Home » Mirwaiz Ajiji : अफगाणिस्तानचे अंबानी !

Mirwaiz Ajiji : अफगाणिस्तानचे अंबानी !

by Team Gajawaja
0 comment
Mirwaiz Ajiji
Share

अफगाणिस्तानचा इतिहास हा युद्धानं ग्रासलेला आहे. कायम आक्रमण आणि दहशत याच वातावरणात अफगाणिस्तानमधले सर्वसामान्यांचे जीवन व्यतीत होत आहे. याच अफगाणिस्तानमध्ये एका व्यक्तीची अफगाणिस्तानचा अंबानी अशी ओळख आहे. या व्यक्तीची सध्याची संपत्ती १२ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक आहे. या वक्तीनं २०० हून अधिक प्रकल्प उभे केले आहेत. शिवाय अफगाणिस्तानमध्ये सर्वात अधिक गरज असलेल्या नोक-यांची निर्मितीही त्यांनी केली आहे. या व्यक्तीचे नाव आहे, मिरवाइज अजीजी. मिरवाइज संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात प्रभावशाली खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर्स म्हणून ओळखले जातात. त्यांना अफगाणिस्तानमध्ये अंबानी या नावानंही संबोधण्यात येते. काही वर्षापूर्वी स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी मिरवाइज अजीजी हे दुबईला पळून गेले होते. अगदी अल्प भांडवलावर त्यांनी तिथे उद्योग सुरु केला. आज तोच उद्योग एखाद्या कल्पवृक्षासारखा बहरला आहे. (Mirwaiz Ajiji)

अफगाणिस्तान हा सर्वाधिक युद्धांमुळे ओळखला जातो. अशाच एका युद्धात स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी मिरवाइज अजीजी हे दुबईला पळून आले. अफगाणिस्तानातील सर्व संपत्ती त्यांना तिथेच ठेवावी लागली. रहाते घर आणि जमिनीवर पाणी सोडावे लागले. दुबईला पळून आल्यावर उपजीविकेसाठी करायचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशात कुठेही नोकरी न करता मिरवाइज अजीजी यांनी आपल्याजवळील अल्प रक्कम गुंतवून व्यवसाय करण्याचे निश्चित केले. त्याच्या याच निर्णयामुळे ते आज अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अजीजी ग्रुपचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. अजीजीचा प्रवास १९८८ मध्ये सुरू झाला. तेव्हा अफगाण-सोव्हिएत युद्धामुळे अफगाणिस्तानमधून सर्वाधिक पलायन सुरु होते. (International News)

मिरवाइज अजीजी यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चांगल्या जीवनाच्या शोधात अफगाणिस्तान सोडले. पण अवघ्या एक वर्षात, १९८९ पर्यंत, त्यांनी दुबईमध्ये अजीजी ग्रुपची स्थापना केली. त्यांच्या या निर्णयामुळे आज लाखो तरुणांना नोक-या उपलब्ध झाल्या आहेत. अफगाणिस्तानहून आल्यावर मिरवाईस अझीझी प्रथम उझबेकिस्तानमध्ये स्थायिक झाले. जिथे त्यांनी कापड उत्पादन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर बल्गेरियातील तंबाखू उद्योगात विस्तार केला आणि नंतर रशियन कॉमनवेल्थमध्ये प्रवेश केला. यात त्यांना प्रचंड यश मिळालेच शिवाय अन्य व्यवसायाच्या कल्पनाही मिळाल्या. त्यानंतर मिरवाइज अजीजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित झाले. इथे त्यांच्यासाठी मोठे विश्वच उपलब्ध होते. त्यांनी आपले लक्ष तेल आणि वायू क्षेत्राकडे वळवले, आणि काही वर्षातच ते अब्जोपती झाले. (Mirwaiz Ajiji)

यानंतर मिरवाइज बँकींग क्षेत्राकडे वळले. त्यांनी अजीजी बँकेची स्थापना केली. या बँकेची शाखा अफगाणिस्तानमध्येही चालू झाली. आता ही बॅंक अफगाणिस्तानची सर्वात मोठी आणि भक्कम व्यावसायिक वित्तीय संस्था म्हणून ओळखली जाते. याशिवाय अजीजी ग्रुपने अफगाणिस्तानच्या अल बख्तर बँकेलाही विकत घेतले. २००७ मध्ये, मिरवाईसने अजीजी डेव्हलपमेंट्सची स्थापना केली. २००८ मध्ये या कंपनीने दुबईमध्ये ऑफ-प्लॅन प्रॉपर्टीज विकण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान जागतिक आर्थिक संकट होते. पण अजीजी ग्रुपनं या संकटाचेही सोने केले. २०१३ मध्ये पूर्ण ताकदीनं अजीजी डेव्हलपमेंट्सने त्यांच्या अनेक प्रकल्पांवर बांधकाम सुरू केले आणि दुबईमधील सर्वात लोकप्रिय डेव्हलपर्सम्हणून नाव मिळवले. या सर्व उद्योगामळे मिरवाइज अजीजी यांच्या नावावर आज, १२ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती आहे. यूएईमधील सर्वात विश्वासू खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर्स म्हणून त्यांचेच नाव घेतले जाते. दुबईमध्ये वास्तव्यास असेले मिरवाईस अफगाणिस्तानच्या मदतीला कायम तप्तर असतात. (International News)

=======

Donald Trump : ट्रम्पची दुधाची तहान ताकावर !

======

तिथेही त्यांनी आपला उद्योग सुरु केला असून ५००० नवीन नोक-या निर्माण केल्या आहेत. शिवाय अफगाणिस्तानमध्ये १०,००० घरे आणि व्यावसायिक जागाही विकसित केल्या आहेत. सध्या अजीजी ग्रुप वित्त, गुंतवणूक, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटीसह विविध क्षेत्रांमध्ये आपला विस्तार करत आहे. अजीजी इन्व्हेस्टमेंट, अजीजी डेव्हलपमेंट, अजीजी बँक, अजीजी हॉस्पिटॅलिटी आणि अजीजी फाउंडेशन यासारख्या अनेक कंपन्या त्यांच्या नावावर आहे. अजीजी ग्रुपची उलाढाल ३,४०० कोटी आहे. मिरवाईस यांनी अफगाणिस्तानमधून पलायन केले होते, तेव्हा त्यांच्याकडे फक्त ५७ हजार होते. हेच पैसे उद्योगात गुंतवून आज मिरवाइज अजीजी अनेक तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत. (Mirwaiz Ajiji)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.