हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ नाव उच्चारताच चेहऱ्यावर एक हसू उमटते. यातलेच एक नाव म्हणजे असरानी. ‘असरानी’ हे नाव ऐकताच आताही अनेकांच्या ओठांवर हसू आले असेल आणि त्यांच्या अनेक भूमिका डोळ्यासमोरून सर्रकन गेल्या असतील. हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हरहुन्नरी अभिनेते आणि व्यक्तिमत्व म्हणजे असरानी. असरानी यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकांमधून आपले एक वेगळेच रूप लोकांसमोर आणले. मात्र याच बहुआयामी अभिनेत्याला आज आपण सर्वांनी गमावले आहे. (Asrani)
प्रसिद्ध अभिनेते गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबर रोजी श्वसनाच्या आजाराने व्हायच्या ८४ व्या निधन झाले. असरानी यांनी त्यांच्या हास्यामुळे, संवाद आणि विनोदी टायमिंगमुळे लाखो प्रेक्षकांना त्यांनी नेहमी हसवले. संपूर्ण जगामध्ये आपल्या अभिनयामुळे ओळख प्राप्त केलेल्या असरानी यांच्या जवळपास सर्वच भूमिका कमालीच्या गाजल्या. त्यांच्या सर्व भूमिका आजही सगळ्यांना स्मरणात आहे, आणि आजच्या पिढीला देखील त्या हसवताना दिसतात. जगभर ओळख मिळवणाऱ्या असरानी यांचा हा अभिनय प्रवास अजिबातच सोपा नव्हता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून येत त्यांनी आपले करियर घडवले. असरानी यांनी १९६० च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. (Marathi News)
गोवर्धन असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये पूर्ण केले. तिथेच त्यांना कला आणि अभिनयाबद्दल प्रेम आणि ओढ जाणवू लागली. असरानी यांनी त्यांच्या शालेय काळात नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यांनी कधीच विचार केला नव्हता की, ते मुंबईत येतील आणि चित्रपटांमध्ये काम करून नावलौकिक कमावतील. पुढे असरानी यांनी जयपूरमधील राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी जयपूर येथील ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम केले. त्यांना अभिनयातच काम करायचे हे त्यांनी ठरवून टाकले आणि थेट मुंबई गाठली. (Entertainment News)

मुंबईत आल्यानंतर असरानी यांना चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. परंतू तरीही त्यांना अपेक्षित काम मिळत नव्हते. पुढे कोणीतरी त्यांना चित्रपटात येण्यासाठी पुणे फिल्म इन्स्टीट्यूटमधून डिप्लोमा करण्याचा सल्ला मिळाला. १९६० मध्ये पुण्यात फिल्म एण्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूटची स्थापना झाली होती. अभिनयासाठीच्या पहिल्या बॅचची जाहीरात वृत्तपत्रात पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. पुण्यात असरानींना भारतातील प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक रोशन तनेजा यांनी शिकवलं. त्यांनी १९६४ मध्ये एक्टींगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली. (Bollywood News)
असरानी यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले. १९६७ मध्ये, त्यांनी गुजराती चित्रपटात गुजराती अभिनेत्री वहिदा यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९६७ ते १९६९ दरम्यान त्यांनी आणखी चार चित्रपटांमध्ये मुख्य किंवा सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. मुंबईत आलेल्या असरानी यांना चित्रपटात छोटे- मोठे रोल मिळू लागले. (TOdays Marathi Headline)
मात्र तरीही त्यांना यश काही मिळत नव्हते शेवटी हताश होऊन पुन्हा ते पुण्याला गेले. त्यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अर्थात एफटीआयआयमध्ये शिक्षक बनले. त्यावेळी त्यांची अनेक चित्रपट निर्मात्यांशी ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांच्या १९६९ मध्ये आलेल्या ‘सत्यकाम’ चित्रपटात त्यांना मोठा ब्रेक मिळाला. मात्र १९७१ रोजी आलेल्या ‘गुड्डी’ चित्रपटातून त्यांना अपेक्षित यश मिळाले आणि लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली. या सिनेमात त्यांचा कॉमिक रोल होतो जो प्रेक्षकांना खूप आवडला. (Top Marathi News)
असरानी यांच्या करीयरमध्ये दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. या दोघांच्या अनेक चित्रपटात असरानी यांनी काम केले. असराणी पिया का घर, मेरे अपने, शोर, सीता और गीता, परिचय, बावर्ची, नमक हराम, अचानक, अनहोनी, शोले, चुपके चुपके, अभिमान, अंदाज अपना अपना, हम, हेरा फेरी आणि मालामाल विकली आदी अनेक चित्रपटात कमालीचे काम केले. या चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका केल्या असल्या तरी त्यांना लोकांना त्या विनोदी वाटल्या. १९७२ मध्ये आलेल्या कोशिश आणि चैतालीमध्ये असराणी निगेटिव्ह रोलमध्ये होते. (Latest Marathi Headline)
======
Diwali : कार्तिक प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचे महत्त्व काय?
======
दरम्यान पुढे रमेश सिप्पी यांच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या शोले सिनेमातील जेलरची भूमिका तर अजरामर झाली. त्यांचा या सिनेमातील ”अटेंशन! हमने कहा अटेंशन! क़ैदियों, कान खोलकर सुन लो, हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं…” हा संवाद कमालीचा गाजला. आजही हा सिनेमा आणि असरानी यांचा संवाद प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. चित्रपटांव्यतिरिक्त, असरानी यांनी अनेक टीव्ही शोमध्येही काम केले. वय वाढल्यावरही ते नेहमी चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले आणि त्यांच्या खास विनोदी अंदाजाने लोकांना हसवत राहिले. (Top Trending News)
दरम्यान असरानी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर असरानी यांचे लग्न अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी झाले होते आणि त्यांच्यामागे पत्नीशिवाय कोणतेही कुटुंब नाही. त्यांना मूलबाळ नव्हते. असरानी आणि मंजू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. असरानी यांच्या आयुष्यात बहीण, भाचा आणि [तन्वी एवढेच होते. त्यांचा भाचाच त्यांचा मुख्य आधार होता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
