Home » Anesthesia : एनेस्थेशिया म्हणजे काय? शस्त्रक्रियेपूर्वी ते का दिलं जातं? तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Anesthesia : एनेस्थेशिया म्हणजे काय? शस्त्रक्रियेपूर्वी ते का दिलं जातं? तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या महत्त्वाची माहिती

by Team Gajawaja
0 comment
Anesthesia
Share

Anesthesia : शस्त्रक्रिया म्हणजे शरीरावर मोठी वैद्यकीय प्रक्रिया. पण या प्रक्रियेदरम्यान वेदना न जाणवण्यासाठी जे औषध दिलं जातं, त्यालाच ‘एनेस्थेशिया’ (Anesthesia) म्हणतात. अनेक लोकांच्या मनात अजूनही एनेस्थेशियाबद्दल गैरसमज आहेत  काहींना वाटतं ते धोकादायक आहे, तर काहींना वाटतं ते कायमचं झोपवणारं औषध आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की योग्य पद्धतीने दिलं गेल्यास एनेस्थेशिया सुरक्षित आणि अत्यावश्यक असतं.

एनेस्थेशिया म्हणजे काय आणि ते कसं काम करतं? एनेस्थेशिया म्हणजे अशी औषधी प्रक्रिया जी शरीराच्या काही भागातील किंवा संपूर्ण शरीरातील वेदनांची संवेदना काही काळासाठी कमी करते किंवा पूर्णपणे बंद करते. दिल्ली राज्य कॅन्सर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की, एनेस्थेशिया मेंदूतील “सिग्नल रिसेप्टर्स” वर परिणाम करून मेंदू आणि नर्व्ह सिस्टम यांच्यातील संवाद थांबवतो. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला वेदना, दाब किंवा तापमान जाणवत नाही.

Anesthesia

Anesthesia

एनेस्थेशियाचे प्रकार

शस्त्रक्रियेनुसार डॉक्टर वेगवेगळे प्रकार वापरतात

1. लोकल एनेस्थेशिया (Local Anesthesia):
शरीराच्या एका छोट्या भागावर वापरले जाते. उदाहरणार्थ दात काढताना किंवा छोट्या टाके घालताना.

2. रीजनल एनेस्थेशिया (Regional Anesthesia):
शरीराच्या मोठ्या भागावर परिणाम करतो, जसे की पाय किंवा कंबरेखालचा भाग. उदाहरणार्थ, प्रसूतीदरम्यान दिलं जाणारं स्पायनल एनेस्थेशिया.

3. जनरल एनेस्थेशिया (General Anesthesia):
या प्रकारात रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होतो आणि त्याला काहीच जाणवत नाही. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी हा प्रकार सर्वाधिक वापरला जातो. डॉक्टर रुग्णाची तब्येत, वय, वजन आणि वैद्यकीय इतिहास पाहून कोणता प्रकार योग्य आहे हे ठरवतात.

एनेस्थेशिया का आवश्यक आहे? शस्त्रक्रियेदरम्यान शरीराची हालचाल थांबवण्यासाठी आणि वेदनारहित उपचारासाठी एनेस्थेशिया अत्यावश्यक असतो. हे रुग्णाला शांत ठेवतं, त्यामुळे डॉक्टरांना अचूकपणे काम करता येतं. शरीरातील वेदनांची प्रतिक्रिया कमी होते, त्यामुळे हृदयगती आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. काही वेळा हे औषध शरीरातील स्नायू शिथिल करते, जे शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असतं. दिल्ली स्टेट कॅन्सर हॉस्पिटलचे तज्ज्ञ सांगतात की, जर एनेस्थेशिया योग्य मात्रेत दिलं गेलं, तर ते जीव वाचवणारं ठरू शकतं. रुग्णाला मानसिक आणि शारीरिक त्रास न होता उपचार पूर्ण करता येतात. (Anesthesia)

=================

हे देखील वाचा :

Ekadashi : वर्षभरात किती येतात एकादशी? जाणून घ्या भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचे खास उपा                                    

Liver Detox : लिव्हर डिटॉक्ससाठी डायबिटीज व कोलेस्ट्रॉलवर शेवग्याच्या पानांचा जबरदस्त उपाय जाणून घ्या                                    

Health : दिवाळीत फराळ खाऊन त्रास होतोय मग करा झटपट ‘हे’ उपाय                                    

=================

काही काळजी घेणं आवश्यक एनेस्थेशियापूर्वी डॉक्टर रुग्णाला काही तपासण्या करायला सांगतात जसे की ब्लड टेस्ट, ईसीजी, किंवा लंग फंक्शन टेस्ट. यामुळे औषध शरीरात योग्य प्रमाणात देणं सोपं होतं. शस्त्रक्रियेपूर्वी ८-१० तास उपाशी राहणं आवश्यक असतं. धूम्रपान, मद्यपान किंवा औषधांच्या सवयींबद्दल डॉक्टरांना सांगणं महत्त्वाचं असतं. शस्त्रक्रियेनंतर काही वेळ झोप येणं, मळमळ किंवा डोके हलकं वाटणं ही सामान्य लक्षणं आहेत आणि काही तासांत बरी होतात.

एनेस्थेशिया म्हणजे फक्त बेशुद्ध करणारी इंजेक्शन नसून, ती एक आधुनिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे जी शस्त्रक्रियेला सुरक्षित आणि वेदनारहित बनवते. तज्ज्ञ सांगतात की, आजच्या आधुनिक उपकरणं आणि प्रशिक्षित एनेस्थेटिस्टमुळे ही प्रक्रिया जवळपास १००% सुरक्षित झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. (Anesthesia)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.