Glowing Tips : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि सौंदर्याचा उत्सव. या दिवसांत प्रत्येक महिलेला स्वतःकडे सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचं असतं. पण बाहेरच्या धावपळीत, उशिरापर्यंतच्या तयारीत आणि गोडधोड खाण्यात त्वचेचा नैसर्गिक ग्लो हरवतो. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिच्या न्यूट्रिशनिस्टने सांगितलेल्या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स तुम्हाला दिवाळीत पुन्हा तो नॅचरल ग्लो मिळवून देऊ शकतात. (Glowing Tips)
हायड्रेशन आहे सर्वात महत्त्वाचं करीना कपूरच्या न्यूट्रिशनिस्टच्या मते, त्वचेच्या सौंदर्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पिण्याची सवय. शरीरात पुरेशी आर्द्रता राखल्यास त्वचा कोरडी पडत नाही आणि डिटॉक्सिफिकेशन नीट होतं. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. त्याचसोबत नारळपाणी, ताक आणि फळांचा रस हेही उत्तम पर्याय आहेत. (Glowing Tips)
खा हेल्दी – दिसा हेल्दी अनेकदा सणाच्या काळात आपण तळलेले पदार्थ, मिठाई आणि फास्टफूडमध्ये गुंतून जातो. पण न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर त्वचा तेजस्वी ठेवायची असेल तर संतुलित आहार घेणं अत्यावश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं, बदाम, आणि फ्लॅक्स सीड्सचा समावेश करा. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतं, जे त्वचेला आतून पोषण देतात.
पुरेशी झोप घ्या ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य झोप. दिवाळीच्या तयारीत अनेक महिला रात्री उशिरापर्यंत जागतात, ज्यामुळे त्वचेवर थकवा आणि डार्क सर्कल्स दिसू लागतात. दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास त्वचा स्वतःची दुरुस्ती करते आणि तजेलदार दिसते. (Glowing Tips)
=======================
हे देखील वाचा :
Unique village: संध्याकाळनंतर रडण्यास बंदी! कोकणातील या गावात आजही जपली जाते अनोखी प्रथा
Digital Arrest म्हणजे काय? ऑनलाइन फसवणुकीचा नवा पॅटर्न, जाणून घ्या कसा वाचाल या सायबर सापळ्यातून!
========================
घरगुती फेस पॅक वापरा करीनाच्या न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार, त्वचेचा नैसर्गिक तेज टिकवण्यासाठी घरगुती उपाय सर्वोत्तम आहेत. हळद, बेसन आणि दह्याचा फेस पॅक त्वचेला स्वच्छ, उजळ आणि मऊ बनवतो. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरल्यास सणाच्या दिवशी तुमचा चेहरा नैसर्गिकरीत्या उजळून दिसेल.
स्ट्रेस कमी ठेवा आणि स्माइल करा सणाचा आनंद घ्या, पण तणावापासून दूर राहा. कारण स्ट्रेसमुळे त्वचेवर डलनेस आणि पिंपल्स येतात ध्यान, हलका व्यायाम आणि पॉझिटिव्ह विचार ठेवणे यामुळे मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स राहतात. लक्षात ठेवा खरी सौंदर्याची सुरुवात मनाच्या शांततेपासून होते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics