Home » Dry Skin : तुम्हालाही होतोय कोरड्या त्वचेचा त्रास? मग करा ‘हे’ सोपे उपाय

Dry Skin : तुम्हालाही होतोय कोरड्या त्वचेचा त्रास? मग करा ‘हे’ सोपे उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dry Skin
Share

आता हळूहळू थंडीची अनेक ठिकाणी चालू लागण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण होताना जाणवत आहे. तसेही दिवाळीनंतर थंडीची खऱ्या अर्थाने सुरुवात होतेच असते. आता दिवाळी देखील अगदी आठवडा भारतावर आली आहे. त्यामुळे वातावरण देखील थंड होण्यास सुरुवात झाली आहे. थंडी म्हणजे सगळ्यांचाच आवडता ऋतू. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आणि उत्तम आरोग्य शरीर कमवण्यासाठी अतिशय चांगला ऋतू म्हणून हिवाळा ओळखला जातो. (Dry Skin)

थंडी जरी चांगला ऋतू असला तरी या ऋतूचे देखील अनेक तोटे आहेत. सर्वात मोठा आणि सगळ्यांनाच त्रासदायक ठरणारा तोटा म्हणजे त्वचा कोरडी होणे. थंडीमध्ये त्वचा अतिशय कोरडी होते आणि तिला खाज सुटते. आपण किती तिला मॉईश्चराईज केले तरी जास्त काळ त्याचा फायदे होत नाही. आताशी थंडीची थोडी थोडी चाहूल लागत असली तरी अनेकांना तर आताच ड्राय स्किनची समस्या सातवण्यास सुरुवात झाली आहे. (Skin Care)

जेव्हा बाहेरील हवामान थंड, कोरडे असते, तेव्हा त्वचेची आर्द्रता लवकर निघून जाते, त्यामुळे त्वचा रुक्ष, कोरडी दिसू लागते. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा जास्त आर्द्र राहू शकत नसल्याने हिवाळा सुरु होण्याआधीच योग्य ती उपाययोजना केल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होते. यावर अनेक महागडे उपाय देखील कमी येत नाही. अशावेळस काही सोपे घरगुती उपाय नक्कीच तुमची यात मदत करून तुम्हाला यातून मुक्त करू शकतात. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल. (Winter)

> हिवाळ्यात अंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करु नका. अंघोळीसाठी कोमट पाणी ठेवा. थंडीमध्ये कायम पाण्याचे तापमान सामान्य ठेवा. जेव्हा त्वचा ओली असेल तेव्हा मॉईश्चराईजर लावा. आंघोळ केल्यानंतर नेहमी त्वचा हळूवार पुसून घ्या. त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी आंघोळ केल्यावर तीन ते पाच मिनिटांच्या आत मॉईश्चराईजर लावा. चेहरा दिवसातून वारंवार धुणं टाळा. शक्य असल्यास फक्त रात्री चेहरा धुवा. ज्यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाऊन त्वचा कोरडीही पडणार नाही. (Marathi News)

> थंडीच्या दिवसात आपल्याला तहान कमी लागते, त्यामुळे आपण पाणी कमी पितो. हे आपल्या त्वचेला हानी पोहोचवते, म्हणून थंडीच्या दिवसात पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, जे शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. (Todays Marathi Headline)

> अंघोळीच्या आधी मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास त्वचेवर कोरडेपणा किंवा रुक्षपणाची समस्या निर्माण होत नाही. तुम्ही इतर कोणत्याही तेलाचा वापर मालिश करण्यासाठी नक्कीच वापरु शकता. पण त्वचेवरील आद्रता टिकवून ठेवण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम पर्याय मानला जातो. कारण त्यात त्वचेतील कोरडेपणा दूर करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. (Top Marathi Headline)

Dry Skin

> झोपण्यापूर्वी, आपला चेहरा धुवा आणि खोबरेल तेल ओठांवर आणि त्वचेवर पूर्णपणे लावा. ओठ आणि चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. खोबरेल तेल लावल्याने त्वचा लगेच मुलायम होते. हे सुरकुत्या वाढण्यापासून देखील प्रतिबंधित करते. (Top Trending Headline)

> नारळाचे दूध त्वचेत खोलवर मुरते आणि त्वचेला पोषण देतं. नारळाच्या दुधामुळे बराच काळ त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. त्यामुळेच दररोज सकाळी त्वचेला नारळाचे दूध लावल्यास संध्याकाळपर्यंत त्वचेची आर्द्रता कायम राहते. नारळाच्या दुधाप्रमाणेच केळ देखील त्वचेसाठीही उपयुक्त आहे.

> कोरफड हे डेड स्कीन सेल्सना जीवित करुन त्वचा मुलायम करण्यास सहायक ठरतं. कोरफडातील अँटी ऑक्सिडंट गुणधर्म त्वचा कोरडी होण्यापासून बचाव करतात व त्वचेची नैसर्गिक चमकही कायम ठेवतात. (Top Stories)

> थंडीच्या दिवसात रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीवर मोहरीचे तेल लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते, तर दुसरीकडे हात आणि पायांच्या तळव्यावर मोहरीचे तेल लावल्याने त्वचेची आर्द्रता कधीच कमी होत नाही.

> थंडीच्या दिवसांमध्ये बदलत्या हवामानाप्रमाणे आपल्या आहारातही योग्य ते बदल करावयास हवेत. ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असलेल्या खाद्यपर्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. तसेच इ जीवनसत्व असणारे अन्नपदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावेत. या आहारामुळे आपल्या त्वचेला आर्द्रता प्राप्त होईल, व त्वचेचे आरोग्य चांगले राहील. नाश्त्याच्या वेळी आपल्या आहारामध्ये थोडे काजू व बदामासारख्या सुक्या मेव्याचा समावेश अवश्य करायला हवा. तसेच योग्य प्रमाणात लोणी, तूप व तेलाचाही आपल्या आहारात समावेश असावा. (Latest Marathi Headline)

=======

Winter : जाणून घ्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना थंडी जास्त का वाजते?

Health : तुम्ही पण मीठ जास्त खाताय? मग आजच्या ‘या’ टिप्स वापरून मिठाचे प्रमाण करा कमी

=======

> दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला तेजस्वी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड देखील असते जे कोरडेपणा दूर करते. दही थेट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर ते पाण्याने धुवावे. (Top Marathi News)

> चेहऱ्याचा ओलावा टिकवण्यासाठी बेसनाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा बेसन, चिमूटभर हळद पावडर (घरी बनवलेले), दूध आणि मलई नीट मिसळा. चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवा, जेणेकरून तुमचा चेहरा मॉइश्चराइज राहील. (Top Trending News)

> थंड दुधात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. आता कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि लवचिक राहील. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.