जगभरात सुरु असलेली युद्ध थांबण्याचा दावा करणा-या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आता अमेरिकेतच नवे जनआंदोलन सुरु झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेपासून युरोप आणि ऑस्ट्रेलियापर्यंत, नो किंग्ज नावाचे जनआंदोलन सुरु झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची वृत्ती हुकूमशाही आहे, या वृत्तीचा निषेध करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये हे जनआंदोलन झालेच शिवाय लंडन आणि माद्रिदमध्येही लाखो जनता ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली. (Donald Trump)

वॉशिंग्टन, बोस्टन, अटलांटा, शिकागो आणि लॉस एंजेलिस सारख्या अमेरिकेच्या प्रमुख शहरात झालेले हे आंदोलन ट्रम्प यांच्या विरोधातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन ठरले. एकट्या अमेरिकेतच २,६०० हून अधिक रॅली काढण्यात आल्या. जवळपास ७० लाख लोकांनी यात भाग घेतला. अर्थात या सर्व विरोधाचा ट्रम्प यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. उलट त्यांनी एआयच्या मदतीनं हेलिकॉप्टर चालवतांनाचा एक व्हिडिओ तयार केला असून यातून आंदोलनकर्त्यांवर चिखल टाकतांना दाखवण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाने या निदर्शनांना “हेट अमेरिका रॅलीज” असे संबोधले. अमेरिकेमध्ये शनिवार आणि रविवार हे दोन सुट्टीचे दिवस असतात. मात्र या आठवड्याच्या या दोन सुट्यांमध्ये अमेरिकेमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतलरले होते. येथील अनेक शहरे आणि गावांमध्ये एकाच वेळी हे लाखो लोक रस्त्यावर आले. त्यांच्या हातात नो किंग्ज नावाचे फलक होते. (International News)
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध रस्त्यावर आलेल्या या लोकांनी ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होत असल्याचे आंदोलनामार्फत सांगितले. फक्त अमेरिकाच नाही तर ट्रम्प यांचा विरोध करण्यासाठी युरोपमध्येही २,६०० हून अधिक रॅली काढण्यात आल्या. निदर्शकांनी “ट्रम्पनी आता परत जावे” अशा घोषणा दिल्या. अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये या ट्रम्प विरोधी रॅली काढण्यात आल्या. यात वॉशिंग्टन डीसी, न्यू यॉर्क, लॉस एंजेलिस, अटलांटा आणि शिकागो सारख्या प्रमुख शहरांचाही सहभाग असल्यामुळे ट्रम्प प्रशासनाला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे मोठे जनआंदोलन आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाच्या काळात अनेक सरकारी सेवा ठप्प आहेत. हजारो कर्मचा-यांना याचा फटका बसला असून त्यांच्या नोक-या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या जनआंदोलनाला अधिक व्यापक स्वरुप आले होते. (Donald Trump)

या आंदोलनत सहभागी झालेल्या निदर्शकांनी लोकशाहीच्या रक्षणाची मागणी करणारे फलक हातात घेतले होते. तर सॅन फ्रान्सिस्कोमधील ओशन बीचवर शेकडो लोकांनी त्यांच्या शरीरावर “नो किंग” हा शब्द तयार करून ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने केली. अमेरिका नावाचा जगभर दबदबा होता, मात्र ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जगभर देशाचे हसू होत असल्याचे बोर्ड निदर्शक झळकवत होते, तसेच काहींकडे अमेरिकेमध्ये लोकशाही नाही, तर ट्रम्प हे हुकूमशाही गाजवत असल्याचे फलकही होते. या आंदोलनातून निदर्शकांनी लोकशाही, न्याय आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठवला. या सर्वात न्यू यॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमधील ट्रम्प विरोधातील निरदर्शने लक्षवेधी ठरली. येथे १००,००० हून अधिक लोकं उपस्थित होते. लॉस एंजेलिसमध्येही मोठ्या रॅली काढण्यात आल्या. या सर्वांनी सरकारी संस्था कमकुवत करणे, इमिग्रेशन धोरणे कडक करणे, आयसीई छापे टाकणे आणि संघीय सैन्य तैनात करणे यासारख्या कृतींबद्दल ट्रम्प प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. (International News)
========
हे देखील वाचा : Mirwaiz Ajiji : अफगाणिस्तानचे अंबानी !
========
संपूर्ण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात निदर्शने होत असतांना स्वतः डोनाल्ड ट्रम्प काय करत होते, हे बघणंही महत्त्वाचं आहे. ट्रम्प यांनी आपल्या विरोधात सुरु असलेल्या निदर्शनांची खिल्ली उडवली आहे. ट्रम्प, कुटुंबियांसोबत फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील त्यांच्या घरी वीकेंडचा आनंद घेत होते. या जनआंदोलनानंतर त्यांनी एक एआय छायाचित्र सर्व सोशल मिडियामध्ये शेअर केले. त्यात ट्रम्प हे विमान उडवत असून त्यांनी त्या विमानातून मोठा चिखल या आंदोलकांवर टाकला आहे. अर्थात यातून ट्रम्प या अशा निषेध आंदोलनांना किती महत्त्व देत आहेत, हे स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकननी या घटनांचा निषेध करत त्यांना “हेट अमेरिका रॅलीज” असे संबोधले आहे. आता हे जनआंदोलन पुढे किती दिवस चालणार आणि ट्रम्प या विरोधकांना कशाप्रकारे गप्प करणार हे बघणे महत्त्वाचे आहे. (Donald Trump)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
