Home » Diwali Shopping : दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याआधी ‘या’ टिप्स नक्कीच वाचा

Diwali Shopping : दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याआधी ‘या’ टिप्स नक्कीच वाचा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali Shopping
Share

सगळीकडेच दिवाळीची जोरदार तयारी चालू झाली आहे. घरातील महिला वर्गाची तर नुसतीच धावपळ चालू असेल. एकीकडे फराळ, घराची साफसफाई चालू असेल तर दुसरीकडे गरजेच्या वस्तूंची, कपड्यांची खरेदी देखील चालू असेल. यासर्व गोंधळामध्ये किंवा कामाच्या प्रेशरमध्ये महिला वर्गाला अनेकदा प्रश्न पडत असेल की, स्वतः साठी साडी तर घ्यायची मात्र कोणती घ्यावी?, सध्या कोणत्या साड्या फॅशनमध्ये आहे? आदी अनेक प्रश्न पडत असतील. आज तुमचा हाच प्रॉब्लम सोडवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही नक्कीच तुम्हाला योग्य अशी साडी निवडू शकतात. (Diwali)

साडीचा रंग आधीच ठरवा
दिवाळी उत्सवात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गर्दीच्या दिवसांमध्ये खरेदी करायला बाहेर गेल्यानंतर काय घेऊ आणि काय घेऊ नको असे अनेकांना होत. महिला विशेषता या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे खरेदीला जाण्यापूर्वी साडी किंवा ड्रेसचा रंग आधीच ठरवून ठेवावा. जेणेकरून खरेदीला गेल्यानंतर जास्त घाईगडबड होणार नाही. पण काही महिला साडी किंवा ड्रेसचा रंग न ठरवताच जातात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. (Marathi News)

बजेट ठरवून ठेवणे
खरेदीला जाण्यापूर्वीच बजेट ठरवून ठेवावा, जेणेकरून खरेदीला गेल्यानंतर अतिरिक्त पैसे खर्च होणार नाहीत. महागाईच्या दृष्टिकोनातून आधीच बजेट ठरवून ठेवल्यामुळे पैशांची बचत होण्यास मदत होते. दिवाळीमध्ये बहिण-भावंडं, आई-वडील, लहान मुलं इत्यादी अनेकांना कपडे घ्याचे असतात, त्यामुळे घरातील कोणाला काय आवडेल आणि त्याची साधारण किंमत ठरवून बजेट तयार करावे. (Todays Marathi Headline)

Diwali Shopping

ही फॅशन झाली जुनी
दोन कॉन्ट्रास्ट रंगाची साडी, जास्त रफल्स असलेली साडी, कडक कॉटन साडी या साड्यांचा प्रकार आता जुना झाला आहे. त्यामुळे या प्रकारच्या साड्या घेणे टाळावे. जर तुम्ही अशा साड्या घेतल्या तर तुम्ही आऊटडेटेड दिसू शकता. (Top Marathi News)

या साड्यांचे प्रकार सध्या ट्रेंडिंग
दिवाळीची खरी मजा आणि सेलिब्रेशन संध्याकाळी असल्याने या लूकसाठी तुम्ही बनारसी साडी निवडू शकता. वजनाला जड असली तरी अतिशय रिच लूक देणारी आणि दिवाळीसाठी उत्तम पर्याय असलेली ही साडी आहे. शिवाय तुम्ही कॉटन सिल्क साड्यांचे प्रकार देखील नक्कीच ट्राय करू शकता. या प्रकारातल्या साड्या हलक्या असल्याने तुम्ही सहजपणे यात वावरू शकता. (Latest Marathi Headline)

दक्षिण भारतीय साड्या
दक्षिण भारतातील अतिशय प्रसिद्ध प्रकार म्हणजे ‘कांजीवरम’. कांजीवरम ही साडी जबरदस्त लोकप्रिय आहे. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की, आपल्याकडे एकतरी ओरिजनल कांजीवरम साडी हवी. मात्र जर तुम्हाला कांजीवरम साडी दिवाळीसाठी नको असेल तर तुम्ही काठ नसलेली कांजीवरम साडी घेऊ शकता. प्युअर सिल्क चंदेरी सिल्क साडी देखील दिवाळीसाठी उत्तम पर्याय ठरू शकता. पोचमपल्ली पटोला साडी देखील दिवाळीमध्ये तुम्हाला ट्रेंडी आणि क्लासी लूक देऊ शकेल. सध्या या साड्यांसोबतच हातमागाच्या कॉटन लिनन साड्या देखील खूपच गाजत आहे. (Top Trending News)

======

Dhanteras : जाणून घ्या धनत्रयोदशी या सणाचे महत्व

Diwali : धनत्रयोदशीला संध्याकाळी ‘हे’ उपाय करून लक्ष्मीला करा प्रसन्न

======

मोरपंखी रंग
सध्या जर आपण पाहिले तर मोरपंखी रंग खूपच ट्रेंडमध्ये असल्याचे आपल्याला दिसेल. सेलेब्रिटींपासून ते सामान्य महिलांपर्यंत सर्वांच्याच अंगावर मोरपंखी रंग आपल्याला पाहायला मिळत आहे. मोरपंखी रंग म्हणजे निळ्या आणि हिरव्या रंगाचे मिश्रण आहे. त्यामुळे या रंगाच्या साडीवर दोन छटा दिसून येतात. चंदेरी धाग्यांचा वापर करून तयार केलेली बनारसी साडी तुम्ही दिवाळीनिमित्त खरेदी करू शकता. मोरपंखी रंगामध्ये पैठणी, कांजीवरम, प्युअर सिल्क साडी, चंदेरी साडी हे प्रकार खरेदी करू शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.