एका आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळीकडे केवळ दिवाळीची तयारी चालू आहे. भारतामध्ये दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मुख्य दिवाळीचा सण चार दिवस असतो. मात्र भारतात विविध ठिकाणी दिवाळीची सुरुवात ही वेगवेगळ्या दिवशी केली जाते. अनेक ठिकाणी वसुबारसला दिवाळी सुरु होते तर काही ठिकाणी धनतेरसला तर काही ठिकाणी कराष्टमीला. हो… दिवाळीच्या साधारण आठ दिवस आधी येणाऱ्या कराष्टमीपासून दिवाळी सुरु झाल्याचे अनेक ठिकाणी समजले जाते. आता अनेकांना जरा हे ऐकून आश्चर्यच वाटले असेल मात्र अश्विन महिन्यात येणाऱ्या अष्टमीला खास पूजा करून दिवाळी सुरु झाली असल्याचे समजले जाते. तर आज आपण याच अश्विन महिन्यात येणाऱ्या कराष्टमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Diwali 2025)
तसे पहिले तर अष्टमी ही तिथी प्रत्येक महिन्यात येते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी देवीची पूजा केली जाते. काही ठिकाणी या अष्टमीच्या दिवशी कालभैरव देवाची देखील पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र अश्विन महिन्यात येणाऱ्या कराष्टमीच्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी विधीवत पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. (Marathi News)
देवीच्या कृपेने नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो, असे म्हणटले जाते. अश्विन महीन्यात साजरी केली जाणारी कलाष्टमी ही कराष्टमी म्हणुनही ओळखल्या जाते. विशेषतः खान्देशमधील काही भागात आणि विदर्भात अश्विन महिन्यात, दिवाळीच्या आठ दिवसाआधी विशेष कलाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजेला बोली भाषेत आठवी मायची पूजा असे देखील म्हणतात. यंदा ही अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्थात सोमवारी साजरी केली जाणार आहे. (Todays Marathi Headline)
यादिवशी घरातील सर्व महीलांसह पुरुष देखील उपवास करतात. शेतातून ज्वारीचे पाच कणसं असलेली धांडे आणले जातात. त्याची तुळशी समोर खोपडी तयार केली जाते. त्यामध्ये मातीची बोळके ठेवून त्यात धान्य भरले जाते. मधोमध आपली ग्रामदेवता, कुलदेवता आणि लक्ष्मीची मुर्ती ठेवुन पूजेची मांडणी केली जाते. नंतर विड्याच्या पानावर चंदन घेऊन त्यावर चंद्राची कोर काढून त्याची मनोभावे पूजा केली जाते.काही ठिकाणी ज्वारीच्या आंबीलचा, तर काही ठिकाणी खिर-पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी सुगड्यांमध्ये लाह्या, शिंगाडे, सिताफळ, इत्यादी पदार्थ टाकुन त्यावर मातीचे झाकण ठेवले जाते. देवीला हळद कुंकू वाहून तिचे पूजन केली जाते. (Top Marathi Headline)
मात्र सगळीकडेच अश्या पद्धतीने पूजा केली जाते असे नाही. काही ठिकाणी या दिवशी देवासमोर गव्हाच्या राशीवर तांबे मांडले जातात. त्याला सूत गुंडाळले जाते. त्यावर प्लेट ठेऊन त्यांची पूजा करतात. तांब्यांना कुंकवाचे बोटं लावली जातात. नंतर त्याला हळदी कुंकू आणि फुलं वाहिली जातात. काही ठिकाणी या तांब्यांमध्ये धान्य टाकुन पूजा होते, तर काही ठिकाणी धांडे लावून पूजा होते. या दिवशी गोड दशमीच्या नैवेद्य दाखवला जातो. मात्र, दोन्हीकडे या दिवशी पूजा करण्याचा हेतू मात्र एकच असतो आपल्या गुरांढोरांप्रती आदर, धान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. गावाकडे दूध-दुभते जनावरं भरपूर असतात. दिवाळीच्या वेळी शेतातून धन-धान्याच्या रुपात लक्ष्मी घरी आलेली असते. (Latest Marathi News)
========
Diwali : ‘या’ सोप्या टिप्स वापरून दिवाळीची स्वच्छता करून लक्ष्मीला करा प्रसन्न
Diwali : दिवाळीसाठी आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स
Diwali : पणत्या लावल्यानंतर तेल खाली गळते? मग फॉलो करा ‘या’ टिप्स
========
शेतकऱ्यांसाठी दूध-दुभते जनावरं म्हणजे धन समृध्दीच. तर पुजेला ठेवलेले धांडे आणि धान्य म्हणजेच लक्ष्मी होय. या गोष्टींची कराष्टमीला पूजा करुन दिवाळीचा पहिला नवा दिवा आज घरात लावला जातो. काही ठिकाणी आठ दिवे लावून देवीची पूजा करतात. माझी आजी सांगते, पूर्वीच्या काळी कराष्टमीपासून गुरेढोरे राखणारी गुराखी मुले संध्याकाळी दिवा घेऊन घरोघरी जायची आणि नागदिवाळीपर्यंत हा क्रम चालू राहायचा. (Top Trending News)
आठवी मायचा किंवा कराष्टमीचा उपवास केल्याने अनेक शारीरिक व्याधी नष्ट होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळेच कुटूंबातील सगळेच सदस्य उपवास करतात आणि मिळुन पूजा करतात. काही भाविक रात्रीच चंद्राची पूजा करुन व नैवेद्य दाखवुन उपवास सोडतात. तर काही भाविक दुसऱ्या दिवशी सुर्याला अर्ज दाखवुन, पूजा व नैवेद्य दाखवुन पूजा करतात आणि उपवास सोडतात. आठवी पूजेच्या प्रथा या घरातील कुळाचारावर अवलंबुन असते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics