हिंदू धर्मात सर्वात जास्त महत्त्व असलेले रोप किंवा झाड म्हणजे तुळशी. सनातन धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक घरामध्ये, घरासमोर तुळशीचे झाड आपल्याला दिसतेच दिसते. घराचे घरपण आणि देवाची पूजा या दोन्ही गोष्टी तुळशीशिवाय अपूर्ण असतात. मुख्य म्हणजे ही तुळशी जेवढी धार्मिक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे, तेवढीच ती वैद्यकीयदृष्ट्या देखील उपयुक्त आहे. त्यामुळे केवळ पूजेसाठी तुळशी घरात ठेवली जाते असे नाही तर अनेक लहान मोठे आजार बरे करण्यासाठी देखील तुळशी फायदेशीर आहे. याच तुळशीचे लग्न लावण्याची अतिशय जुनी आणि प्रसिद्ध परंपरा आपल्याकडे पाळली जाते. (Tulshi Vivah)
दिवाळी संपल्यानंतर अनेक घरांमध्ये तयारी सुरु होते ती तुळशी विवाहाची. दिवाळी झाल्यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. भारतात अनेक घरांमध्ये मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने तुळशी विवाह साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या एकादशीला हा सण उत्सावात साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाचा आणि तुळशीमातेचा विवाह सोहळा पूर्ण विधींनी पार पडतो. (Marathi News)
कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. त्यानुसार ०२ नोव्हेंबरपासून ०५ नोव्हेंबपर्यंत तुळशी विवाह असणार आहे. यंदा तुळशी विवाह हा २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. द्वादशी तिथीची सुरुवात २ नोव्हेंबर २०२५ रोजी, सकाळी ०७:३१ वाजता होईल, तर द्वादशी तिथीची समाप्ती ३ नोव्हेंबर २०२५ रोजी, सकाळी ०५:०७ वाजता होईल. उदय तिथीनुसार, तुळशी विवाह हा २ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा केला जाईल. तुळशी विवाह शुभ मुहूर्त २०२५ पुढील प्रमाणे आहेत. (Todays Marathi Headline)

सूर्योदय: सकाळी ०६:३४ वाजता
सूर्यास्त: संध्याकाळी ०५:३५ वाजता
चंद्रोदय: दुपारी ०३:२१ वाजता
चंद्रोदय: सकाळी ०३:५० वाजता
३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०३:५० वाजता
ब्रह्म मुहूर्त – सकाळी ०४:५० ते सकाळी ०५:४२ वाजता (Top Marathi News)
तुळशी विवाहाचा सण संध्याकाळी साजरा केला जातो. सर्वात आधी तुळशीची कुंडी किंवा वृंदावन छान पद्धतीने रंगवले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या रोपाभोवती उसाचे चार खांब उभारले जातात. त्यानंतर, तुळशीला बांगड्या, साडी आणि इतर अलंकार अर्पण केले जातात. त्यानंतर शालिग्रामची मूर्ती तुळशीच्या कुंडीच्या उजव्या बाजूला ठेवली जाते. शालिग्रामला चंदन लावले जाते आणि तुळशीला हळद कुंकू लावले जाते. सोबतच दोघांना फुले, मिठाई, ऊस आणि पंचामृत या गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. त्यानंतर धूप आणि दिवे लावले जातात. देवी तुळशी आणि भगवान शालिग्रामभोवती सात प्रदक्षिणा घालतात आणि आपापल्या पद्धतीनुसार लग्न लावले जाते. त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटला जातो. (Latest Marathi Headline)
हिंदू धर्मानुसार, तुळशीला नेहमीच पूजनीय मानले गेले आहे. आपल्या धार्मिक माहितीनुसार, तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख-शांती टिकून राहते. तसेच, घरातील आर्थिक स्थितीदेखील चांगली राहते. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. तर, पती-पत्नीच्या नात्यात जिव्हाळा वाढतो आणि त्यांचे नाते घट्ट होते. परंपरेनुसार, कार्तिक महिन्यात या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने अपार आशीर्वाद मिळतात. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर दिवा लावणे हे विशेष महत्वाचे मानले जाते. (Top Trending News)
========
Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड
========
तुळशी पूजन मंत्र
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।। (Social News)
(टीप: या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.आम्ही कोणत्याही गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
