Home » Diwali Recipes: दिवाळीच्या दिवशी सुरणाची भाजी का बनवली जाते? जाणून घ्या यामागचं धार्मिक कारण आणि बनवण्याची सोपी रेसिपी

Diwali Recipes: दिवाळीच्या दिवशी सुरणाची भाजी का बनवली जाते? जाणून घ्या यामागचं धार्मिक कारण आणि बनवण्याची सोपी रेसिपी

by Team Gajawaja
0 comment
Diwali Recipes
Share

Diwali Recipes : दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजन, फटाके, फराळ आणि स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल हे सगळं आपल्याला सहज आठवतं. पण या सगळ्या पारंपरिक पदार्थांमध्ये एक भाजी विशेष लक्षवेधी असते ती म्हणजे सुरणाची भाजी. अनेक घरांमध्ये नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरण बनवण्याची परंपरा आहे. पण कधी विचार केला आहेत  का ही प्रथा का आहे आणि सुरण या दिवशी खाणं शुभ का मानलं जातं? चलातर  जाणून घेऊया या परंपरेमागचं धार्मिक आणि आरोग्यदायी कारण(Diwali Recipes)

सुरण खाण्यामागचं धार्मिक महत्त्व: हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणामागे काहीतरी अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण असतं. दिवाळीच्या वेळी सुरणाची भाजी बनवण्यामागेही एक पौराणिक कथा सांगितली जाते.असं म्हटलं जातं की भगवान विष्णूच्या वराहावताराने नरकासुर राक्षसाचा वध केला होता. नरकासुराच्या रक्ताच्या थेंबांपासून जमिनीवर एक प्रकारची वनस्पती उगवली ती म्हणजे सुरण. म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराच्या नाशाचं प्रतीक म्हणून सुरण शिजवून खाल्लं जातं. ही प्रथा वाईटाचा नाश आणि शुभाचा आरंभ या संकल्पनेचं प्रतिक मानली जाते.

Diwali Recipes

Diwali Recipes

सुरणाचे आरोग्यदायी फायदे : धार्मिक कारणांपलीकडे सुरणाचं वैज्ञानिक आणि आरोग्यदायी महत्त्व सुद्धा खूप आहे. सुरणामध्ये फायबर, व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त  प्रमाणात असतात. ते पचनशक्ती वाढवते, बद्धकोष्ठता कमी करते आणि शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत करते. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक ब्लड सर्क्युलेशन सुधारतात आणि हृदयविकारांपासून संरक्षण देतात. तसंच, दिवाळीच्या काळात तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ल्यानंतर सुरणासारखी फायबरयुक्त भाजी शरीरात संतुलन राखते आणि पचनास मदत करते.दिवाळीत बनवा पारंपरिक सुरणाची भाजी सुरणाची भाजी बनवणं अवघड नाही. फक्त काही सोप्या पधाती पाळल्या की ही स्वादिष्ट आणि पौष्टिक भाजी सहज तयार होते.

साहित्य:

* १ मध्यम आकाराचं सुरण
* २ चमचे तेल
* १ चमचा मोहरी
* १/२ चमचा हळद
* १ चमचा लाल तिखट
* १ चमचा गूळ
* १ चमचा चिंचेचं पाणी
* मीठ चवीनुसार
* थोडं कोथिंबीर सजावटीसाठी

कृती: सुरणाचं साल काढून तुकडे करून पाण्यात उकळा. उकळल्यावर पाणी गाळून घ्या.कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, तिखट टाका. नंतर सुरणाचे तुकडे त्यात घाला. त्यात चिंचेचं पाणी, गूळ आणि मीठ टाकून मिक्स करा. थोडं परतून झाल की झाकण ठेवा आणि ५ ते ७ मिनिटे शिजू द्या. शेवटी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. ही भाजी भात किंवा पोळीबरोबर अतिशय स्वादिष्ट लागते. (Diwali Recipes)

=====================

हे देखील वाचा :

Happy Diwali 2025: फटाके फोडताना पाळा हे 10 महत्वाचे नियम, सुरक्षित साजरी करा दिवाळीचा सण                                    

Gambling : दिवाळीच्या रात्री नशिब आजमवण्याची परंपरा! जाणून घ्या दिवाळीत जुगार खेळण्यामागचं रहस्य                                    

Samudra Manthan : दिवाळीचा संबंध समुद्र मंथनाशी कसा जोडला गेला आहे? जाणून घ्या पौराणिक रहस्य                                    

======================

लोकविश्वास आणि परंपरेचा संगम दिवाळी हा केवळ उत्सव नाही तर आरोग्य, स्वच्छता आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. सुरण ही भाजी या काळात खाल्ल्याने शरीर शुद्ध राहते, वात आणि कफाचे त्रास कमी होतात आणि पचन सुधारते, असे आयुर्वेदात म्हटलं आहे. तसंच, ही भाजी बनवून वाईट शक्तींवर विजय आणि नव्या वर्षाची सुरुवात आनंदने  अशी भावना जपली जाते.दिवाळीच्या दिवशी सुरण बनवणं ही केवळ परंपरा नाही, तर आरोग्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम आहे. सुरणाची भाजी खाणं म्हणजे शरीर शुद्ध ठेवणं आणि मनातल्या नकारात्मकतेचा नाश करणं. म्हणून या दिवाळीत फक्त फराळावर नाही, तर सुरणाच्या भाजीवरही प्रेम करा  कारण तीच खरी आरोग्य आणि शुभतेची ओळख आहे. (Diwali Recipes)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.