागात रस्सीखेच स्पर्धा होते, शिवाय पारंपारिक नृत्य सादर केले जाते. लोकगीते गायली जातात. चिडवा आणि अक्रोड यांसारखे पारंपारिक पदार्थ वाटले जातात आणि शुभेच्छा दिल्या जातात. अलिकडच्या काही वर्षात या बुधी दिवाळासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकही उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये दाखल होतात. हे पर्यटक स्थानिक परंपरा समजून घेतात आणि त्यामध्ये सामिलही होतात. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. (Uttarakhand)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
 
			         
														