धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी धनाची अर्थात लक्ष्मीची पूजा केली जाते. काही ठिकाणी तर धनत्रयोदशीला देखील लक्ष्मी पूजनासारखी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी म्हणजेच त्रयोदशी साजरा केला जातो. हिंदू मान्यतेनुसार, हा दिवस देवतांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच, याला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. भगवान धन्वंतरी हे अमृत घेऊन प्रकट झाले होते, म्हणून त्यांची पूजा आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी फलदायी मानली जाते. या दिवशी भगवान गणेश, देवी लक्ष्मी, कुबेर आणि यम यांच्यासह भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. हा दिवस धन, समृद्धी आणि आरोग्याच्या देवतांच्या पूजेचे प्रतीक आहे. (Marathi)
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:१८ वाजता सुरू होईल आणि १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:५१ वाजता संपेल. धनतेरसचा सण हा प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर साजरा केला जातो, त्यामुळे १८ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ सुरू होत असल्याने, धनतेरस १८ ऑक्टोबर २०२५ रोजीच साजरा केला जाईल. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा प्रदोष काळात करणे विशेष शुभ मानले जाते. या पूजेचा शुभ मुहूर्त: संध्याकाळी ७:१६ ते रात्री ८:२० पर्यंत असेल. धनतेरसच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या घराच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा सकारात्मक फायदा होईल आणि लक्ष्मीची कृपा लाभेल. (Dhantrayodashi)
> देवी लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावं. लाल रंग हं सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं. यामुळे देवीची विशेष कृपा राहते. तसेच आर्थिक समस्येवर तोडगा निघतो. (Diwali 2025)
> देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करावं. हे देवीचं आवडतं फूल असून ती कमळावर विराजमान आहे. त्यामुळे देवी प्रसन्न् होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
> धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णुंची पूजा करावी. भगवान विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते. आर्थिक समस्येतून मार्ग सापडतो. (Marathi News)
> देवी लक्ष्मीला खीर नैवेद्य खूपच प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीला खीरेचा भोग लावावा. त्यामुळे देवी लक्ष्मीचा कृपाशिर्वाद राहतो.
> धनत्रयोदशीच्या रात्री १३ तुपाचे दिवे लावा. या दिव्यांमध्ये कवडी टाका. घराच्या अंगणात हे दिवे ठेवा आणि मध्यरात्र झाली की त्या कवड्या काढून घ्या आणि घरातील कोणत्याही कोपऱ्यात गाडून टाका. असे केल्याने आर्थिक नुकसान होणार नाही तसेच नोकरी-व्यवसायात यश मिळेल. (Todays Marathi Headline)
> धनतेरसच्या संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना पूजेमध्ये 5 गोमती चक्र घ्या. गोमती चक्रांवर चंदन आणि केशराने महालक्ष्मीचे नाव लिहा आणि मग माता लक्ष्मीच्या जवळ ठेवा. नंतर विधीवत पूजा करून ती गोमती चक्र लाल वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने धन -धान्यात वाढ होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहतो. (Top Stories)
> जर आपल्याकडे धन टिकत नसेल म्हणजे पैसा तर येतो परंतू काही कारणामुळे खर्च होत असतो तर धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्या.
> धनत्रयोदशीला दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढर्या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही. अशाने जमा पुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात. (Latest Marathi News)
> धनतेरसला या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्याच्यांकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर अजूनच फलदायी ठरेल. हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवत नाही. (Marathi Trending Headline)
> धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात. यावेळी केशर आणि हळदीच्या पाण्याने रंगवलेले २१ अक्षत म्हणजे अखंड तांदूळ घ्या. तांदूळ तुटलेला नसावा याची काळजी घ्या. माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात, ते २१ तादूंळ पूजेत ठेवा आणि त्यानंतर लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घराच्या किंवा व्यवसाय जिथून करता तेथील दरवाज्यावर लटकून ठेवा. यामुळे सुखसमृद्धी वाढेल. गरजवंतांना तांदूळाचे दान करा. (Top Marathi News)
> धनतेरसच्या संध्याकाळी वडाच्या पारंब्यांना गाठी मारा आणि पाच कौड्या घेवून त्याला हळदीचा टीळा लावा. त्या कवड्या तुमच्या वरून ८ वेळा उतारवा आणि एखाद्या गरीब व्यक्तीस धन किंवा पैशांसोबत दया, यामुळे अचानक धन प्राप्त होते. धन मिळाल्यानंतर वट वृक्षाच्या पारंब्यांना बांधलेली गाठ सोडून द्या. (Marathi Latest Headline)
========
Vasubaras : वसुबारस… जाणून घ्या शुभ तिथी आणि महत्त्व
========
> धनत्रयोदशीच्या पूजेपूर्वी आणि नंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून घराच्या चारी बाजूला शिंपडावे. याने लक्ष्मीचे आगमन होतं. या व्यतिरिक्त हे पाणी पूजेत सामील लोकांवर देखील शिंपडावे. याने मन पवित्र आणि वातावरण शुद्ध राहते. (Top Trending News)
> धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी झाडू अवश्य खरेदी करा. धनतेरसच्या पूजे आधी या झाडूने थोडी साफसफाई करा, नंतर ती एका बाजूला ठेवा. मग दुसऱ्या दिवशी या झाडूचा वापर करा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते. (Social News)
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics