Home » Pollock Twins : अपघातात दोघींचा मृत्यू पण त्याच घरात झाला पुन्हा जन्म…

Pollock Twins : अपघातात दोघींचा मृत्यू पण त्याच घरात झाला पुन्हा जन्म…

by Team Gajawaja
0 comment
Pollock Twins
Share

एखादी मेलेली व्यक्ती एका वर्षात पुन्हा दुसऱ्या शरीरात जन्म घेऊ शकते? 5 मे 1957 इंग्लंडच्या हेक्सम गावात जोआना अन् जैकलीन नावाच्या दोन बहिणी आपल्या एंथनी नावाच्या मित्रासोबत चर्चमध्ये जात होत्या. इतक्यात एक भरधाव कार आली आणि तिघांना चिरडून निघून गेली. तिघांचा जागीच मृत्यू झाला. पण एका वर्षात त्या दोघी बहीणींचा पुन्हा त्याच कुटुंबात जन्म झाला. हे कसं शक्य आहे ? काय आहे ही पूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Pollock Twins)

जेव्हा जोआना आणि जैकलीनचा अपघात झाला, तेव्हा त्या दोघी 11 आणि 6 वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्या दोघींचे आई वडील फ्लोरेंस अन् जॉन पोलक यांना इतका धक्का बसला की ते दोघेही आपल्या मुलींच्या मृत्यूला मान्यच करू शकत नव्हते. जॉन तर रोज फक्त एकच गोष्ट म्हणायचा की त्याच्या दोन्ही मुली पुन्हा येतील. फ्लोरेंस मात्र यावर अजिबात विश्वास ठेवत नव्हती, तिच्या मनात खूप दुःख होतं पण ती असा विचार करू शकत नव्हती. तरीही, अपघातानंतर काही महिन्यांनी फ्लोरेंस गरोदर राहिली. अपघातानंतर एक वर्षांनी ४ ऑक्टोबर १९५८ साली फ्लोरेंसने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यांची नावं ठेवली गेली जिलियन आणि जैनिफर. (Top Stories)

या मुली जन्मल्या तेव्हा, जॉन आणि फ्लोरेंसच्या लक्षात आलं की त्यांच्या शरीरावर काही विचित्र निशाण आहेत. जैनिफरच्या कपाळावर एक असा निशाण होतं जे त्यांची आधीची 6 वर्षांची मुलगी जैकलीनच्या जखमेसारखं दिसत होतं. जैकलीन तीन वर्षांची असताना एका बादलीत पडली होती आणि तिच्या कपाळावर एक कायमची जखम झाली होती, अगदी तसंच निशाण जैनिफरच्या कपाळावर होतं आणि जैनिफरच्या कमरेवर एक गोलाकार निशाण होतं, जे जैकलीनच्या कमरेवर असलेल्या जन्मखुणेसारखं दिसत होतं. जिलियनवर मात्र असा काही निशाण नव्हता, पण नंतरच्या गोष्टींनी सगळ्यांना हैराण केलं. (Pollock Twins)

Pollock Twins

जसजशा दोन्ही बहिणी मोठ्या होत गेल्या, तसं तसं त्यांच्यात जोआना अन् जैकलीनसारख्याच बऱ्याच समानता दिसू लागल्या. लोकांना हे सगळं ऐकून असं वाटलं की हे सगळं फक्त योगायोग आहे. पण हे प्रकरण अजून जास्त विचित्र होणार होतं. जिलियन अन् जैनिफर जेव्हा काही महिन्यांच्या झाल्या, तेव्हा कुटुंब विटली बे शहरात शिफ्ट झालं.

जेव्हा या जुळ्या मुली थोड्या मोठ्या झाल्या, तेव्हा कुटुंब विटली बे शहरात शिफ्ट झालं. जेव्हा त्या ४ वर्षांच्या झाल्या, तेव्हा कुटुंब परत हेक्सम शहरात आलं. आणि इथून सुरू झाल्या आणखी विचित्र घटना. इथे आल्यानंतर काही वेळाने रस्त्यावर कार दिसली की या दोघीही घाबरून जायच्या. अन् जोरजोरात ओरडायच्या की ही कार आम्हाला चिरडायला येतेय. एकदा जॉनने जोआना आणि जैकलीनच्या जुन्या खेळण्यांचा बॉक्स उघडला आणि जिलियन आणि जैनिफरला दिला. या दोघींना त्यांच्या पूर्वीच्या बहीणींबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण जिलियनने एक बाहुली उचलली आणि म्हणाली, “ही मॅरी आहे,” मॅरी हे नाव जोआनाने त्या बाहुलीला दिलं होतं आणि जैनिफरने दुसरी डॉल उचलली आणि म्हणाली, “ही सुझन आहे,” जे जैकलीनचं आवडतं नाव होतं. हे पाहून जॉन आणि फ्लोरेंस अवाक झाले. (Top Stories)

एवढंच नाही, या मुलींना हेक्सम शहरातील जुने लँडमार्क माहिती होते. त्या पार्ककडे जात म्हणत, “चला, स्विंग्सकडे जाऊ,” आणि रस्ता ओळखत जात. त्या शाळेचं नाव सांगत, जिथे जोआना आणि जैकलीन जात होत्या, पण या जुळ्या बहिणींनी कधीच ती शाळा पाहिली नव्हती. खेळताना त्या असा अभिनय करत की जणू रस्त्यावर कारने धडक दिली आहे. हे सगळं अगदी अपघातासारखं होतं. ज्यात त्यांच्या बहिणी जोआना अन् जैकलीनचा जीव गेला होता.

या मुलींच्या वागण्यातही समानता होती – जिलियन जोआनासारखी मोठी बहिणीची भूमिका घेत होती, त्या दोघींना केस विंचरायला आवडत होतं, खासकरून वडिलांचे. हे सगळं पाहून लोकांना वाटलं हा योगायोगच आहे, पण जॉनला विश्वास होता की हा पुनर्जन्म आहे. ही बातमी लोकल न्यूजपेपरमध्ये आली, आणि मग रिसर्चर डॉ. इयान स्टीव्हन्सन यांनी या केसचा अभ्यास केला. त्यांनी १९६४ साली कुटुंबाची भेट घेतली, मुलींच्या निशाणांची तपासणी केली, आई-वडिलांशी बोलणं केलं. त्यांनी रक्त चाचण्या केल्या आणि सिद्ध केलं की या जुळ्या एकसमान आहेत. त्यांच्या पुस्तकात, “Reincarnation and Biology” मध्ये त्यांनी या केसबद्दल लिहिलं. त्यांचं म्हणणं होतं की हे निशाण आणि आठवणी जेनेटिक्सने स्पष्ट करता येत नाहीत, हा एक पुनर्जन्माचाच पुरावा आहे. (Pollock Twins)

=============

हे देखील वाचा :  Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड

=============

या सगळ्या घटना खूप धक्कादायक अन् अत्यंत रहस्यमयी होत्या. म्हणूनच काही लोकांना हे पटलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की जॉनचा पुनर्जन्मावर इतका विश्वास असल्यामुळे तो मुलींना Manipulate करतोय. तरीही, डॉ. स्टीव्हन्सनने पुनर्जन्माच्या अनेक केसेस अभ्यासल्या आणि या त्यांनी एक मजबूत केस मानलं. जसजशा जिलियन आणि जैनिफर मोठ्या झाल्या, तशा त्यांच्या मागच्या जनमातील आठवणी कमी होत गेल्या. ७-८ वर्षांच्या झाल्यावर त्या सामान्य आयुष्य जगू लागल्या. एकदा १९८१ साली जिलियनला एक स्वप्न आलं, ज्यात तिने एका जुन घर पाहिलं,जो कुटुंबाचा जुना पत्ता होता, जिथे ती कधी गेली नव्हती.

हे रहस्य आजही लोकांना विचार करायला भाग पाडतं आणि प्रश्न पाडतं की, मृत्यूनंतर आयुष्य संपतं का, की आणखी काही होतं?

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.