आपल्या सर्वांनाच विविध प्रकारचे पदार्थ खायला जाम आवडतात. जेवण करणे म्हणजे केवळ आपल्या जिभेचे चोचले पुरवणे एवढेच नाही तर जेवण हे आपल्या शरीराच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच गरजेचे आहे. आपण काय खातो यावरच आपले आरोग्य अवलंबून असते. आपण जे खातो, त्यातूनच आपल्याला ताकद मिळते आणि विविध प्रकारचे आरोग्यदायी घटक मिळतात. त्यामुळे कायम आपण आरोग्यदायी आणि सकस आहारच घेतला पाहिजे. (Health)
स्वयंपाक करताना जेवणातील सर्वात गरजेचा घटक म्हणजे ‘मीठ’. मिठाशिवाय आपल्या सगळ्यांचेच जेवण कायम अपूर्ण असते. जेवणात मीठ कमी असले काय आणि जास्त असले काय दोन्ही गोष्टींमध्ये जेवणाची त्याची चव बिघडतेच बिघडते. त्यामुळे कायम जेवणात मीठ मोजून मापून टाकणे आवश्यक आहे. मात्र असे असले तरी अनेकांना मीठ जास्त खायची चुकीची सवय असते. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त किंवा प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाणे अतिशय घातक असते. यासाठी कायम जेवणात मीठ कमीच घेतले पाहिजे. (Marathi News)
डॉक्टरांच्या माहितीनुसार एका दिवसाला मिठाचा वापर ३.२ ग्रॅम पर्यंत मर्यादित असला पाहिजे. FDA असेही म्हणते की, मीठाचा वापर एका लहान चमच्या एवढाच मर्यादित असावा. मीठामध्ये सोडियम असल्याने, पेशींची क्रिया, रक्ताचे प्रमाण आणि रक्तदाब राखणे यासारख्या विस्तृत कार्यांसह एक आवश्यक खनिज आहे. किडनीला त्याची प्रामुख्याने आवश्यकता असते आणि आपल्या शरीराला दररोज अंदाजे ५०० मिलीग्राम किंवा ०.५ ग्रॅम आवश्यक असते. (Health Care News)
मात्र ज्यांना मीठ जास्त खायची सवय आहे, त्यांनी आजपासूनच ही सवय बदलली पाहिजे. कारण मीठ जास्त खाल्ल्याने उच्च रक्तदाब, किडनीवर अतिरिक्त भर, हाडांवर विपरीत परिणाम, वजन वाढ, अशक्तपणा आणि थकवा येणे, सतत तहान लागणे, चेहऱ्यावर सूज येणे, वारंवार डोकेदुखी, पोटाचा कर्करोग, किडनीचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यू यांसारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात, असे डॉक्टर सांगतात. (Marathi News)
यासाठी मीठ कायम कमी खावे. पण आता ज्यांना मीठ जास्त खायची सवय आहे, आणि त्यांना मीठ कमी करण्याची इच्छा आहे, त्यांनी मीठ कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला आहारातून मिठाचे प्रमाणे कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय वापरून तुम्ही मीठ खाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. (Todays Marathi Headline )
* पेरू, आंबा, कॉर्न इत्यादींवर मीठ आणि तिखट घालून खाणे सगळ्यांनाच आवडते. मात्र असे मीठ म्हणजे अतिरिक्त मीठ खाणे होय. यासाठीच ज्यांना ही सवय आहे त्यांनी मीठाऐवजी आमचूर पावडर, मिरी पावडर, ओरेगॅनो, इत्यादी वापरून मीठ खाण्याची सवय सोडवली जावू शकते.
* सॉस आणि लोणचे यांसारखे पदार्थांमध्ये मीठ असते. त्यामुळे मीठ जास्त असलेले पदार्थ टाळणं चांगलं. याचं सेवन केल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे शरीराला हानी होते. म्हणून, अशा पदार्थांचा वारंवार वापर कमी करण्याचा प्रयत्न करावा. असे जास्त मीठ असलेले पदार्थ खाण्यापेखा दही, कोशिंबीर, फळे खाणे चांगले. (Marathi News)
* जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीर निर्जलीकरण होते. परिणामी, चेहरा, पोट आणि शरीराचे इतर भाग फुगतात आणि वेदना होतात. त्यानुसार, मिठाचे प्रमाण हळूहळू कमी करण्यास सांगितले जाते.
* आपल्यापैकी बरेच जण जेवतााना मिठाचा डबा जवळ ठेवतात. जेवणात मिठाचे प्रमाण योग्य असले तरी अन्नावर हलकेच मीठ घालतात. ज्यांना मिठाचे सेवन कमी करायचे आहे त्यांनी आधी ही सवय सोडली पाहिजे. तज्ञांच्या मते, बीपी, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी मीठाच्या सेवनाबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Marathi Trending Headline)
* पॅक फूड घेताना लेबल्स नक्की वाचा. कारण अनेक पॅकेज केलेल्या अन्नांमध्ये सोडियम असते जे खारट चवीचे नसतात. अन्न लेबलवरील सोडियमची पातळी तपासा आणि कमी सोडियम किंवा मीठ असलेले पदार्थ निवडा. मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG), बेकिंग सोडा आणि प्रिझर्वेटिव्ह्ज असलेले पदार्थ टाळा, कारण ते सोडियमचे सेवन वाढवतात. (Top Marathi News)
* रेस्टॉरंटमधील पदार्थांमध्ये मीठ जास्त असते, ज्यामुळे सोडियमची पातळी वाढते. चिप्स, कॅन केलेला सूप, इन्स्टंट नूडल्स, लोणचे आणि गोठवलेले जेवण यांचे सेवन कमी करा. बाहेर जेवताना, तुमच्या जेवणात कमी मीठ घाला किंवा ग्रील्ड आणि स्टीम्ड पर्याय निवडा. खारट स्नॅक्सऐवजी ताजी फळे, काजू आणि घरी बनवलेले भाजलेले स्नॅक्स खा. (Marathi latest Headline)
========
Health : दररोज केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
Healthy Meal Ideas : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश
========
* पोटॅशियम सोडियमची पातळी संतुलित करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. पोटॅशियम समृद्ध असलेले केळी, संत्री, पालक, गोड बटाटे आणि बीन्स खा. प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी दही, काजू आणि हिरव्या पालेभाज्या खा. हृदयाच्या आरोग्यासाठी कमी-सोडियमयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि संपूर्ण धान्य निवडा. (Top Trending News)
* फ्रिजमध्ये जास्त वेळ अन्न ठेवल्यास त्या अन्नामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे जर तुम्ही रात्रीची उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवली असेल तर लगेच तिचे सेवन करा. अधिक काळ अन्न फ्रीजमध्ये ठेवले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण शिळ्या अन्नामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics