Home » Tejas : नाशिकमध्ये तेजस एमके 1A विमानाचे उदघाटन, जाणून घ्या स्वदेशी फायटर जेटची वैशिष्ट्ये

Tejas : नाशिकमध्ये तेजस एमके 1A विमानाचे उदघाटन, जाणून घ्या स्वदेशी फायटर जेटची वैशिष्ट्ये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tejas
Share

भारतासाठी दिवाळीची सुरुवात अतिशय खास आणि अभिमानास्पद झाली आहे. वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हलका लढाऊ विमान (LCA) तेजस MK1-A ने शुक्रवारी यशस्वीरीत्या आपले पहिले उड्डाण केले. नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी ही ऐतिहासिक घटना भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली आहे. देशात बनवलेले पहिले तेजस एमके 1A (Tejas MK1A ) लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या ओझर युनिटमधून आकाशात झेपावले. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल झाले आहे. (Tajas MK 1A)

तेजस एमके 1A लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड च्या ओझर युनिटमधून आज आकाशात झेपावले. एचएएल च्या नाशिक युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या तेजस एमके 1A विमानाने आज पहिली झेप घेतली. विमान लँड झाल्यानंतर धावपट्टीवर अग्निशमन दलाच्या पाण्याच्या फवार्यांनी त्याचे जलतुषारात स्वागत करण्यात आले. यानंतर चित्तथरारक एअर शो सादर करण्यात आला, ज्यामध्ये तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यासोबतच HAL च्या नवीन उत्पादन लाईनचे उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. बंगळुरूनंतरची ही दुसरी उत्पादन सुविधा असून, स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण घडी ठरली आहे. (Marathi Trending Headline)

तेजस एमके 1A लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये
* तेजस विमान पूर्ण भारतीय बनावटीचे सर्वात हलके लढाऊ विमान आहे.
* ताशी २००० किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे.
* ध्वनीच्या वेगाच्या १.६ पट म्हणजेच सुमारे २,००० किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास हे विमान सक्षम आहे.
* ५०,००० फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता आहे. सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले हे लढाऊ विमान आहे.
* AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य होते. CIT प्रणालीमुळे “मित्र की शत्रू” अशी लक्ष्य ओळख त्वरित शक्य होईल. (Todays Marathi Headline)

Tejas
* SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा आहे. डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळेल.
* EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते. SMFD स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती मिळेल.
* डेल्टा विंग डिझाइनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण क्षमता आहे. क्वाड्रप्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोलमुळे अचूक आणि स्थिर नियंत्रण मिळवते.
* तेजस MK1-A ला राजस्थानमधील बीकानेर येथील नाल एअरबेसवर अर्थात पाकिस्तान सीमेजवळ तैनात केले जाण्याची शक्यता आहे.
* हे विमान आधुनिक एव्हियोनिक्स, उच्च दर्जाचे शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीमने सुसज्ज आहे. त्यामुळे हे विमान वायुसेनेच्या जुन्या MIG-21 ताफ्याची जागा घेणार आहे. (Top Marathi News)
* तेजस MK1-A मध्ये अत्याधुनिक स्वदेशी शस्त्रास्त्र बसवले जाणार आहेत. यात ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रे बसवली जातील. अपग्रेडेड रडार आणि नवीन एव्हियोनिक्स सिस्टम बसवले आहेत.
* भारतीय वायुसेनेने सप्टेंबर २०२४ मध्ये आपल्या MIG-21 ताफ्याला निवृत्त केले होते. त्यानंतर आता तेजस MK1-A हे नवे विमान त्या रिकाम्या जागेची पूर्तता करणार आहे.
* भारतीय वायुसेनेची ताकद वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत सुमारे ६२,३७० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारांतर्गत ९७ स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तयार करण्यात येणार आहेत. ६८ सिंगल-सीटर, २९ ट्वीन-सीटर ट्रेनर विमानांचा समावेश असेल. या विमानांपैकी ६५ टक्के पेक्षा जास्त उपकरणे स्वदेशी असतील. (Latest Marathi News)
* HAL ला सध्या अमेरिकन कंपनी GE कडून चार GE-404 जेट इंजिन मिळाले आहेत. हे इंजिन तेजस MK1-A मध्ये बसवले जाणार आहेत.
* तेजस MK1-A विमान भारतीय वायुसेनेला नवे बळ मिळणार आहे स्ट्राइक क्षमता वाढवणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावरचा विश्वास बळकट करेल आणि आगामी काळात भारताची हवाई शक्ती अधिक मजबूत करेल. या विमानांची टप्प्याटप्प्याने होणारी डिलिव्हरी वायुसेनेला मोठा बळकटी देईल आणि सीमारेषेवर अधिक प्रभावी संरक्षण मिळेल. (Top Trending News)

=======

Share Market : शेअर मार्केटमध्ये ‘मुहूर्त ट्रेडिंग’ म्हणजे काय? दिवाळीचा गुंतवणूक महायोग

Diwali Bonus : दिवाळी बोनस म्हणजे काय? जाणून घ्या या परंपरेचा अर्थ, सुरुवात आणि आजची स्थिती!

=======

दरम्यान तेजसने गेल्या काही वर्षांत अनेक चाचणी उड्डाणे केली आहेत, परंतु आजचे उड्डाण विशेष होते. कारण ते हवाई दलात समाविष्ट होण्यापूर्वी तयारीचा अंतिम टप्पा होता. एचएएलने खूप प्रयत्न केले आहेत. इंजिन विलंबामुळे हा प्रकल्प काहीसा मंदावला होता, परंतु जनरल इलेक्ट्रिकने आता चार इंजिने दिली आहेत. यावर्षी एकूण १२ इंजिन जनरल इलेक्ट्रिककडून मिळणार आहे. भारतीय हवाई दलाला तेजससारख्या विमानांची गरज आहे. २६ सप्टेंबरला मिग २१ चे २ स्क्वॉड्रन एकूण ४० विमाने निवृत्त केली आहेत. त्यामुळे वायूसेनेची फायटर स्क्वॉड्रनची संख्या ३० झाली आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.