Home » Diwali : दिवाळीच्या साफसफाईसाठी घरच्याघरी बनवा DIY क्लिनर लिक्विड

Diwali : दिवाळीच्या साफसफाईसाठी घरच्याघरी बनवा DIY क्लिनर लिक्विड

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali
Share

तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा सुंदर संदेश देणारा प्रकाशचा सण म्हणजे दिवाळी. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीची ओळख आहे. पाच दिवसाचा हा सण म्हणजे नुसता उत्साह, आनंद आणि जल्लोष. चमचमीत फराळ, फटाक्यांची आतिषबाजी, रंगीत रांगोळ्यांचे गालिचे, पणत्यांची आरास अशा उत्साहपूर्ण वातावरण केली जाते देवी लक्ष्मीची पूजा. दिवाळीचे मुख्य आकर्षण आणि मुख्य दिवस असतो लक्ष्मी पूजनाचा. या दिवशी देवी लक्ष्मीची यथासांग पूजा करत आर्थिक भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. आता एवढा मोठा सण म्हटल्यावर आणि देवी लक्ष्मीची पूजा करणार म्हटल्यावर घर चकचकीत असायलाच पाहिजे. (Marathi)

देवी लक्ष्मीचे स्वागत आपल्या घरात करायचे म्हणजे घर अतिशय स्वच्छ आणि लखलखितच पाहिजे. असेही जिथे स्वच्छता आणि टापटीपपणा असेल तिथेच लक्ष्मी नांदते आणि टिकते देखील. त्यामुळेच दिवाळीचा सण सुरु होण्यापूर्वी प्रत्येक घरामध्ये साफसफाईचा मोठा कार्यक्रम होतो. संपूर्ण घर, घरातील कानेकोपरे, गॅलरी, बाथरूम सर्वच अगदी स्वच्छ केले जाते. मात्र अनेकदा घरामध्ये असे काही डाग असतात जे खूप प्रयत्न करून देखील स्वच्छ होत नाही. किंवा घरातील साफसफाईमध्ये आपल्याला असे एक लिक्विड पाहिजे असते, जे वापरून आपण सहज घर स्वच्छ करू शकते. बाहेरून विकत आणणे हा पर्याय असला तरी हो महागडा पर्याय आहे. आणि मुख्य म्हणजे विकत आणलेल्या लिक्विडने डाग स्वच्छ होतीलच याची गॅरंटी नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घर स्वच्छ करण्यासाठी काही सोपे लिक्विड सांगणार आहोत, जे तुम्ही अगदी सहज घरी बनवू शकता आणि वापरून घर लख्ख करू शकता. (Diwali 2025)

Diwali

खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी लिक्विड
* काचेवरील तेल आणि ग्रीसचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट काचेच्या खिडक्या आणि दरवाजांवर लावा. काही वेळ सुकल्यानंतर ग्लास स्वच्छ पाण्याने धुवा.

* बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही देखील स्लायडिंग व्हिंडो साफ करू शकता. काचेच्या खिडक्या आणि दरवाज्यावरील हँडल साफ करण्यासाठी मीठ आणि लिंबूची मदत घ्या. यासाठी लिंबाच्या रसात मीठ मिसळून उपाय बनवा. लिंबाच्या रसाऐवजी, आपण पांढरे व्हिनेगर देखील वापरू शकता.

========

Diwali : ‘या’ सोप्या टिप्स वापरून दिवाळीची स्वच्छता करून लक्ष्मीला करा प्रसन्न

========

* ऍपल सायडर व्हिनेगरने खिडक्या आणि दरवाजे चमकण्यासाठी, २ कप पाण्यात अर्धा कप ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. खिडक्या आणि दारांना सुगंध देण्यासाठी तुम्ही त्यात आवश्यक तेल देखील घालू शकता. आता हे मिश्रण काचेवर स्प्रे करा आणि टिश्यू पेपर किंवा वर्तमानपत्राच्या मदतीने हलक्या हाताने स्वच्छ करा. (Marathi DIY News)

* खिडकीच्या ट्रॅक भिंती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डिश वॉश साबणाची मदत घेऊ शकता. यासाठी डिश वॉश लिक्विड २ कप गरम पाण्यात मिसळा. आता या पाण्यात स्पंज भिजवा आणि घासून स्वच्छ पाण्याने धुवा. याने झटपट सफाई होईल.

* एका स्प्रे बाटलीमध्ये दोन चमचे पांढरा व्हिनेगर, दोन कप कोमट पाणी, एक चमचा कॉर्नस्टार्च आणि एक कप रबिंग अल्कोहोल मिक्स करा. याचा वापर खिडक्यांवर दरवाज्यावर करून तुम्ही काही वेळातच त्यावरील डाग सहज साफ करू शकाल.

भिंतीवरील डाग काढून टाकण्यासाठी
* तेलाचे डाग खूप चिकट असतात आणि ते काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशावेळेस हे घरगुती क्लिनर बनवा. यासाठी दोन कप पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस, एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा कॅस्टिल साबण मिक्स करून क्लिनर बनवा. यामुळे भिंतींवरील तेलकट डाग देखील दूर होतात. (Todays Marathi Headline)

* डिशवॉशिंग लिक्वीड किंवा साबण देखील भिंतीवरील डाग काढून टाकण्यास मदत करू शकतात. ते वापरण्यासाठी प्रथम डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब पाण्यात मिसळा. एक कापड घ्या आणि ते लिक्विड मध्ये बुडवा आणि चांगले पिळून घ्या. भिंतींच्या ज्या भागात क्रेयॉनचे डाग आहेत त्या भागांवर कापड हळूवारपणे घासून घ्या. असे केल्याने भिंतीवरील डाग दूर होण्यास मदत होईल.

* ‘ग्लास क्लीनर’चा वापर करून तुम्ही क्रेयॉनने माखलेल्या भिंती स्वच्छ करू शकतात. क्रेयॉन, पेन किंवा पेन्सिलच्या खुणा असलेल्या भिंतींच्या भागावर ग्लास क्लिनरची फवारणी करा. (Marathi News)

* टूथपेस्टचा वापर भिंतींवरील क्रेयॉन डाग काढण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, भिंतीवरील डाग काढून टाकण्यासाठी आपल्याला पांढरी टूथपेस्ट वापरावी लागेल. खुणा असतील त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. नंतर ब्रशच्या मदतीने भिंती हळूहळू घासून घ्या.

Diwali

स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी क्लिनर
* स्वयंपाकघरातील पृष्ठभागावर जमा झालेले हट्टी तेलाचे डाग काढण्यासाठी २ कप पाणी, २ मोठे चमचे लिंबूचा रस, १ चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चतुर्थांश चमचा कॅस्टाईल सोप घयावे. ही सर्व सामग्री एकत्र करून हे मिश्रण डाग असलेल्या जागी लावून काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्पंज किंवा कपड्याने पुसून टाका. तेलाचे डाग सहज निघतील आणि पृष्ठभाग स्वच्छ दिसेल. (Top Trending Headline)

* स्वयंपाकघरातील सिंक, फ्रीज, स्टीलची भांडी आणि कुकिंग काउंटर साफ करण्यासाठी क्लीनर तयार करण्यासाठी, ४ कप कोमट पाणी, १/४ कप डिशवॉश लिक्विड आणि १/४ कप बेकिंग सोडा घ्या. हे सर्व साहित्य एकत्र मिसळून क्लीनर तयार करा. हे द्रावण किचन टाईल्स किंवा प्लॅटफार्मवर लावून हलक्या स्पंजने घासा. यामुळे सर्व हट्टी चिकटपणा आणि डाग प्रभावीपणे निघून जातील.

* एका स्प्रे बॉटलमध्ये ½ कप साबणाचा फेस घ्या त्यात अर्धा छोटा कप व्हिनेगर घाला. यानंतर ३-४ चमचे बेकिंग सोडा घाला. सर्वकाही चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण किचन कॅबिनेटवर व्यवस्थित फवारून घ्या. ५ मिनिटांनंतर, स्वच्छ ओल्या कापडाने कॅबिनेट चांगले पुसून घ्या. तसेच कॅबिनेटवरील घाण आणि चिकटपणा लगेच साफ होण्यासाठी हे क्लिनर प्रभावी आहे. (Latest Marathi News)

तांबे आणि पितळासाठी क्लिनर
* सायट्रिक ऍसिड १/४ कप, मीठ १/४ कप, १/४ कप गव्हाचे पीठ, लाँड्री सर्फ १/४ कप, २ ते ३ थेंब अन्न रंग घ्या. आता हे सर्व घटक एकत्र करून घ्या. एका भांड्यात मीठ घ्या, नंतर त्यात सायट्रिक ऍसिड पावडर घाला. त्यानंतर जारमध्ये गव्हाचे पीठ आणि कपडे धुण्याचे डिटर्जंट घाला. शेवटी रेड फूड कलरचे थेंब टाका, आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. ही पावडर तुम्ही हवाबंद डब्यात साठवू शकता.

========

Diwali 2025: दिवाळीचे ५ दिवस प्रत्येक दिवस सांगतो शुभत्व, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा अर्थ!

========

* २ चमचे मीठ आणि अर्धा कप पांढरा व्हिनेगर. एका भांड्यात या दोन गोष्टी एकत्र करायच्या आहेत. आता व्हिनेगरमध्ये मीठ पूर्णपणे विरघळेपर्यंत ते सतत ढवळत राहा. आता कापूस घ्या, तो मिश्रणात बुडवा आणि मग त्यात तुमची भांडी घासून घ्या. ही भांडी काही क्षणात चमकू लागतील. जास्त भांडी असतील तर तुम्ही हे द्रावण जास्त प्रमाणात तयार करू शकता आणि त्या द्रावणात सर्व भांडी बुडवून काही मिनिटे ठेवू शकता. तुमची भांडी नवीनसारखी चमकतील. तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरऐवजी चिंचेचे पाणी किंवा लिंबाचा रस देखील वापरता येईल. (Top Marathi Headline)

* पितळेची भांडी चमकण्यासाठी १ चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट पितळेची भांडी आणि मूर्तींवर चोळा. सर्व भाग पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर, ते कोमट पाण्याने चांगले धुवा. पितळी मूर्ती आणि भांडी चमकू लागतील.

Diwali

लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी क्लिनर
* लाकडी भांड्यांवरील डाग घालवण्यासाठी हे भांडे गरम पाण्यात बुडवून त्यात लिंबाचा रस पिळा. लिंबाचा रस थेट भांड्यांवर सुद्धा लावू शकता आणि ५ ते १० मिनिटांनी धुवा. (Top Marathi News)

* लिंबाने डाग गेले नसतील तर बेकिंग सोडा देखील वापरता येतो. डाग असलेल्या जागेवर बेकिंग सोडा टाका आणि त्यावर लिंबाचा रस पिळा. हा भाग साफ करण्यासाठी एका स्वच्छ कापडाचा वापर करा. त्यानंतर भांडे धुवा आणि सुकण्यासाठी ऊन्हात ठेवा.

* लाकडी भांड्यांवरील डाग घालवण्यासाठी आणखी एक चांगला उपाय म्हणजे आपली लाकडी भांडी पाणी आणि व्हाईट व्हिनेगर यांच्या समान प्रमाणातील द्रावणात रात्रभर भिजवून ठेवणे. यामुळे भांड्यांवरील दुर्गंधी दूर होऊन ती स्वच्छ होतील.

घरातील कीटकांना घालवण्यासाठी क्लिनर
* पुदिना आणि तुळस देखील माशी दूर करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तुम्ही या दोघांची पावडर किंवा पेस्ट बनवून पाण्यात मिसळू शकता. हे पाणी माशांवर फवारावे. हे कीटकनाशकासारखे परिणाम दर्शवते. (Latest Marathi Headline)

* लसूणचा वापर कीटकांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला लसूण बारीक करून पेस्ट तयार करून पाण्यात मिसळून उकळून घ्या. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत टाकून शिंपडावे. त्याच्या तीव्र वासामुळे कीटक घरापासून दूर जातात.

* थोडे पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून स्प्रे बॉटलमध्ये ठेवावा. सगळीकडे खोल्या, स्वयंपाकघर, स्वच्छतागृहांच्या लाईटजवळ शिंपडावे. यामुळे सर्व कीटक एकतर पळून जातील किंवा मरतील. (Top Stories)

Diwali

=========

Diwali Shopping : दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याआधी ‘या’ टिप्स नक्कीच वाचा

=========

* एक लिटर पाण्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण फडक्याने किंवा स्प्रे बॉटलच्या साहाय्याने घरातील लादीवर फवार. लादी स्वच्छ करताना ह्या मिश्रणाचा वापर नियमित केल्यास झुरळांचा प्रवेश कमी होईल.

* एक टेबलस्पून बेकिंग सोडा आणि एक टेबलस्पून साखर एकत्र करून ते मिश्रण झुरळं असलेल्या ठिकाणी फवारा. (Top Trending News)

* लादी पुसण्याच्या पाण्यात आपल्या गरम मसाल्यांतील काळी मिरी घेऊन ती बारीक कुटून त्याची पावडर घालावी आणि त्या पाण्याने लादी पुसावी. काळीमिरीच्या तीव्र वासाने झुरळं, मुंग्या, मच्छर, पाली, उंदीर पळून जातात आणि घर स्वच्छ राहते.

* दोन लिटर पाण्यात दोन चमचे कडूनिंबाचा रस मिसळा आणि ह्या मिश्रणात फडका बुडवून लादी पुसुन घ्या. कडूनिंबाचा सुगंध झुरळांना त्रासदायक वाटतो, त्यामुळे ते लवकरच घर सोडून जातात. शिवाय, कडूनिंबाचा सुगंधामुळे घरात एक फ्रेशनेस येतो आणि स्वच्छता टिकून राहते. (Social News)

( टीप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.