Home » Health : जगात थैमान घातलेला मंकीपॉक्स आजार नेमका आहे तरी काय?

Health : जगात थैमान घातलेला मंकीपॉक्स आजार नेमका आहे तरी काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

पाच वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाने व्हायरसने संपूर्ण जगात नुसते थैमान घातले होते. संपूर्ण जग या काळात थांबले होते. चार भिंतींच्या आत माणसं कैद झाली होती. कोरोनाची ही दोन वर्ष मोठ्या मुश्किलीने सर्वांनी कशीबशी काढली. मात्र आता पुन्हा अशीच परिस्थिती येते की काय अशी भीती निर्माण होताना दिसत आहे. कोरोना परत नाही येत पण कोरोनाला टक्कर द्यायला एका वेगळ्याच आजाराने पुन्हा एन्ट्री केली आणि ती देखील महाराष्ट्रात. नुकताच महाराष्ट्रातील धुळे शहरामध्ये मंकी पॉक्स नावाचा आजार झालेल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. (monkeypox)

संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या या मंकी पॉक्सचा महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडल्याने सगळ्यांनाच आता मोठे टेन्शन आले आहे. जगाला त्रासवून सोडणाऱ्या या आजाराने आता महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आहे. भारतात आतापर्यंत याचे ३५ रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे. मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, स्नायू वेदना, सूजलेले लिम्फ नोड्स, आणि त्वचेवर फोड किंवा पुरळ येणे. यामुळे अपवादात्मक परिस्थितीत रूग्णांचा मृत्यू देखील होत असतो. (Health)

तसे पाहिले तर मंकी पॉक्स हे नाव काही नवीन नाही. साधारण २/३ वर्षांपूर्वी या आजाराने जगात असेच थैमान घातले होते. आता पुन्हा एकदा या मंकी पॉक्सने आपले डोके वर काढत हात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र आवाजही अनेकांसाठी हा आजार आणि हे नाव नवीन असेल तर काहींना नाव माहिती असेल पण आजाराची अधिक माहिती नसेल. म्हणूनच आज आम्ही या लेखातून तुम्हाला या आजाराची संपूर्ण माहिती देणार आहोत. (Marathi News)

मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे काय?
मंकीपॉक्स हा एक भंयानक आजार पसरवणारा विषाणू आहे. हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. एकदा मानवाला याची लागण झाल्यास हा आजार अधिक वेगाने पसरू लागतो. १९५८ साली हा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला होता. या विषाणूची बहुतेक प्रकरणे मध्य आणि पश्चिम आशियामध्ये आढळतात. मंकीपॉक्स झालेल्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून हा आजार खूपच जास्त वेगाने पसरतो. यासोबतच लैंगिक संबंध आणि त्वचेच्या संपर्कामुळे याचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असू शकतो. हा विषाणू माणसाच्या डोळे, श्वास, नाक आणि तोंडातून शरिरात प्रवेश करू शकतो. या विषाणूने संक्रमित झालेल्या व्यक्तींनी स्पर्श केलेल्या वस्तूंमधून देखील हा संसर्ग पसरू शकतो. याशिवाय हा विषाणू उंदीर आणि माकडाच्या संपर्कात आल्यानेही हा आजार पसरू शकतो. त्यामुळे अशा प्राण्यांपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. (Todays Marathi Headline)

Health

व्यक्ती-व्यक्तीमध्ये थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव, तसेच बाधित व्यक्तींनी वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होते. मंकीपॉक्स झालेला प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाल्ल्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मधुमेह, रक्तदाब, प्रतिकार कमी असलेल्या व्यक्तीला मंकी पॉक्स आजार होण्याची शक्यता जास्त आहे. (Top Trending Headline)

मंकीपॉक्स आजाराचा साधारण कालावधी ६ ते १३ दिवस असला तरी हा कालावधी ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्गजन्य कालावधी अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे बरे होईपर्यंत असतो. असा बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य रुग्ण असतो. (Top Marathi News)

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे तशी सामान्यच असतात. जर हा संसर्ग झाल्यास सुरुवातीला ताप येतो. त्यानंतर संपूर्ण शरीरावर पुरळ उठू लागतात. हे पुरळ चेहऱ्यावर आणि गुप्तांगांवरही येऊ शकतात. हे पुरळ पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे असू शकतात. यात काही काळानंतर पू तयार होतो. तसेच या पुरळांमुळे खाज येते आणि वेदना होतात. याशिवाय ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे असा त्रासही होते. अनेकदा काही केसेसमध्ये या आजारामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होतो. (Latest Marathi Headline)

आजारात या गोष्टी लक्षात ठेवा
WHO नुसार रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्याला अजिबात उपाशी राहू देऊ नका. रुग्णाला पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही अशा प्रकारे आहार द्या. रुग्ण किती लवकर बरा होईल, हे त्याच्या रोगांशी लढण्याच्या क्षमतेवर म्हणजेच प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. त्याच वेळी, सामान्य निरोगी लोकांसाठी संरक्षण म्हणून, मानवांना प्राणी किंवा संक्रमित रूग्णांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला दिला जातो. (Top Trending News)

========

Health : तुम्ही पण मीठ जास्त खाताय? मग आजच्या ‘या’ टिप्स वापरून मिठाचे प्रमाण करा कमी

World Mental Health Day 2025 : स्वतःचे मानसिक आरोग्य हेल्दी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते नियम फॉलो करावे?

========

आजारावरील उपचार
मंकीपॉक्सवर अद्याप कोणतेही विशिष्ट औषध सापडले नाही. यावर अँटीव्हायरल औषधांचा उपचार केला जात आहे. मंकीपॉक्सच्या उपचारादरम्यान त्याची लक्षणे कमी करण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाते. मंकीपॉक्ससाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही. त्याची लक्षणे चीकनपॉक्ससारखीच असतात. त्यामुळे त्याच्या उपचारात कांजण्यांचे औषध वापरले जाते. एक हे अँटीव्हायरल औषध आहे ज्याला टेकोविरिमेट देखील म्हणतात. ज्याला युरोपियन मेडिकल असोसिएशन (EMA) ने यावर्षी मान्यता दिली आहे. दरम्यान, ते जगभरात उपलब्ध नाही. त्याच वेळी, मंकीपॉक्सवर इतर देशांमध्ये इतर अँटीव्हायरल औषधांसह उपचार केले जात आहेत. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.