राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि कोणाला संधी मिळते, याची ठाम हमी देता येत नाही. त्यातही पुन्हा ही फिल्डिंग मुद्दामून लावण्यात आली आहे की संधी वरवरची आहे, हे ओळखणंही अवघड असतं. (Pune Jain Boarding House)
आता पुण्याचंच उदाहरण घ्या. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ सध्या आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका जमिनीच्या व्यवहारात त्यांच्या जवळच्या बिल्डरचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही — कारण हा वाद एका विशिष्ट समाजाशी निगडीत आहे. त्यामुळे त्या समाजातील नेते आणि कार्यकर्ते पुढे आले, आणि विरोधकांनाही या प्रकरणावरून मुद्दा मिळाला. त्यांनीही या वादावरून जोरदार राजकीय हल्ला सुरू केला. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची एन्ट्री झाली, आणि त्यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा राजकारणाच्या रंगमंचावर आलं. अशा वेळी प्रश्न उभा राहतो — नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? यात कोणाचे काय स्टेक्स आहेत? चला, जाणून घेऊ. (Political News)

सर्वप्रथम या आरोपांच्या केंद्रस्थानी असलेला व्यवहार समजून घेऊया. पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेले जैन बोर्डिंग हॉस्टेल — ज्यामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर जैन बोर्डिंगचा समावेश आहे — हे शहरातील एक जुने आणि ऐतिहासिक वसतिगृह मानले जाते. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या संस्थेची स्थापना केली होती. काही महिन्यांपूर्वी ही जागा चर्चेत आली होती, कारण विश्वस्त मंडळाने या ठिकाणी नव्याने विकासकामे करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु समाजातील काही सदस्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. (Pune Jain Boarding House)
अलीकडेच या जागेचे अनधिकृतरीत्या हस्तांतरण करून ती विकण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. या विक्री प्रक्रियेला धर्मादाय आयुक्तांनी दिलेली मंजुरी नियम आणि कायद्यांच्या विरोधात असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय, या जमीन व्यवहाराशी संबंधित गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी असलेले संबंध वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. (Political Updates)
गोखले कंस्ट्रक्शन हा बिल्डर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार असल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांच्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला जात आहे. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांना उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, गोखले बिल्डरसोबत व्यवसायासाठी त्यांनी एका LLP कंपनीची स्थापना केली होती, मात्र डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी या कंपनीतून बाहेर पडल्याचं स्पष्ट केलं. तसेच जैन हॉस्टेलच्या जागेचा व्यवहार त्यानंतर झाल्यामुळे, आपला या प्रकरणाशी थेट संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं. यानंतर या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एरव्ही महिनोन्महिने लागणारी प्रक्रिया फक्त दोन दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. आरोपांचा भडका उडाल्यानंतर अखेर धर्मादाय आयुक्तांनी या विक्री प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. (Pune Jain Boarding House)
मात्र या दरम्यान काही नेत्यांनी या प्रकरणातून मोठं राजकीय मायलेज घेतलं. सर्वात आधी शेतकरी नेते राजू शेट्टी थेट कोल्हापूरहून पुण्यात दाखल झाले. जैन समाजाच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. ही पहिली वेळ नव्हती — यापूर्वीही ते कोल्हापुरातील माधुरी हत्ती आंदोलनात सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवानंतर ‘जैन विरुद्ध मराठा’ असा प्रचार झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे आता शेट्टी जैन समाजाच्या समर्थनार्थ उघडपणे पुढे येत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
===============
हे देखील वाचा : Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन
===============
यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धांगेकरही या वादात उतरले. “आपण महायुतीतील घटक पक्ष आहोत” हा मुद्दा फाट्यावर मारत त्यांनी थेट मित्रपक्ष असलेल्या भाजपवर हल्ला चढवला. त्यांनी “जमिनचोर” असा टोला लगावत ट्विट केलं आणि त्यामुळे त्यांना काही प्रमाणात प्रसिद्धीही मिळाली. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले धांगेकर सध्या आपली वैयक्तिक प्रतिमा पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. विधानसभा आणि लोकसभेतील पराभवानंतर त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, पण आता ते कमबॅकसाठी सज्ज असल्याचं स्पष्ट दिसतं. (Pune Jain Boarding House)
थोडक्यात, या राजकीय पटावर सर्वजण फक्त एक खेळी होण्याची वाट पाहत आहेत आणि एकदा का खेळ सुरू झाला, की मग प्रत्येकाला आपलं घोडं पुढं न्यायचं आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
