Unique village: कोकण म्हणजे संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचं एक सुंदर मिश्रण. इथं प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख आहे कुठं देवस्थानांसाठी प्रसिद्ध गाव तर कुठं निसर्गसौंदर्यासाठी. पण आज आपण अशा एका अनोख्या गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथं संध्याकाळनंतर रडण्यास बंदी आहे! होय, ही गोष्ट खऱी आहे. कोकणातील या छोट्या गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. चला जाणून घेऊया या परंपरेमागचं रहस्य आणि गावाची खासियत.
कोकणातील परंपरेचं हे अनोखं उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्या गावात ही अनोखी प्रथा आजही टिकून आहे. या गावाचं नाव आहे साखरपा परिसरातील देवस्थळाजवळचं एक गाव, जिथं गावकरी मानतात की संध्याकाळीनंतर रडल्याने गावात अशुभ घटना घडतात. म्हणून इथं सूर्यास्तानंतर कोणालाही जोरात रडण्याची परवानगी नसते मग ते दु:ख असो किंवा शोकप्रसंग. गावातील वयोवृद्ध सांगतात की ही परंपरा *देवस्थानाशी निगडित श्रद्धा म्हणून आजही जपली जाते.

Shravangaon
प्रथेचं मूळ आणि श्रद्धेचं कारण स्थानिक लोककथेनुसार, पूर्वी गावात एक गंभीर आजार पसरला होता आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्या वेळी गावातील ज्येष्ठ व्यक्तीने देवाकडे प्रार्थना केली. त्यानंतर देवाने स्वप्नात सांगितलं की, या गावात सूर्यास्तानंतर कोणी रडू नये, अन्यथा दु:ख पुन्हा परत येईल. त्यानंतरपासून ही प्रथा गावात रूढ झाली. गावकरी आजही या परंपरेला देवाचा आदेश मानतात. जर कोणाच्या घरात शोककाळ असेल, तर लोक सकाळीच अश्रू ढाळतात आणि संध्याकाळी शांतपणे प्रार्थना करतात. (Unique village )
गावातला अनुशासन आणि श्रद्धा या गावाची ही परंपरा फक्त धार्मिक कारणांनी नाही, तर सामाजिक समन्वयासाठीदेखील महत्त्वाची ठरते. इथले लोक सांगतात की, संध्याकाळ म्हणजे देवाचा वेळ त्या वेळी रडणं म्हणजे देवाच्या शांतीला भंग घालणं. त्यामुळे गावात संध्याकाळी शांती, भजनं, आणि दिव्यांच्या प्रकाशात प्रार्थनेचं वातावरण असतं. हे ऐकून आश्चर्य वाटतं, पण आजच्या धकाधकीच्या जगात जिथं परंपरा हरवत चालल्या आहेत, तिथं या गावातील लोक अजूनही आपली संस्कृती आणि नियम पाळत आहेत. परंपरा आणि आधुनिकतेचं संतुलनगावातील तरुण पिढी शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पडली असली तरी सण उत्सवांच्या वेळी ते गावात परत येतात आणि या प्रथेचा आदर राखतात. काहींनी या परंपरेचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण दिलं आहे संध्याकाळी दु:खावर चर्चा किंवा रडणं मनावर नकारात्मक परिणाम करतं, त्यामुळे या प्रथेचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. (Unique village )
=================
हे देखील वाचा:
Dry Skin : तुम्हालाही होतोय कोरड्या त्वचेचा त्रास? मग करा ‘हे’ सोपे उपाय
Office Rangoli Designs: ऑफिसमध्ये रंगोली स्पर्धा? काही मिनिटांत तयार करा हे सोपे आणि सुंदर डिझाईन्स!
=================

Shravan Talav
कोकणातील या श्रावणगावाला त्याच्या अनोख्या परंपरेइतकीच एक पौराणिक ओळखही आहे. या गावात असलेल्या प्राचीन तलावाशी श्रावणकुमार यांच्या कथेला जोडलेलं एक हळवं पण ऐतिहासिक स्मरण जपलं जातं. असं सांगितलं जातं की, श्रावणकुमार आपल्या अंध आई-वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी या तलावाकाठी गेले होते. त्याच वेळी राज दशरथ शिकारीसाठी त्या भागात आले होते. पाण्याचा आवाज ऐकून त्यांनी प्राण्याचा अंदाज घेत बाण सोडला, पण तो बाण थेट श्रावणकुमार याल लागला.या दुर्दैवी प्रसंगात श्रावणकुमारांचा याच तलावात मृत्यू झाला, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.(Unique village )
आजही गावकरी या तलावाला श्रावणतलाव म्हणून ओळखतात आणि त्याला पवित्र मानतात. अनेकजण श्रावण महिन्यात या तलावाजवळ दीपदान करून श्रावणकुमारांच्या स्मृतींना नमन करतात.या पौराणिक कथेमुळे श्रावणगाव केवळ कोकणातील सांस्कृतिक वारशाचा भाग नाही, तर कर्तव्यनिष्टेचा प्रतीक म्हणूनही ओळखलं जातं.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics