Home » Amla Recipe : आवळा नवमी स्पेशल: हेल्दी राहण्यासाठी बनवा आवळ्याच्या ‘या’ खास रेसिपी

Amla Recipe : आवळा नवमी स्पेशल: हेल्दी राहण्यासाठी बनवा आवळ्याच्या ‘या’ खास रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Amla Recipe
Share

आवळा नवमीचा खास दिवस उद्या आपण साजरा करणार आहोत. आवळा नवमीच्या दिवशी भगवान विष्णू, शिव आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आवळा हे अतिशय आरोग्यवर्धक फळ आपल्याला निसर्गाने दिले आहे. वर्षभर आवळा आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतो. त्यामुळे याचे सेवन जर आपण नियमित केले तर त्याचे अनेक फायदे शरीराला होतात. आवळा व्हिटॅमिन सी चा सर्वात मोठा स्रोत आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि इतरही अनेक फायदे होतात. आवळ्याचे लाभ मिळवण्यासाठी तुम्ही आवळ्यापासून विविध प्रकारचे पेय, पदार्थ बनवून ते दररोज आहारात सेवन करू शकता. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला आवळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या काही सोप्या आणि फायदेशीर रेसिपी सांगणार आहोत. (Amla Recipe)

आवळा आणि हळदीची कांजी
साहित्य :
– २०० ग्रॅम आवळा
– ओल्या हळदीचे तीन तुकडे (अंदाजे 100 ग्रॅम)
– एक चमचा पिवळी मोहरी
– एक-दोन हिरव्या मिरच्या
– दीड लिटर पाणी
– चवीनुसार खडे मीठ किंवा काळे मीठ
कृती :
काचेच्या बरणीत एक लिटर कोमट पाणी घ्यावे. या पाण्यामध्ये अंदाजे १०० ग्रॅम ओली हळद, २०० ग्रॅम आवळा, एक टेबलस्पून वाटलेली पिवळी मोहरी आणि १ चमचा काळे किंवा खडे मीठ घाला. हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर मऊ कापडाने बरणीचे तोंड पक्के बंद करा आणि त्यावर घट्ट झाकण लावा. ही काचेची बरणी दोन-तीन दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. तीन दिवसांनंतर हे पेय तयार होईल. रिकाम्यापोटी रोज १०० ते १५० मिलीलिटर पेय नियमितपणे प्यायल्यास त्याचे सकारात्मक परिणाम शरीरावर दिसू लागतील. (Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________

आवळा रस
साहित्य:
२ चिरलेले आवळे, १ चमचा आल्याचा रस, पुदिना पाने, १/४ चमचा काळी मिरपूड, थोडा चाट मसाला, १ कप कोमट पाणी.
कृती:
आवळा रस तयार करण्यासाठी चिरलेला आवळा, आल्याचा रस, पुदीना पाने आणि कोमट पाणी सर्व एकत्र करावे आणि ब्लेंडर मध्ये वाटून घ्यावे. आता हे मिश्रण एका ग्लासात ओतून घ्या. त्यावर काळी मिरपूड आणि चाट मसाला मिसळा तयार आहे आवळा पेय. (Latest Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________

Amla Recipe

आवळा चटणी
साहित्य :
– १/२ किलो आवळा
– १ कप चिरलेली कोथिंबीर
– १ टीस्पून चिरलेली हिरवी मिरची
– १ इंच आले
– १/२ टीस्पून जिरे
– १/४ टीस्पून हिंग
– १/४ टीस्पून काळे मीठ
– चवीनुसार मीठ आणि साखर
कृती:
सर्व प्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्या आणि मोठे-मोठे कापून घ्या. आता कोथिंबीर धुवून बारीक करून घ्या. हिरवी मिरची आणि आले कापून घ्या. ब्लेंडरमध्ये आवळा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, जिरे, हिंग, काळे मीठ, मीठ आणि साखर घाला. मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून चांगली पेस्ट तयार करा. हवाबंद डब्यात साठवा आणि रेफ्रिजरेट करा. पाहिजे तर तुम्ही ती गरजेपुरती काढून त्यावर फोडणी देखील घालू शकता. (Top Marathi Headline)

______________________________________________________________________________________________________________________________________

=======

Amla Navmi : आवळा नवमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने होईल भरभराट आणि प्रगती

=======
आवळ्याचा च्यवनप्राश
साहित्य:
– एक किलो आवळा
– ५०० ग्रॅम गूळ
– १०० ग्रॅम तूप
– दोन चमचे सुंठ पावडर
– एक चमचा मिरे पूड
– एक चमचा दालचीनी पूड
– एक चमचा वेलची पूड
– दहा पंधरा तुळशीचे पाने
– केशर
– मध
कृती:
सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून चिरून घ्यावे. नंतर हे आवळे एक लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यावे. आता पाणी काढून हे उकडलेले आवळे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. एक कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये गूळ घालावा आणि पाक तयार करून घ्यावा. त्यामध्ये सुंठ पावडर, मिरे पूड, दालचिनी, वेलची पूड, तुळशीची पाने घालावी. आता एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये आवळा पेस्ट परतवून घ्यावी. त्यात गुळाचा पाक घालावा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळत राहावे आणि शिजू द्यावे. च्यवनप्राश घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करावा. थंड झाल्यानंतर त्यात मध आणि केशर घालावे. एका काचेच्या बाटलीमध्ये हा च्यवनप्राश भरून ठेवावा. (Todays Marathi Headline)

______________________________________________________________________________________________________________________________________

आवळा मुरंबा
साहित्य:
– ५०० ग्रॅम ताजे आवळे
– आवडीनुसार साखर
– पाणी
– लवंग
– वेलची
– १/२ हळद पावडर
– २ ते ३ काळी मिरी
– चिमूटभर मीठ
कृती:
सर्वप्रथम आवळा नीट धुवून स्वच्छ करावा. नंतर त्यांना सर्व बाजूंनी हलके कापून घ्या. यामुळे आवळा चांगला शिजतो आणि चव चांगली लागते. आता एका भांड्यात पाणी घालून त्यात आवळे उकळायला ठेवा. त्याचा रंग हलका होईपर्यंत आणि किंचित मऊ होईपर्यंत १० ते १५ मिनिटे आवळे उकळून घ्या. उकळल्यानंतर आवळा पाण्यातून काढून थंड होऊ द्या. नंतर त्यामधील बिया काढून टाका. आता एका कढईत पाणी आणि साखर टाकून उकळायला ठेवा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ते चांगले उकळा. साखर विरघळली की त्यात लवंग, वेलची, काळी मिरी आणि मीठ घाला. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा. यात आता उकडलेला आवळा घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. हा आवळा मुरंबा थंड झाल्यावर स्वच्छ काचेच्या बरणीत किंवा कंटेनरमध्ये ठेवावा. (Top Marathi News)

______________________________________________________________________________________________________________________________________

Amla Recipe

आवळा चहा
साहित्य:
– १ आवळा (ताजे किंवा सुके)
– १ छोटा आल्याचा तुकडा
– ५/६ पुदिनाचे पान
– १ चमचा ओवा
कृती :
एका पातेल्यात पाणी उकळा. त्यात आवळा, आलं, पुदिना आणि ओवा उकळत ठेवा, ५ ते १० मिनिटे उकळून झाल्यावर कपात ओता आणि गरमागरम आवळा चहा प्या. (Latest Marathi Headline)
______________________________________________________________________________________________________________________________________

आवळा चहा
साहित्य:
– १ चमचा आवळा पावडर किंवा १ कच्चा आवळा
– १ इंच किसलेले आले
– १ कप पाणी
– १ चमचा लिंबाचा रस
– चवीनुसार मीठ
– अर्धा चमचा मिरपूड
– मध
कृती:
सर्वात आधी आवळा पावडर किंवा कच्चा आवळा आणि आले किसून घ्या. एका पॅनमध्ये १ कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यात किसलेले आवळा आणि आले घाला. ते ५-७ मिनिटे उकळू द्या, जेणेकरून सर्व पोषक तत्व पाण्यात चांगले विरघळेल. आता त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला. लिंबाचा रस आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर मध देखील घालू शकता. हे मिश्रण चांगले मिसळा आणि गॅसवरून उतरवा. (Top Trending News)

______________________________________________________________________________________________________________________________________

आवळा लोणचे
साहित्य:
– १ किलो मोठे आवळे
– १०० ग्रॅम पिवळी मोहरी
– १०० ग्रॅम मोहरी
– १०० ग्रॅम लाल मिरची
– अर्धा चमचा हळद
– २५ ग्रॅम बडीशेप
– तेल
– मीठ

===========

Amla Navami : जाणून घ्या आवळा नवमीचे महत्त्व आणि माहिती

===========
कृती:
सर्व प्रथम, आवळा धुवा आणि कापडाने पुसून टाका. आता एका भांड्यात आवळा ठेवा, २ चमचे तेल घाला आणि मंद आचेवर शिजवा. हलके शिजल्यावर ते गॅसवरून काढा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर आवळाच्या बिया वेगळे करा.आता कढईत तेल गरम करून थोडे थंड होऊ द्या. या तेलात वरील सर्व मसाले घालून परतावा. ते पूर्णपणे थंड झाल्यावर चमच्याच्या मदतीने आवळामध्ये मसाले भरून बरणीत बंद करा. चटपटीत भरलेले आवळा लोणचे तयार आहे. (Social News)

(टीपः ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.