Home » 8th Pay Commission : 1 जानेवारी 2026 पासून लागू? 6 महिने उशीर झाला तर मिळेल किती पगार एकत्र? जाणून घ्या संपूर्ण गणित

8th Pay Commission : 1 जानेवारी 2026 पासून लागू? 6 महिने उशीर झाला तर मिळेल किती पगार एकत्र? जाणून घ्या संपूर्ण गणित

by Team Gajawaja
0 comment
8th Pay Commission
Share

8th Pay Commission

8th Pay Commission

: देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे. केंद्र सरकार लवकरच 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा वेगाने सुरु आहे. अहवालानुसार 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मागील वेळेस 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता आणि त्यानंतर 10 वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने हा निर्णय अपेक्षित आहे. या नव्या वेतन आयोगामुळे देशातील सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 67 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. (8th Pay Commission)

8व्या वेतन आयोगात काय बदल शक्य? तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवला जाऊ शकतो. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. तो वाढून 3.00 ते 3.68 पर्यंत जाऊ शकतो. जर फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत गेला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार जवळपास 26 हजार रुपयांवरून 42 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. यामुळे कर्मचार्‍यांच्या एकूण पगारात 35% ते 40% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 6 महिने उशिरा अंमलबजावणी झाली तर किती मिळेल एकत्रित पगार? जर 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार असूनही सरकारने त्याची अंमलबजावणी 6 महिने उशिरा केली, तर कर्मचाऱ्यांना अरिअर्स  मिळतील. (8th Pay Commission)

 

 जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 30,000 रुपये असेल
 आणि त्यात 40% वाढ झाली तर तो होईल 42,000 रुपये
 म्हणजे दर महिन्याला 12,000 रुपयांची वाढ

6 महिन्यांचा हिशोब
12,000 × 6 = 72,000 रुपये अरिअर्स
त्यासोबत DA, HRA इत्यादींची रक्कमही मिळेल
 म्हणजे एकत्रित रक्कम 80,000 ते 1 लाख रुपयांदरम्यान असू शकते

ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या ग्रेड, शहर श्रेणी आणि वेतनमानानुसार बदलणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मोठा फायदापगार वाढला की पेन्शन देखील त्याच प्रमाणात वाढणार. ज्या कर्मचाऱ्यांना बेसिकवर आधारित पेन्शन मिळते, त्यांना 8व्या वेतन आयोगामुळे चांगला फायदा अपेक्षित आहे. पेन्शनर वर्गासाठीही हा निर्णय आर्थिक मदतगार ठरेल. 8वा वेतन आयोग कधी जाहीर होईल? आतापर्यंत सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र निवडणुका आणि महागाईचा वाढता भार लक्षात घेता हा निर्णय लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनाही केंद्रावर दबाव टाकत आहेत की वेतन आयोग लवकर जाहीर करावा. (8th Pay Commission)

================

हे देखील वाचा :

Chocolate Market : भारतातील चॉकलेट व्यवसाय किती मोठा? वाढ, ट्रेंड आणि भविष्याची दिशा जाणून घ्या                                    

UAE Lottery Rules: भारतातून लॉटरी खरेदी करता येते का? नियम जाणून घ्या नाहीतर होऊ शकते मोठी चूक                                    

 Diella : अल्बानियाची ‘ए. आय. मंत्री’, ८३ डिजिटल बाळांक ची आई?                                    

================

8वा वेतन आयोग लागू झाल्यास:

 सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ
 6 महिने उशीर झाला तर मोठी अरिअर रक्कम
 पेन्शनर वर्गालाही थेट फायदा

कर्मचारी वर्गात या निर्णयाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या पुढील घोषणेकडे आहे.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.